Last Update:
 
बाजारभाव

नगरमध्ये भुईमूग शेंगांची आवक वाढली
-
Tuesday, May 29, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: market rate,   nagar
नगर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात बाजरी, ज्वारीची आवक कमी झाली. जाड हरभरा, गहू, चिंच, एरंडीची आवक स्थिर राहिली. भुईमूग शेंगेची आवक वाढली. भुईमूग शेंगेची 1430 क्विंटल आवक राहिली. भुईमूग शेंगेला 240 ते 290 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. तुरीची 335 क्विंटलची आवक झाली. तुरीला 3200 ते 3600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गव्हाची 180 क्विंटल आवक झाली. गव्हाला 1300 ते 1535 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ज्वारीला 2000 ते 2300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. जाडा हरभरा, गहू, चिंच, एरंडीची आवक स्थिर राहिली. करडई, शेंगा, तीळ, काबुली हरभरा, उडीद, मठ, धना, सोयाबीनची आवक झाली नाही. भाजीपाल्यात कोथिंबीर, बटाटे, टोमॅटो, फ्लॉवर, मेथी, पालक भाजीची आवक स्थिर राहिली. कांद्याची 32 हजार क्विंटल आवक झाली.

कांद्याला 50 ते 655 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या सप्ताहात भुसार, भाजीपाल्याच्या आवकेसह दर स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक वाढल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

नगर बाजार समितीत शेतीमालाची झालेली आवक व दर
शेतीमाल ----------आवक---------------किमान --------------कमाल दर
ज्वारी 114 2000 2300
बाजरी 134 1000 1400
गहू 180 1300 1535
हरभरा गावरान 67 3400 3850
गूळ डाग 2203 2450 2800
चिंच 608 3200 3825
हरभरा जाडा 179 4100 4325
चवळी 8 4575 5075
मका 17 1050 1300
एरंडी 14 2750 2800
तूर 325 3200 3600
रुपये प्रति क्विंटल भाजीपाला ः (दहा किलोंचे दर)
टोमॅटो 288 100 220
वांगी 107 60 220
फ्लॉवर 199 100 150
कोबी 38 60 120
गवार 75 150 300
कारल 32 150 200
काकडी 298 50 120
भेंडी 82 100 250
बटाटे 1088 120 140
हिरवी मिरची 288 160 300
लिंबू 111 100 330
गावरान लसूण 44 80 120
वाल 10 200 250
भुईमूग शेंगा 1430 240 290
सिमला मिरची 32 240 250

पालेभाज्या ः (शंभर जुड्या)
मेथी 3480 600 1000
कोथिंबीर 5112 500 800
शेपू 987 400 600
पालक 2880 600 500


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: