Last Update:
 
बाजारभाव

अकोला बाजार समितीतील आवकेवर संततधारेचा परिणाम
- (प्रतिनिधी)
Wednesday, July 11, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: market rate
अकोला - जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या परिणामी स्थानिक बाजार समितीमधील व्यवहारही प्रभावित झाले आहेत. पेरणीयोग्य पावसामुळे समाधानी असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप कामाला वेग दिल्याने बाजारातील शेतीमाल घटल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मंगळवारी (ता. 10) सकाळी काही वेळ पावसाने उघडीप दिल्याने बाजार समितीतील व्यवहार काही अंशी रुळावर आले होते. त्यानंतर परत पावसाने हजेरी लावली. सकाळच्या सत्रात बाजारात भुईमूग शेंगांची 23 क्‍विंटल आवक झाली. 4300 ते 4490 रुपये प्रति क्‍विंटल दराने खरेदी झाली. त्या पाठोपाठ मुगाची 38 क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. मुगाला 3700 ते 4000 रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. 48 क्‍विंटल आवक झालेल्या ज्वारीला 1000 ते 1150 रुपये प्रति क्‍विंटलचा दर राहिला. गव्हाची आवकही जेमतेम नोंदविण्यात आली. 60 क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाची 1285 ते 1375 रुपये प्रति क्‍विंटल दराने खरेदी झाली. 4625 ते 5000 रुपये प्रति क्‍विंटल दर असलेल्या हरभऱ्याची 104 क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. उडदाची 106 क्‍विंटल आवक होत 3100 ते 3600 रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. 320 क्‍विंटल आवक झालेल्या तुरीला 3650 ते 4350 रुपये प्रति क्‍विंटलचा दर होता. 4050 ते 4175 रुपये क्‍विंटल दराने खरेदी झालेल्या सोयाबीनची सर्वाधिक 331 क्‍विंटल आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: