Last Update:
 
मुख्य पान

बाळ दळवी यांना "सह्याद्री कृषी सन्मान'
-
Thursday, January 26, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agrowon
पुणे ः कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य लक्ष्मण बाबूराव ऊर्फ बाळ दळवी यांची मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या "सह्याद्री कृषी सन्मान' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सह्याद्री वाहिनीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. येत्या 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दूरदर्शन केंद्रात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दळवी यांनी हैदराबाद येथील भात संशोधन संचालनालयाने तयार केलेल्या ड्रमसीडरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले, त्यामुळे या ड्रमसीडरद्वारे एकाच वेळेस चार ओळींत भात पेरणी करता येते. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होते. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे, संशोधन संचालक डॉ. बी. बी. जाधव, तसेच संशोधन केंद्राच्या सर्व सहकाऱ्यांनी दळवी यांचे अभिनंदन केले.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: