Last Update:
 
मुख्य पान

"टाटा शक्ती'कडून विक्रेत्यांना नॅनो कार
Agrowon
Wednesday, December 07, 2011 AT 03:15 AM (IST)
Tags: tata,   shakti,   nano,   agrowon
सांगली - "सकाळ - अग्रोवन'तर्फे येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात टाटा शक्ती कंपनीकडून आरआयपी शॉप असलेल्या विक्रेत्यांना नॅनो कार प्रदान करण्यात आल्या. कंपनीचे अधिकारी ऍनिमेश रॉय यांच्या हस्ते वितरण झाले.

इचलकरंजीतील माणिक हार्डवेअरचे उदय चौगुले, मिरजेतील अलीज ट्रेडर्सचे नावेद हंगड, पलूसच्या लक्ष्मी स्टीलचे नवाराम चौधरी, आटपाडीच्या महालक्ष्मी स्टीलचे मूलचंद ओशवाल, कवठेमहांकाळ येथील महालक्ष्मी स्टीलचे दयाराम चौधरी, इस्लामपूरच्या मनोज बॉम्बे हार्डवेअरचे बाबूराव हुबाले, घानवडच्या प्रभात स्टीलचे विक्रम जैन, तासगावच्या रामदेव स्टीलचे चेनाराम चौधरी, जतच्या रामदेव स्टीलचे मेघराज चौधरी, मडगावच्या काकोडे ट्रेडिंगचे पंकज काकोडे, मुधोळतिट्टा येथील दत्त एजन्सीचे सदाशिव पाटील यांना कार प्रदान करण्यात आल्या.
टाटा शक्ती पन्हाळी पत्र्याचे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे आणि गोवा राज्याचे वितरक कृष्णा ट्रेडर्स यांनी नियोजन केले. संचालक सुरेश डोळ यांनी स्वागत केले. सचिन डोळ, व्यवस्थापक अभय कुलकर्णी उपस्थित होते.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: