Last Update:
 
प्रादेशिक

गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
-
Tuesday, May 22, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon
सोलापूर : जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव नवनाथ भजनावळे यांनी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नुकतीच पालकमंत्री प्रा. ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा मध्यवर्ती बॅंक, भारतीय रिझर्व्ह बॅंक, जिल्हा उद्योग केंद्र, शेती संशोधन केंद्र, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी गैरहजर होते. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असल्याने नियोजन मंडळाची बैठक महत्त्वपूर्ण होती; मात्र अधिकारी गैरहजर असल्याने अनेक निर्णय होऊ शकले नाहीत. या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: