Last Update:
 
ऍग्रो प्लस

ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी
-
Tuesday, July 19, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon
द. वा. आंबुलकर
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास
मंत्रालयातर्फे ग्रामीण भागातील युवकांमध्ये विशेष कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था या देशातील सर्वच ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या संस्थांना केंद्र वा संबंधित राज्य सरकारांव्यतिरिक्त खासगी व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पण सहकार्य लाभलेले आहे. खास ग्रामीण युवकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या रोजगार स्वयंरोजगार अभ्यासक्रमांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
या प्रशिक्षण केंद्रामागचे मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहेत
श्र ग्रामीण क्षेत्रातील व प्रामुख्याने गरिबी रेषेखालील युवकांना प्रशिक्षित करणे.
श्र प्रशिक्षण मोफत, निवासी स्वरूपाचे व स्थानिक युवकांच्या गरजेनुसार ठेवणे.
श्र संबंधित ग्रामीण युवकांचा कल आणि गरजांनुरूप प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करणे. प्रशिक्षित युवकांना विशेषतः स्वयंरोजगारविषयक मार्गदर्शन करताना त्यांची संबंधित क्षेत्रातील बॅंकेशी सांगड घालून देणे.
श्र प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या रोजगार-स्वयं-रोजगाराच्या सुरवातीच्या दोन ते तीन वर्षे कालावधीसाठी त्यांना सहकार्यवजा मार्गदर्शन करणे इ.
वरील प्रशिक्षण योजनेसाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय व गरिबी रेषेखालील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते. प्रशिक्षणार्थींच्या एका तुकडीत सामान्यपणे 25 ते 30 उमेदवारांची निवड करण्यात येऊन, त्यांना ग्रामीण भागातील स्थानिक गरजांनुसार कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येते.
योजना प्रामुख्याने ग्रामीण युवावर्गासाठी असल्याने त्यामध्ये कृषी व कृषीवर आधारित वा निगडित अशा कृषी विज्ञान वा उत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्योत्पादन, महारूप उत्पादन, फुलांची लागवड, कृषी विपणन, फलोत्पादन व फळप्रक्रिया इ.शी निगडित रोजगार-स्वयंरोजगारविषयक शिक्षण-प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

याशिवाय ग्रामीण क्षेत्रातील युवा-मनुष्यबळासाठी म्हणून व स्थानिक गरजांनुसार कपडे शिलाई, उदबत्ती उत्पादन, पिशव्या शिवणे, पत्रावळी वा द्रोण तयार करणे, कागदाचे लिफाफे बनविणे, दुचाकी निगा व दुरुस्ती, ट्रॅक्‍टर्स दुरुस्ती, मोटर वाइंडिंग वा पंप दुरुस्ती, सेल फोन दुरुस्ती, फोटोग्राफी, झेरॉक्‍स-लॅमिनेशन, इलक्‍ट्रिकल कामे, संगणकीय-डीटीपी इ.चा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे प्रशिक्षण प्राप्त झालेल्या ग्रामीण युवकांना स्थानिक अग्रेसर प्रशिक्षण प्राप्त झालेल्या ग्रामीण युवकांना स्थानिक अग्रेसर बॅंकांमार्फत वित्तीय साहाय्य पण उपलब्ध होऊ शकते.

रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ठएडढख) योजनेअंतर्गत स्थानिक युवा-महिला, त्यांच्या गरजा वा प्राथमिकतेच्या आधारे विशेष प्रशिक्षण देण्याचा पण अंतर्भाव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यांमध्ये मिळून सध्या 192 रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्‌स कार्यरत असून, त्यांपैकी नऊ इन्स्टिट्यूट्‌स महाराष्ट्रात आहेत.

ग्रामीण भागातील रोजगार - स्वयंरोजगार क्षेत्रात विशेष शिक्षण - प्रशिक्षणाद्वारे आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्यांनी स्थानिक गटविकास अधिकारी अथवा आपल्या जिल्ह्यातील रोजगार माहिती कार्यालय अथवा जिल्हा अग्रणी बॅंकेशी संपर्क साधावा.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: