Last Update:
 
बाजारभाव

नाशिकमध्ये काकडी सरासरी 4900 रुपये क्विंटल
-
Saturday, March 17, 2012 AT 03:30 AM (IST)
Tags: agrowon
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. 15) काकडीची 18 क्विंटल आवक झाली. या वेळी काकडीला 4000 ते 5750 रुपये, तर सरासरी 4900 रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना काकडीच्या मागणीतही वाढ होते. या वेळी काकडीच्या आवकेत घट असताना मागणी वाढल्याने दरही वधारलेले आहेत.

नाशिक भागातील त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्‍यांतून प्रामुख्याने काकडीची आवक होते. गत महिन्यातील थंडीच्या तडाख्याने काकडीची आवक घटलेली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यानेही काकडीच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. याशिवाय नाशिक बाजार समितीत घेवड्यालाही चांगली मागणी होत आहे.

दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यांतून बाजार समितीत घेवड्याची आवक होते. गेल्या सप्ताहापर्यंत जास्तीत जास्त दहा क्विंटलपर्यंत असलेल्या घेवड्याच्या आवकेत गुरुवारी 35 क्विंटलने वाढ झाली आहे. या वेळी घेवड्याची 45 क्विंटल आवक झाली. घेवड्याला 3000 ते 6500 रुपये, तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल असे दर निघाले. स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून त्याहून अधिक प्रमाणात मागणी वाढल्याने घेवड्याला तेजीचे दर मिळाले. नाशिक जिल्ह्यात फळपिके व नगदी पिकांच्या तुलनेत घेवडा पिकाकडे कल कमीच आहे, त्यामुळे घेवड्याचे दर नेहमी टिकून राहिले असल्याचे चित्र आहे.

घेवड्याबरोबरच लिंबू व भेंडीची आवक मागणीच्या तुलनेत घटलेलीच आहे. या वेळी लिंबाची आवकही 12 क्विंटल इतकीच झाली. लिंबाला 3250 ते 4700 रुपये, तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल असे दर निघाले. गेल्या पंधरवड्यापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून लिंबाला मागणी वाढली आहे, त्यामुळे या स्थितीत लिंबाची आवक व दरही स्थिर आहेत. मंगळवारी भेंडीची आवक अवघी 14 क्विंटल झाली. या वेळी भेंडीला 2915 ते 4150 रुपये, तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल असे दर निघाले. उन्हाळ्यात भेंडीची आवक घटते, त्यामुळे भेंडीचे दर उन्हाळा अखेरपर्यंत टिकून राहतात. दरम्यान घेवडा, लिंबू, काकडी या शेतीमालाच्या मागणीत वाढ होणार असल्याने दर टिकून राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: