राजकुमार चौगुले | Agrowon

राजकुमार चौगुले

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

‘आत्मा’ विभाग बनतोय असाह्य
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : शासनाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या ११ जिल्ह्याच्या प्रकल्प संचालकांच्या बदल्या कृषी विभागात केल्याने आत्माची स्वतंत्र यंत्रणाच खिळखिळी होण्याची शक्‍यता आहे. शासनाच्या या बदलीसत्रामुळे या विभागाचे भवितव्य अंधातरी बनले आहे. यामुळे या यंत्रणेने तयार केलेले शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, शेतकरी मित्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. 

टॅग्स

सव्वानऊ कोटी रुपयांचा ‘युवराज’ !!! (व्हीडिअो सुद्धा)
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : रेड्याची किंमत तब्बल सव्वानऊ कोटी?... आश्‍चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. हरियानातील सोनारिया गावातील ‘युवराज’ रेड्याला चक्क सव्वानऊ कोटी रुपयांची किंमत आली आहे. पण पुत्राप्रमाणे जोपासना करणाऱ्या हरियानातील कर्मवीरसिंग यांनी ही ऑफर चुटकीसरशी धुडकावत आपल्या युवराजच्या प्रेमाला प्राधान्य दिले आणि हेच प्रेम देशभरातच्या शेतकऱ्यांची उत्सुकता बनून राहिले आहे. या मुऱ्हा जातीच्या रेड्याने लाखाहून अधिक मुऱ्हा जातीच्या म्हशींची पैदास केलेली आहे. नुकत्याच एका प्रदर्शनासाठी हा जातिवंत रेडा कोल्हापुरात आला होता. 

ऊस दरकपातीने कोल्हापुरातील उत्पादकांचे २०० कोटींचे नुकसान
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग आज अडचणीत सापडलेला आहे. गतवर्षी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून ऊसदराचा प्रश्न निकाली काढला होता. त्यांनी पुढाकार घेऊन नव्याने निर्माण झालेला ऊसदराचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी बैठक बोलवावी. सरकारने याप्रश्‍नी त्वरित तोडगा काढावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. 
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

खरिपात वरणा, जानेवारीत ऊस- दोन एकरांतील फायदेशीर पीक पद्धती
बुधवार, 31 जानेवारी 2018

जमीन सुपीकतेला प्राधान्य
शिरोळ तालुक्‍यात क्षारपड जमिनीचा प्रश्‍न मोठा आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखणे महत्त्वाचे आहे. जमिनीला विश्रांती देण्याबरोबरच सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा शिरढोणे यांचे प्रयत्न सुरू असतात. रासायनिक खतांचा अतिवापर टाळला जातो. माती परीक्षण त्यांनी केले आहे. सेंद्रिय कर्ब ०.६ टक्के आढळला आहे.

फोटो गॅलरी

कोल्हापुरात हिरवी मिरची वधारली
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वटाणा, हिरव्या मिरचीचे दर तेजीत राहिले. ओल्या वाटाण्यास दहा किलोस १६० ते ३६० रुपये दर होता. तर हिरव्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला.

वांगी, ढोबळी मिरचीचे दर स्थिर होते. वांग्यास दहा किलोस ५० ते २०० तर ढोबळी मिरचीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर होता. बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची पाचशे ते सहाशे क्रेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ५० रुपये दर मिळाला.

रांगड्या कुस्तीतून संस्कार अन् शिस्तही.. (व्हीडिअो सुद्धा पहा)
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर : ते येतात, डाव-प्रतिडाव शिकतात. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावतात. पण सर्वात महत्त्वाचा आयुष्याचा ठेवा ते कमवून जातात ती म्हणजे शिस्त. कुस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरात कुस्ती या क्रीडाप्रकारात यशस्वी होण्यासाठी जशी तरुणांची तालमींमध्ये गर्दी होत आहे, त्याचबरोबर योग्य संस्कार मिळविण्यासाठीही शालेय मुलांचे तालमीत होणारे प्रवेश ही अलीकडच्या काळातील सुखावह बाब म्हणून समोर येत आहे.

गुळाचा शेतीमाल तारण योजनेत समावेश केवळ मृगजळ?
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर : गुळाचा शेतीमाल तारण योजनेत समावेश करण्याबाबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनुकूलता दाखविली असली, तरी ही योजना राबवायची कशी याबाबत शासनाकडे सध्या काहीच माहिती नसल्याचे चित्र आहे. शेतीमाल तारण योजना ठरविताना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवावी लागते. ही किंमत गृहीत धरूनच पुढील सगळे व्यवहार करता येतात. पण मुळात गूळ हा प्रकार किमान आधारभूत किंमत शेतीमाल यादीच नसल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

कोल्हापुरातील जमिनीत लोह, जस्ताच्या प्रमाणात लक्षणीय घट
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जमिनीचे घटक समजून न घेता अतिप्रमाणात रासायनिक खतांचा वापर, पीक फेरपालटीचा अभाव आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाची घटती पातळी यामुळे अनेक तालुक्‍यांमध्ये जमिनीची सुपीकता चिंतेचा विषय झाला आहे. जिल्ह्यात माती परीक्षणासाठी दहा प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शासकीय एक व उर्वरित नऊ खासगी आहेत. आम्ही आरोग्यपत्रिकेच्याबरोबरीने जमीन सुपीकतावाढीसाठी उपाययोजना सांगत आहोत. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. सेंद्रिय कर्ब वाढविणे, लोह, जस्ताचे प्रमाण वाढविण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- म. वि. लाटकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीत
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गवारीचे दर तेजीत राहिले. हिरव्या मिरचीस दहा किलोस १८० ते ३०० ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते २५० तर गवारीस दहा किलोस ३०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. ओल्या मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीची केवळ दहा ते पंधरा पोती इतकीच आवक झाली.

मोहराने बहरल्या काजूच्या बागा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील थंडीच्या तडाख्यातून बचावलेला काजू मोहर आता चांगलाच बहरात आला आहे. सध्या कोकणात काजूसाठी वातावरण पोषक बनले आहे. वातावरणात अनपेक्षित बदल न झाल्यास यंदा काजूच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी बहुतांशी काजू बागा मोहराने बहरल्या आहेत.