Last Update:
 
राज्य

उजनी जलाशयात मासेमारीसाठी परप्रांतीयांचे अतिक्रमण
Agrowon
Thursday, January 19, 2012 AT 03:15 AM (IST)
Tags: ujani,   lake,   agrowon
सोलापूर - परप्रांतीय मच्छीमार उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे अत्याधुनिक साधनसामग्री वापरून मच्छीमारी करीत असल्याने त्याचा फटका स्थानिक भूमिपुत्र मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर होत आहे.

परप्रांतीय मच्छीमार लहान छिद्रींची नेट जाळी वापरून लहान लहान माश्‍यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करीत असल्याने उजनी जलाशयातील मत्स्यसंपदा नष्ट होण्याचा धोका असूनही या परप्रांतीय मच्छीमारांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही. जलाशयाची परप्रांतीय मच्छीमारांच्या तावडीतून सुटका होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक भूमिपुत्र मच्छीमारांनी केले आहे. 29 डिसेंबर रोजी उजनी जलाशयात मच्छीमारी करून ते मासे आंध्रप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल येथे विक्रीसाठी जात असताना पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचून आठ जणांना गुन्हे अन्वेषण, शाखा पुणे यांनी पकडल्यानंतर या कारवाईचा धसका घेऊन सध्या तरी परप्रांतीय मच्छीमार व त्यांना आणणारे ठेकेदार गायब असल्याचेच चित्र उजनी जलाशय व परिसरात असल्याचे चित्र दिसत आहे; परंतु पुन्हा या समस्या उद्‌भवणारच आहेत, तरी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: