ज्ञानेश उगले | Agrowon

ज्ञानेश उगले

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

धरणात जमीन गेली तरी शेतीत नव्याने भरारी घेतलेले गावंडे 
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

झाडं लावणारा माणूस 
करंजाळी परिसर औषधी वनराईने बहरला आहे. या परिसरात जंगल वाढण्यास आणि अबाधित राहण्यास गावंडे यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी झाडे लावण्याचा छंद जोपासला. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साग, सादडा, नीलगिरी, हिरडा, बेहडा आदींची पाचशे, हजार झाडं ते लावत आले आहेत. चाळीस वर्षांपासून उपक्रम सुरू आहे

टॅग्स

फोटो गॅलरी

नियोजनाच्या अभावामुळे कांदाच संकटात
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

कांदा पिकाबद्दल लागवडीची अद्ययावत आकडेवारी मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. ती १०० टक्के अचूक व अद्ययावत मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने व्यवस्था तयार करावी. देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारव्यवस्थेत अनेक मध्यस्थ यंत्रणांची साखळी आहे. तिच्यामुळे व्यापारात अडथळाच जास्त आहे. अशा बिनकामाच्या मध्यस्थ यंत्रणा काढून टाकाव्यात.
- चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक, नाफेड
 
अतिरिक्त उत्पादनाचा तिढा सुटणार कसा?
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिक : एप्रिल, मे महिन्यात चाळीत साठवलेला कांदा जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत बाजारात येतो. त्यानंतर नव्याने काढणी झालेला खरीप व लेट खरीप कांदाच बाजारात राहतो. यंदाच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मात्र चाळींमध्ये ४० टक्के कांदा शिल्लक असून, हा कांदा अजून दीड महिन्यापर्यंत राहणार आहे. मागील पन्नास वर्षांच्या कांदा व्यापारातील अनुभवात यंदा प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांदा शिल्लक असल्याचे दिसत असल्याचे नाशिक जिल्हा कांदा-बटाटा व्यापारी  असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.
 
तोटा संपता संपेना...
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कांदा हे दुष्काळी शेतकऱ्याचे पीक आहे. इतक्‍या कमी कालावधीत, कमी पाण्यात दुसरे पीक होऊ शकत नाही. इतर पिके तर याच्याहीपेक्षा कमी उत्पन्ने देणारी असल्याने चरितार्थ चालवू शकत नाही. कांद्याला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी आणि ग्रामीण भागाचे चित्र बदलेल.
- संतू पाटील झांबरे, शेतकरी, येवला, जि. नाशिक

नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीत
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटलेली होती. या स्थितीत भाज्यांना स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजार समितीतून मागणी वाढल्यामुळे तेजीचे दर मिळाले. यात वांगी, घेवडा, आले, कारले, भोपळा, घेवडा या भाज्यांना तेजीचे दर मिळाले.

नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली. त्या बरोबरच या कांद्याची परराज्यातील मागणीही कमी झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला ३०० ते ९०० व सरासरी ५०० रुपये दर मिळाले. उन्हाळच्या तुलनेत लाल कांद्याला बाजारातून अधिक मागणी होत आहे. या कांद्याची गत सप्ताहात आवकही जास्त झाली. लाल कांद्याला या वेळी ३०० ते १४०० व सरासरी ११०० रुपये दर मिळाले. कर्नाटक व मध्य प्रदेशमधील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशांतर्गत बाजारात येथील कांद्याची मागणी स्थिर आहे. येत्या महिन्यात कर्नाटकातील लाल कांदा संपण्याची चिन्हे आहेत.

अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधान
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

नाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा पूर्ण दिवस रुग्ण तपासणी, सोनोग्राफी, अँजियोप्लास्टीमध्ये व्यस्त असला तरी मनातील एक कोपरा शेतीसाठी जपला आहे. हॉस्पिटल व्यस्ततेमध्येही डॉक्टरांचे फळबागेतील कामांकडे तेवढेच लक्ष असते. आठवड्याच्या धावपळीनंतर येणारा रविवार शेतासाठी राखीव असतो. शेती, फळबागा माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर तो श्‍वास आहे, ध्यास आहे, असं डॉक्‍टर सांगतात.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र,  नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...

प्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला जिंकले आम्ही
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

हरणगावची उपक्रमशील ग्रामपंचायत 
शेतीसह हरणगावाने विविध विकासांवर भर दिला आहे. ग्रामस्वच्छता स्पर्धेत गावाने तालुक्‍यात तिसऱ्या क्रमांकाने पारितोषिक पटकावले आहे. कलावंतांचे गाव अशीही हरणगावची ओळख आहे. येथील ग्रामपंचायतीने कचऱ्यापासून गांडूळखत निर्माण करण्यास सुरवात केली आहे. गावात तीन महिला बचतगट व एक शेतकरी गट आहे. ग्रामविकासात शेती हा केंद्रबिंदू ठेवला आहे.

नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढली
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

नाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या १५ बाजार समित्यांत मिळून दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी नवीन पोळ कांद्याला क्विंटलला ७५० ते १७०० व सरासरी १४०० असे दर निघाले. बाजारात उन्हाळ कांद्याची आवकही बऱ्यापैकी होत आहे. दरम्यान मागील पंधरवड्यापासून पोळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. पोळ कांद्याला उन्हाळ कांद्याच्या तुलनेत क्विंटलला ३०० रुपयांनी अधिक दर मिळत आहे. येत्या काळात हे दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.