संतोष मुंढे | Agrowon

संतोष मुंढे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

उत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पाणीटंचाईने शिकवले 
सन २०१२ मधील पाण्याच्या संकटानं अनेक बाबी शिकवल्या. दोन शेततळी, विहिरी, पाइपलाइनची सोय केली. शेततळ्यातील व प्रसंगानुरून विकत पाणी घेऊन मोसंबीची बाग व रोपवाटिका जगविण्याचे प्रयत्न होतात. प्रत्येक वर्षी शेती उत्पन्नातील निम्मा पैसा पुढील वर्षासाठी गुंतवण्याची सवय ठेवली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला. 

टॅग्स

फोटो गॅलरी

खर्चाचा इचार करता यंदा शेती घाट्यातच
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

एक पाऊस पडला त्यावर पेरणी केली, त्यानंतर कधी मधी जी भूरभर आली. त्यावर पिकं थोडीबहूत तगली. ओढ्याच्या काठी शेती पण ओढ्याला पाणी गेलंच नाही. सहा एकरांत बारा क्‍विंटल सोयाबीन झालं. काही शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. काहींचं उगवलं काहींच उगवलच नाही. 
- नंदकुमार कुलकर्णी, लिंबाळा, ता. औसा, जि. लातूर.

नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही...
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

कुटुंबात आठ एकर शेती, त्यात चार एकर कपाशी, दीड एकर बाजरी, दीड एकर तूर. कपाशी पावसाअभावी वाळून गेल्यानं मोडून रब्बीसाठी रान तयार केलं पण पाऊसच आला नाय, रान तसच पडलं. बाजरीत दाणे भरलेच नाही, चार दोन पायल्या होईल. तूर वाळून चाललिया.
- अर्जुन पवार, खालापुरी, ता. शिरूर कासार, जि. बीड

रेशीम अंडीपुंजांचा तुटवडा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

महिनाभरापूर्वी दीडशे अंडीपूंजाची मागणी नोंदविली. परंतु अद्याप पुरवठा झाला नाही. तीन एकरातील तुतीचा पाला तयार आहे. पाणीटंचाईमुळे तो जगविण्याचा प्रश्न आहे. दुसरीकडे आजवर चॉकी मिळाली असती तर किमान एक बॅच निघून गेली असती.
- शहादेव ढाकणे, रेशीम उत्पादक, देवगाव, जि. औरंगाबाद.

पाऊस नसताच आला तं पुरला असता
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पंधरवड्यापासून मिळेल तिथून टॅंकरनं जनावरांना व कुटुंबाला पाणी आणतोय. यंदा झाडाखाली पाऊस काळात वलं झालचं नाही. नांगराचं ढेकूळ इरगल नाही. आठ पिशव्यांत पाच क्‍विंटल कापूस झाला. आणखी दोन-तीन क्‍विंटल व्हईल. बाजरीचं सरमाड ९०० रुपये क्‍विंटलनं घेतलं. शासनाचं प्रशासनाचं आमच्याकडं कुणी अजून फिरकलं नाही. 
- गजानन दौंड, गारखेडा, सुलतानपूर 

गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

दहा एकरात तीन क्‍विंटल सोयाबीन झाली. सरकी अजून येचायची गरज नाही. दोन एकरात 50 किलो मुग झाले. खर्च व्हायचा तो होउन बसला, हाताला काम नाही. कुटूंबाचा रहाटगाडा चालवावां कसा हा प्रश्‌न आहे. 
- मंगेश इंगळे, पापळ ता. जाफराबाद जि. जालना 

दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

गावातील किमान दोनशे बैल चाऱ्याच्या संकटामुळं आजवर विकली गेली असतील. आता माझंच पहा ना, जिथं ५० ते ६० क्‍विंटल मका व्हायचा, तिथं अकरा क्‍विंटल झाला. ते पण बाराशे रुपये दरानं विकावा लागला. चारा नसल्यानं दोन गाय, एक म्हैस अर्ध्या किमतीत विकली. चाऱ्याच्या संकटानं माझ्या भावानंही ६५ हजारांत घेतलेली बैलजोडी ३५ हजारांत विकली तेबी पैसे दोन महिन्‍यांनं देण्याच्या वायद्यानं, इतके बिकट होऊन बसलंय सारं. 
- रावसाहेब जाधव, जामखेड, ता. अंबड, जि. जालना.

दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ, मोसंबीतून उत्तर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके एकेकाळी कपाशी व भाजीपाला पिकांच्या उत्पादनातील पट्टीचे शेतकरी होते. सततचा दुष्काळ आणि मजूरटंचाईमुळे या पिकांना पूर्णविराम देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण संकटांशी धैर्याने सामना करताना त्यांनी फळबाग लागवडीतून पीकपद्धती बदलली. सिंचनसुविधा बळकट केली. आज सीताफळ व मोसंबी पिकांतून समस्या कमी करून जीवनाला आर्थिक स्थैय त्यांनी मिळवून दिले आहे.

मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच स्पष्ट होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भूजल पातळीत ७.३८ मीटरची घट नोंदली गेली आहे. 

आॅक्टोबर हीटमुळे वाढली तूर अन्‌ कपाशीची होरपळ
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : एरवी साधारणपणे डिसेंबरनंतर भेगाळणारी भुई ऑक्‍टोबरमध्येच भेगाळल्याने जमिनीत ओलावा झपाट्याने तुटला आहे. पावसाळ्यात पावसाने दोन ते तीन वेळा प्रदीर्घ खंड दिला. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने ऑक्‍टोबरमध्येच जमिनीला भेगा पडणे सुरू झाले आहे. जमिनीतील ओल तुटल्यात जमा असून, ऑक्‍टोबरच्या वाढत्या हीटने स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे कपाशी अन्‌ तुर पिकांची होरपळ वाढली आहे. 