अमित गद्रे | Agrowon

अमित गद्रे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

उसाची साल बाजूला आणि गराचा भुगा करणारे यंत्र विकसित ! (video)
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : उसाची साल स्वतंत्र करून आतील कराचा भुगा करणारे यंत्र पुण्यातील टी. पी. वर्तक यांनी संशोधित केले आहे. उसाच्या सालीपासून चीपबोर्ड निर्मिती, तर भुगा जनावरांना खाद्य म्हणून वापरण्यात येतात, असे हे बहुउपयोगी संशोधन आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हे संशोधन अत्यंत उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. 

टॅग्स

नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने जम्मू-काश्मीरच्या अशांत भागांत लहान मुलींना शिक्षण, आरोग्य आणि राहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोळा वर्षांपूर्वी ‘बॉर्डरलेस वर्ड फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून निराधार मुली सन्मानाने उभ्या राहात आहेत. शिक्षणासोबत आरोग्य, ग्रामविकास उपक्रमांतून दुर्गम गावे जोडून घेण्याचे काम ते करत आहेत. या मुलींना कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचीही धडपड सुरू आहे.

ऊसतोडणी कामगारांवरील ‘फडकरी’ माहितीपटाचा आंतरराष्ट्रीय ठसा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे ः शिक्षणानिमित्त दररोज इचलकरंजीहून कोल्हापूरला जाताना वाटेतील गाव शिवारात ऊस तोडणीची गडबड पाहायचो. एका लईत सुरू असलेली तोडणी तर दुसऱ्या बाजूला बैलगाडी, ट्रॅक्टरमध्ये मोळ्या भरण्याची गडबड. शेताबाहेर बैलगाडी ओढताना फेसाटलेली बैलजोडी अन शेतातील झाडाखाली खेळणारी लहान मुले हे दररोजचे दृष्य माझी उत्सुकता वाढवत होते. यातूनच मी ऊस तोडणी कामगाराचा दिनक्रम चित्रित करण्याचे ठरविले अन त्यातून ‘फडकरी’ या साडे सहा मिनिटांच्या ‘ऑब्झर्व्हेशनल डॉक्युमेंटरी’ची निर्मिती झाली आणि आज फडकरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहे...

बाएफ तर्फे जातिवंत बोकडांच्या रेतमात्रांची उपलब्धता
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे ः गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना शेळीपालन हा चांगली आर्थिक मिळकत करून देणारा व्यवसाय म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे जातिवंत जुळी करडे देणाऱ्या शेळ्या आणि पैदाशीसाठी बोकडांची मागणी वाढत आहे. कळपामध्ये जातिवंत बोकड असल्यासच पुढील पिढीतही चांगले गूण संक्रमित होतात; परंतु सगळ्यांच्याकडे जातिवंत बोकड उपलब्ध नसतो. तसेच सातत्याने ४ ते ५ वर्षे एकच बोकड कळपातील शेळ्यांच्या रेतनासाठी वापरल्याने पुढील पिढीमध्ये अानुवंशिक गुणधर्म तसेच करडांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. शेळीपालकांची ही अडचण लक्षात घेऊन उरुळी कांचन (जि.

पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालना
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब` या स्वयंसेवी संस्थेतर्फे आंबोली (जि. सिंधुदुर्ग) गावपरिसरात ग्रामस्थ आणि विद्यार्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जातात. यातून ग्रामपर्यटन, जैवविविधता संरक्षणाला चालना मिळाली आहे.

फोटो गॅलरी

होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र...
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

शेती शिक्षणाची लागली गोडी
आमच्या शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरला आहे. विद्यार्थी शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात. पालकांच्याबरोबरीने चर्चा करून शेतीमध्येही वापर करतात. 
- बी. डी. गायकवाड 
(मुख्याध्यापक, कृषी औद्योगिक विद्यालय, चांबळी, जि. पुणे)
- एस. सी. बडदे, 
(मुख्याध्यापक, कृषी औद्योगिक विद्यालय, कोडीत, जि. पुणे)
 
‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी गोवंशाचा प्रसार
रविवार, 16 सप्टेंबर 2018

भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही संस्था १८५५ पासून गोसंरक्षण आणि संवर्धनामध्ये कार्यरत आहे. संस्थेने जातिवंत देशी गोवंश संवर्धन आणि पैदाशीचे कार्य सुरू केले आहे. पांजरपोळमध्ये शेण, गोमूत्रापासून जैविक खते, गांडूळखत, दशपर्णी अर्क, जीवामृत निर्मिती केली जाते. परिसरातील शेतकरी या उत्पादनांची खरेदी करतात. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जातिवंत गोवंश संवर्धन आणि प्रसाराचे काम संस्थेने हाती घेतले आहे.

घरीच तयार करा सौरकुकर
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

आपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु आपण अजूनही त्याचा पुरेसा वापर करत नाही. दैनंदिन कामासाठी आपल्याला सौरऊर्जा किफायतशीर ठरू शकते. यामध्ये प्रामुख्याने सौर दिवे, सौरकुकरचा वापर उपयोगी ठरणारा आहे. हाच विचार करून अहमदाबादमधील (गुजरात) सैयद अल जुबैर या युवकाने ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रसारासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजरात राज्यात विविध संस्थाच्या सहकार्याने सैयद अल जुबैर याने सौरकुकर निर्मितीसाठी आत्तापर्यंत ५२ कार्यशाळा घेतल्या आहेत. या माध्यमातून सुमारे १५०० लोकांच्यापर्यंत सौरकुकर निर्मितीचे तंत्रज्ञान त्याने पोचविले आहे.

कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

 स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न टाकता त्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकातील ओला कचरा (भाज्यांचा वाया जाणारा भाग, फळांची साले) हा कंपोस्ट खड्डा किंवा गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरला जातो, परंतु शहरी भागात जागेची उपलब्धता पहाता ओला कचरा जिरवण्याची समस्या दिसून येते. शहरी लोकांची गरज लक्षात घेऊन आयआयटी, मुंबईमधील आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनची पदवीधर एेश्वर्या सूर्यकांत माने हिने स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राचे प्रारूप तयार केले आहे.

‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृती
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक.  त्याचबरोबरीने मध आणि मधाच्या उपउत्पादनाला औषधी महत्त्व असल्याने बाजारपेठेत मागणी वाढत आहेत. हे लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात मधमाश्यांचे संरक्षण, संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी  संगणक विषयातील पदवीधर अमित गोडसे याने पुणे शहरात ‘बी बास्केट सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून मधमाशी संवर्धनाबाबत कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच शहरी ग्राहकांना मधविक्रीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात.