कोकण, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज
-
Sunday, July 15, 2012 AT 01:30 AM (IST)
पुणे (प्रतिनिधी)- बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, ढगांची निर्मिती होत नसल्याने आणखी काही दिवस दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 48 तासांत कोकण गोव्यासह विदर्भातील बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात सर्वत्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राअभावी कोकणातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तर मुंबई आणि परिसरातील तलाव क्षेत्रात पावसाची नोंद झालेली नाही.
शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटर) पुढीलप्रमाणे-
चिपळूण - 40, संगमेश्वर - 30, अलिबाग - 20, रत्नागिरी - 10, ठाणे - 10
मध्य महाराष्ट्रात गगनबावडा - 30, महाबळेश्वर - 10, इगतपुरी - 40
मराठवाडा- सेनगाव - 20, पोटादा, हिंगोली, परभणी - 10.
विदर्भ- रामटेक, एटापल्ली - 50, रिसोड - 40, वर्धा - 30, ब्रह्मपुरी - 20, वाशीम -10, गोंदिया 10.
घाटमाथा- भिरा, अंबोणे, दावडी, डोंगरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी - 30, कोयना - 20, लोणावळा - 10.