Last Update:
 
बाजारभाव

नगरमध्ये भाजीपाला तेजीत
-
Tuesday, July 03, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: market rate

 सूर्यकांत नेटके 

नगर - येथील बाजार समितीत गत सप्ताहात तुरीची सर्वाधिक 550 क्विंटल आवक झाली. तुरीला 3500 ते 3800 रुपये क्विंटल असा दर मिळाला. गूळ डागाची 1434
क्विंटल आवक झाली. गूळ डागाला 2600 ते 3100 रुपये क्विंटल असा दर मिळाला. भाजीपाल्याची आवकही या सप्ताहात चांगली राहिली. टोमॅटोची 762 क्विंटल आवक झाली. ओल्या भुईमूग शेंगा, कोथिंबीर, मेथी, काकडी, पालक, हिरवी मिरची यांनाही चांगली मागणी राहिली.

नगरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून भुसारसह भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. पाऊस लांबल्याचाही बाजारावर परिणाम झाला. तूर, बाजरी, ज्वारी, जाडा हरभरा, गूळ डाग, गहू या भुसारची आवक चांगली राहिली, मात्र इतर भुसार मालाची आवक अत्यंत अल्प होती. भाजीपाल्याची आवक व मागणीही चांगली मागणी राहिली. लांबलेल्या पावसाचा भाजीपाल्याच्या दरावर काहीसा परिणाम झाला असून दरात तेजी असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

नगर बाजार समितीत शेतीमालाची झालेली आवक व दर -
शेतीमाल ----------आवक---------------किमान --------------कमाल दर
ज्वारी 217 1551 1800
बाजरी 245 1500 1500
गहू 80 1650 1650
हरभरा गावरान 73 4350 4350
जाड हरभरा 84 4600 4600
तूर 550 3400 3700 रुपये प्रति क्विंटल

भाजीपाला - (दर प्रति दहा किलो)
टोमॅटो 762 40 120
वांगी 261 70 230
फ्लॉवर 165 100 150
कोबी 112 100 200
गवार 72 250 400
काकडी 205 60 120
भेंडी 188 200 220
बटाटे 1011 100 150
हिरवी मिरची 196 300 500
गावरान लसूण 68 100 250
भुईमूग शेंगा 1611 200 300

पालेभाज्या - (शंभर जुड्या)
मेथी 7310 500 1000
कोथिंबीर 8500 1000 1500
शेपू 3420 200 500
पालक 3900 300 700


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: