महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांची निवड करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा स्पष्ट अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेने राज्य शासनाला पाठविला आहे. | Agrowon

डॉ. विश्‍वनाथा यांच्या निकालाकडे कृषी शिक्षण क्षेत्राच्या नजरा
मनोज कापडे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

वाद कुलगुरू निवडीचा : पूर्वार्ध

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांची निवड करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, याचा निवाडा उच्च न्यायालयाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे चारही कृषी विद्यापीठांसह कृषी शिक्षण क्षेत्राच्या नजरा लागून आहेत. 

वाद कुलगुरू निवडीचा : पूर्वार्ध

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांची निवड करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, याचा निवाडा उच्च न्यायालयाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे चारही कृषी विद्यापीठांसह कृषी शिक्षण क्षेत्राच्या नजरा लागून आहेत. 

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रविप्रकाश दाणी यांची निवड करताना नियम पायदळी तुडविण्यात आले होते. आता राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा वाददेखील ऐरणीवर आला आहे. डॉ. विश्वनाथा यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेब जाधव या शेतकऱ्यानेच याचिका दाखल केलेली आहे. शेतकरी असल्यामुळे राज्य शासनाने श्री. जाधव यांच्या भूमिकेकडे आधी फारसे लक्षच दिले नाही. मात्र राज्यातील चारही विद्यापीठांमधील सध्याचे सर्वांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश बोरकर यांनीही कुलगुरूंची निवड अवैध असल्याचे स्पष्ट केले. 

कुलगुरुपदासाठी आपण पात्र असतानाही हेतुतः नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत डॉ. बोरकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ''कुलगुरुपदासाठी सर्व उमेदवार अपात्र होते. हे मी नव्हे तर कागदपत्रेच सिद्ध करीत आहेत. न्यायालयीन लढाई सुरू असताना मला बदलीची शिक्षा मिळाली आहे, असे डॉ. बोरकर यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले. राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ''न्यायालयासमोर श्री. जाधव व डॉ. बोरकर यांनी आपली बाजू जोरदारपणे मांडली आहे. डॉ. विश्ननाथा यांनी देखील अपात्रतेच्या मुद्दाचा जोरदार प्रतिवाद केला आहे.

या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, आता निवाडा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र न्यायालयाच्या निकालानंतरच कुलगुरुपदाबाबत राज्यपाल कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाईल.  

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांची निवड करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा स्पष्ट अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेने राज्य शासनाला पाठविला आहे.

कुलगुरुपदासाठी मी पात्र होतो म्हणूनच मला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडले आहे. या समितीत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. अय्यपन आणि प्रधान कृषी सचिव डी. के. जैन यांचाही समावेश होता. प्रकरण सध्या न्यायप्रवीष्ट आहे. मात्र मला त्रास देण्यासाठी काही जण उगीच वेगवेगळे मुद्दे उकरून काढत आहेत. कृषी परिषदेचा अहवाल देखील गेल्या वर्षीचा आहे. मुळात, दापोली विद्यापीठात अर्ज करताना वेगळी माहिती होती. तोच निकष राहुरी विद्यापीठाच्या निकषाला लावता येणार नाही. 
- कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...