Last Update:
 
मुख्य पान

कोकणात पावसाचा जोर वाढणार
- (प्रतिनिधी)
Wednesday, July 11, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: konkan,   monsoon

पुणे - पश्‍चिम किनारपट्टीवरील किनारी कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार व सक्रियता पुन्हा वाढली आहे. यामुळे बुधवारी (ता. 11) किनारपट्टीसह राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेश व लगतच्या राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. केरळपासून गोव्यापर्यंत सक्रिय असलेल्या किनारी कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार उत्तर कोकणापर्यंत वाढला आहे. पश्‍चिम किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांची गर्दी झालेली आहे.

दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) उत्तरेतील आगेकूच सुरूच आहे. उत्तर गुजरात व राजस्थानचा उर्वरित भाग व्यापून आज (बुधवारी) मॉन्सून संपूर्ण देश व्यापण्याचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळपर्यंत विदर्भात मॉन्सून सक्रिय होता. कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

मंगळवारी (ता.10) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये -
 ठाणे 46.6, कल्याण 45, भिवंडी 30, वसई 41, डहाणू 64.5, मोखाडा 39.2, अंबरनाथ 42.6, रायगड - पनवेल 29.4, कर्जत 70, खालापूर 86, उरण 49.5, पेण 44.2, रोहा 19, रत्नागिरी - मंडणगड 12, राजापूर 14, सिंधुदुर्ग - वेंगुर्ला 17, दोडामार्ग 14, नाशिक - मालेगाव 10, इगतपुरी 44, पेठ 22, त्र्यंबकेश्‍वर 7, धुळे 12, नंदुरबार - अक्कलकुआ 15, जळगाव 9.5, एरंडोल 36, पारोळा 23.1, पाचोरा 18.8, नगर 10.4, अकोला 7, संगमनेर 4, पुणे - जुन्नर 4, सोलापूर 1.5, माळशिरस 23, सातारा 1, महाबळेश्‍वर 18.7, कोल्हापूर - शिरोळ 42, राधानगरी 10, गगनबावडा 28, औरंगाबाद 70, खुलताबाद 21, सिल्लोड 18.1, फुलंब्री 10.3, जालना 10, जाफराबाद 10, बदनापूर 35.8, नांदेड - मुखेड 12, परभणी 7, गंगाखेड 19, पूर्णा 15, बुलडाणा - संग्रामपूर 35, सिंदखेडराजा 10, अकोला - अकोट 9.4, तेल्हारा 15, मूर्तिजापूर 16, अमरावती 9, धार्णी 16.2, दर्यापूर 21.8, यवतमाळ - दिग्रस 10, झरिजामणी 7, वर्धा - करंजा 12, नागपूर 4, हिंगणी 10.2, सावनेर 6.2, भंडारा 6.6, मोहाडी 36.5, तुमसर 35, पवनी 14.4, साकोली 32, लखानी 15, गोंदिया 36.8, आमगाव 25.3, तिरोडा 25.6, गोरेगाव 69.1, सालेकसा 20.6, देवरी 22, गडचिरोली - कोर्ची 18.7.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: