विनायक साखर कारखाना सुरू करण्याची मागणी
-
Monday, May 07, 2012 AT 01:00 AM (IST)
वैजापूर, जि. औरंगाबाद (प्रतिनिधी) - वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखान्याचे पुनर्वसन करून हा कारखाना सुरू करण्यात यावा, अशी मागणी विनायक सहकारी साखर कारखाना पुनरुज्जीवित समिती पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की विनायक कारखाना 2001 पासून अवसायनात निघाला आहे. तेव्हापासून कारखाना बंद आहे. तालुक्यात लहान मोठे जल प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कारखाना सुरू करावा.' पुनरुज्जीवित समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, कार्याध्यक्ष विश्वास पाटील, सरचिटणीस ऍड. आर. डी. थोट, ऍड. प्रमोद जगताप, साहेबराव पवार, के. टी. तांबे, सीताराम वैद्य, हरिभाऊ परदेशी आदींनी ही मागणी केली आहे.