Last Update:
 
बाजारभाव

नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर
- (प्रतिनिधी)
Friday, July 13, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: market rate
नगर - येथील बाजार समितीत बुधवारी (ता. 11) भुसारची 212 क्विंटल आवक झाली. भुसारची आवक कमी झाली आहे. भाजीपाल्याची आवक व दर स्थिर आहेत. भाजीपाल्यात बुधवारी भुईमूग शेंगा, बटाटे, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर यांची आवक चांगली राहिली.
बाजार समितीत ज्वारीची 15 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1700 ते 3000 रुपये क्विंटल असा दर मिळाला. गव्हाची सर्वाधिक 163 क्विंटल आवक झाली. गव्हाला 1400 ते 1700 रुपये क्विंटल असा दर मिळाला. जाड हरभऱ्याची पाच क्विंटल आवक झाली. या हरभऱ्याला 4500 ते 5100 रुपये क्विंटल असा दर मिळाला.
गूळ डागाची 528 क्विंटल आवक झाली. बाजरीची अवघी 11 क्विंटल आवक झाली. बाजरीला 1380 ते 1425 रुपये क्विंटल असा दर मिळाला. गूळ डागाला 2800 ते 3100 रुपये क्विंटल असा दर मिळाला. मक्‍याची सहा क्विंटल आवक झाली. मक्‍याला कमाल 1185 रुपये क्विंटल असा दर मिळाला.

भाजीपाल्याची आवक व दर असे (प्रति दहा किलो) -
शेतीमाल.....आवक.....किमान.......कमाल दर
टोमॅटो ...... 42.......100......... 160
वांगी........33........80............ 200
फ्लॉवर.....18........80.............200
कोबी....... 19.......100.......... 200
गवार......14.........200.......... 250
कारले..... 6 ....... 160...........200
काकडी ...22..... 60............. 130
भेंडी .......15 .....140 ...........200
बटाटे......261.....120.......... 140
हिरवी मिरची.. 19... 400 ........550
भुईमूग शेंगा.... 432..250........ 310
गाजर........... 13.....100..... 200 रुपये

पालेभाज्या - (शंभर जुड्या)
शेतीमाल.........आवक....... किमान.......कमाल
मेथी .............950..........500 ......1000
कोथिंबीर..........1380.......1000... 1800
शेपू................225..........500...... 700
पालक............ 750 ........ 500........ 800 रुपये


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: