Last Update:
 
बाजारभाव

कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढ
-
Tuesday, July 03, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: market rate

 राजकुमार चौगुले 
हिरवी मिरची, गवार, कारली तेजीत; आंब्याची नाममात्र आवक

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात हिरवी (ओली) मिरची, गवार, कारली आदी भाजीपाल्याच्या दरातील तेजी कायम होती. हिरव्या (ओली) मिरचीस 300 ते 450 रुपये, गवारीस 150 ते 300 रुपये, कारल्याला 125 ते 250 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. टोमॅटो, वांग्याच्या आवकेतील वाढ कायम होती.

टोमॅटोची अठराशे ते दोन हजार पेट्यांची आवक होती. टोमॅटोस 50 ते 150 रुपये तर वांग्याला 20 ते 150 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. वांग्याची दररोज सातशे ते आठशे करंड्या आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत काहीशी वाढ झाली.

मागील सप्ताहात कोथिंबिरीची पंधरा ते वीस हजार पेंढ्या इतकी आवक झाली. गतसप्ताहात ही आवक चोवीस हजार पेंढ्यांपर्यंत वाढली. कोथिंबिरीस शेकडा 200 ते 750 रुपये दर होता. मेथीची पंधरा हजार पेंढ्यांची आवक झाली. मेथीस शेकडा 400 ते 700 रुपये दर होता. पोकळा, शेपूस शेकडा 300 ते 400 रुपये दर मिळाला.
बाजार समितीत कांद्याची सुमारे चार हजार पोती आवक झाली. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत काहीशी घट होती. कांद्याला 30 ते 80 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. बटाट्याला 100 ते 140 रुपये तर लसणास 80 ते 180 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.

या सप्ताहात आंब्याची आवक नाममात्र झाली. मद्रास आंब्याच्या चार डझनाच्या पेटीस 200 ते 450 रुपये दर मिळाला. नीलम आंब्याची पस्तीस ते पन्नास डझन आवक होती. नीलम आंब्याच्या दोन डझनाच्या पेटीस 100 ते 125 रुपये दर मिळाला. दशहरी आंब्याची तीनशे ते चारशे पेट्यांची आवक झाली. दशहरी आंब्याच्या दोन डझनाच्या पेटीस 200 ते 425 रुपये दर मिळाला. तोतापुरीची सतरा टन आवक झाली. तोतापुरीला टनास 11,000 ते 16,000 रुपये दर होता. जिल्ह्याच्या पूर्व भागातून पेरूची पन्नास ते साठ बॉक्‍सची आवक झाली. पेरूस शेकडा 125 ते 200 रुपये दर मिळाला.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: