मराठवाड्यातील १७० मंडळात अतिवृष्टि

बीड जिल्द्यातील बिंदुसरा नदीला आलेला पूर
बीड जिल्द्यातील बिंदुसरा नदीला आलेला पूर

१९६ मंडळात ७५ टक्क्याहुन अधिक पाऊस अखेर यंदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात शनिवारी दुपारनंतर सर्वत्र रिमझिम-मुसळदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असुन रविवारी (ता.२०) सकाळपर्यंत ४२१ पैकी १७० मंडळात अतिवृष्टि झाल्याची नोंद झाली आहे. 

यंदा चांगला व वेळेवर पाऊस पडणार, असा हवामान खात्याने एप्रिल- मे महिन्यातच अंदाज व्यक्त केल्याने बळीराजाने वेळीच मशागत केली. जूनमध्ये पाऊस पडताच पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर अधुन- मधून हजेरी लाऊन पाऊस गायब झाला होता. त्यामुळे मराठवाडयातील पिके करपुन गेली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या बैलपोळाच्या पूर्वसंध्येला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शनिवारपासून रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मराठवाडयातील १५६ मंडळात ५० ते ७५ टक्यापर्यंत पाऊस झाला आहे. तर १९६ मंडळात ७५ टक्याहुन अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, मोठे, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा वाढ होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

नांदेड, परभणी, हिंगोलीत रिमझिम नांदेड - नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यात शनिवारी प्रदीर्घ विश्रातीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. काही ठिकाणची पिके तग धरून असल्याने त्या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. पण हलक्या बरडी जमीन असलेल्या शेतातील पिके वाळली आहेत. रब्बी हंगामासाठी हा पाऊस वरदान ठरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com