| Agrowon

जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलर
मनीषा जगदाळे, दीपक थोरात
सोमवार, 25 मार्च 2019

लेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते. लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत
काम करू शकतो.

आजही आपल्याकडे ३५ ते ४० टक्के क्षेत्र पृष्ठभाग
सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पृष्ठभाग सिंचन पद्धतीमध्ये २५ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग समतल असणे आवश्‍यक आहे. यासाठी लेझर लॅँड लेव्हलर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

जमीन असमतोल असल्याचे तोटे

लेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते. लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत
काम करू शकतो.

आजही आपल्याकडे ३५ ते ४० टक्के क्षेत्र पृष्ठभाग
सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पृष्ठभाग सिंचन पद्धतीमध्ये २५ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग समतल असणे आवश्‍यक आहे. यासाठी लेझर लॅँड लेव्हलर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

जमीन असमतोल असल्याचे तोटे

 • जमिनीच्या असमतोल पृष्ठभागाचा सिंचन पद्धतीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
 • जमिनीच्या पृष्ठभागाच्या असमान पातळीचा अंकुरण, वाढ आणि उत्पादनावर परिणाम होतो.
 • मानवी शक्ती व ऊर्जाचा अधिक प्रमाणात वापर.
 • आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास अडथळा.
 • मातीची धूप व पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात.
 • मशागत तसेच पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या विविध कामांची गती मंदावते.

लेझर लेव्हलरचे कार्य

 • लेझर लेव्हलर जमिनीच्या उंच भागातील माती कमी उंचीच्या भागाकडे अचूक व काटेकोरपणे हलवून जमिनीच्या पृष्ठभागाचे समतलीकरण करण्यासाठी मदत करतो.
 • लेझर लेव्हलरमध्ये मुख्यतः लेझर इमिटर, लेझर सेंन्सर, इलेक्‍ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक नियंत्रण प्रणाली आणि ड्रॅग बकेट यांचा समावेश असतो.
 • लेझर ट्रान्समीटर शेताच्या अशा ठिकाणी ठेवावा, की जेणेकरून लेझर सेंन्सरला प्रकाश झोत मिळण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. लेझर सेंन्सर व लेझर इमीटरमधील अंतर १०० मीटरपेक्षा जास्त ठेवू नये.
 • लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत काम करू शकतो.
 • लेझर सेंन्सर हा ड्रॅग बकेटवर बसवलेला असतो. कंट्रोल पॅनेलच्या मॅन्युअल मोडचा वापर करून बकेटची स्थिती जमिनीच्या आवश्‍यक पातळीनुसार निश्‍चित करावी. बकेटच्या याच स्थितीमध्ये लेसर सेंन्सर लेझर ट्रान्समीटरच्या समपातळीत करून घ्यावा आणि नियंत्रण प्रणाली म्यॅन्युएल मोडमधून स्वयंचलित पद्धतीमध्ये बदलून घ्यावी. या कार्यप्रणालीनुसार लेझर लेव्हलर उंच-सखल भागानुसार माती हलवून जमीन समपातळीत करतो.

 लेझर लेव्हलरचे फायदे

 • लेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते.
 • जमीन समतल असल्यामुळे ओलावा टिकून राहातो. पीक वाढीला फायदा होतो.
 • पिकाची उत्पादनक्षमता ३०  टक्‍क्‍यांपर्यंत वाढते.
 • सिंचनासाठी लागणारे इंधन, विजेची बचत होते.
 • सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची २०-२४ टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.

 

इतर टेक्नोवन
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...
शेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी...उत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा...
विहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या...परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे,...
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे रोटरी टोकण यंत्र हे उभ्याने ढकला पद्धतीने...
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या...हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग,...
अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट...महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता,...
बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणामसध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर...
शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल...इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत...
योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना...शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे....
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...