
पुणे (प्रतिनिधी) - राज्यात काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसाने भाजीपाल्याच्या पिकांना आधार मिळाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन काही प्रमाणात वाढले. परिणामी, येथील विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहुतांश भाजीपाल्याची आवक वाढली. मात्र काही भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने त्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची यांचा समावेश आहे. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहे.
बाजार समितीमध्ये रविवारी (ता.17) भाजीपाल्याची सुमारे 170 ते 180 गाड्यांची आवक झाली. परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटकातून चार ते पाच ट्रक तोतापुरी कैरी आंध्र आणि कर्नाटकातून 10 ते 12 ट्रक हिरव्या मिरचीची आवक झाली. चेन्नईहून दोन टेम्पो शेवग्याची, इंदूरहून तीन टेम्पो गाजराची, हिमाचल प्रदेशातून दोन टेम्पो मटारची आवक झाली. आग्रा, इंदूर येथून बटाट्याची 70 ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे आठ ते दहा ट्रक लसणाची आवक आली. इंदूर येथून कोथिंबिरीची सुमारे चार टेम्पो आवक झाली.
स्थानिक आवकेमध्ये पुणे विभागातून सातारी आल्याची दोनशे पोती, टोमॅटोची चार ते साडेचार हजार पेट्या, फ्लॉवरची 14 ते 15 टेम्पो, कोबीची 18 ते 20 टेम्पो, कांद्याची सुमारे 70 ते 80 ट्रक, सिमला मिरचीची सात ते आठ टेम्पो, भुईमूग शेंगेची सुमारे तीनशे पोती टेम्पो आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे 90 हजार, तर इंदूर आणि सटाणा येथून 50 हजार जुड्या, मेथीची 25 हजार तर शेपूच्या सहा हजार जुड्यांची आवक झाली.
फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) कांदा ; 50-70
बटाटा : 120-140
लसूण 150-200
आले : सातारी : 200
भेंडी 150-200
गवार गावरान : सुरती : 150-200
टोमॅटो 150-160
दोडका 200-250
हिरवी मिरची 300-320
दुधी भोपळा 50-80
चवळी 150-150
काकडी 100-130
कारली : हिरवी 200-220
पांढरी 100-110
पापडी 280-300
पडवळ 120-130
फ्लॉवर 80-100
कोबी 80-120
वांगी 150-220
डिंगरी 180-200
नवलकोल 70-80
ढोबळी मिरची 200-250
तोंडली कळी 200-220
तोंडली जाड 60-100
शेवगा 250
गाजर 160-200
वालवर 250-300
बीट 100-140
घेवडा 300-500
कोहळा 200
आर्वी 180-200
घोसाळे 140-160
ढेमसे 140-160
मटार : परराज्य : 500
पावटा 400-450
कैरी तोतापुरी : 120-130
गावरान : 100-200
चिंच : अखंड : 60-70
तांबडा भोपळा : 60-100
सुरण : 180-200
नारळ : 600-800
मका : (शेकडा) : 150-300
पालेभाज्यांचे दर (शेकडा)
कोथिंबीर गावरान : 1000-1400,
कोथिंबीर : गौरी : 600-1000
कोथिंबीर : सटाणा 350-400, इंदूर : 200-250
मेथी 800-1100
शेपू 600-900
कांदापात 400-1000
चाकवत 300-500
करडई 300-500
पुदिना 200-250
अंबाडी 300-400
मुळे 400-1000
राजगिरा 300-400
चुका 300-400
चवळी 200-400
पालक 300-500