Last Update:
 
ऍग्रो मार्केट

येवल्यात कांदा आवकेत मोठी वाढ
संतोष विंचू
Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: agro market
येवला, जि. नाशिक ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डावर, तसेच आंदरसूल उपबाजार आवारावर गत सप्ताहात नवीन लाल रांगडा कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सप्ताहात कांद्याची एकूण एक लाख 15 हजार 963 क्विंटल आवक होती. कांद्याला 200 ते 340 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. आंदरसूल उपबाजार आवारावर कांद्याची 45 हजार 27 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला 200 ते 340 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

गहू ः गत सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली, दर स्थिर होते. गव्हाची एकूण 22 क्विंटल आवक झाली. 1099 ते 1240 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
बाजरी ः बाजरीची आवक टिकून होती. दर तेजीत होते. बाजरीची एकूण 41 क्विंटल आवक झाली. दर 950 ते 1301 रुपये प्रति क्विंटल होता.
हरभरा ः हरभऱ्याच्या आवकेत घट झाली, तर दर वाढले होते. हरभऱ्याची एकूण 33 क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला 2201 ते 3051 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
तूर ः तुरीच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली. तुरीची 39 क्विंटल आवक झाली. तुरीला 2201 ते 3101 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
मका ः मक्‍याच्या आवकेत घट झाली. दर तेजीत होते. मक्‍याची 1954 क्विंटल आवक झाली. मक्‍याला 1036 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार यांनी सांगितले.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: