Last Update:
 
प्रादेशिक

विजय कोलते यांच्या "या सुंदर पाऊलवाटा' पुस्तकाचे प्रकाशन
-
Monday, December 19, 2011 AT 02:30 AM (IST)
Tags: agrowon
पुणे ः राजकारणात राहून कला, क्रीडा, साहित्य जपता येते हा यशवंतराव चव्हाणांचा आदर्श राजकीय कार्यकर्त्यांनी समोर ठेवावा, राजकारणापेक्षा समाजकारणासाठी आपल्या पदाचा वापर करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी केले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या "या सुंदर पाऊलवाटा' या पुस्तकाचे प्रकाशन मिरासदार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला निसर्ग कवी ना. धों. महानोर, "म्हाडा'चे सभापती अंकुश काकडे, विजय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. महानोर म्हणाले, ""कोलते यांनी आपल्या जीवनाची वाटचाल कृषी क्षेत्राशी निगडित आहे. त्यांनी कृषी क्षेत्रातील प्रवासाचे वर्णन पुस्तकात केले आहे. शरद पवार यांचे विचार आणि कल्पना राज्यात यशस्वीपणे राबविण्याचे काम कोलते करीत आहेत. हे पुस्तक राजकारणातील आणि समाजकारणातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.''

या वेळी अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार संभाजी कोलते यांनी मानले.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: