Last Update:
 
बाजारभाव

नगरमध्ये भाजीपाला तेजीत
-
Tuesday, July 17, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: market rate
सूर्यकांत नेटके
नगर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात भुसारची आवक चांगली राहिली. यात ज्वारीची सर्वाधिक 539 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1400 ते 2400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गूळ डागाची 1647 क्विंटल आवक झाली. गूळ डागाला 2825 ते 3100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. हुलग्याची (कुलथी) पहिल्यांदाच 53 क्विंटल आवक झाली. हुलग्याला 2000 ते 3000 रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. बाजरीची 277 क्विंटल आवक झाली. बाजरीला 1250 ते 1475 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. भाजीपाल्याची आवक स्थिर असली तरी दरात मात्र तेजी आहे.
भुसारमध्ये ज्वारी, तूर, बाजरी, ज्वारी, जाड हरभरा, गूळ डाग, गहू, मका, यांची आवक चांगली राहिली; मात्र अन्य भुसार मालाची आवक अत्यंत अल्प होती. भाजीपाल्याची आवक व मागणीही चांगली राहिली. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम होत असून आवक स्थिर असली तरी दरात मात्र तेजी आहे. पावसाला चांगली सुरवात झाल्याशिवाय भुसारसह भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

नगर बाजार समितीत शेतीमालाची झालेली आवक व दर -

शेतीमाल ----------आवक---------------किमान --------------कमाल दर
ज्वारी 539 1400 2400
बाजरी 277 1250 1475
गहू 271 1600 1600
हरभरा गावरान 8 4400 4400
जाडा हरभरा 55 4900 5200
तूर 129 3200 3501
कुलथी 53 2000 3000
गूळ डाग 1647 2855 3100 रुपये प्रति क्विंटल

भाजीपाला - (प्रति दहा किलोचे दर)
टोमॅटो 746 80 150
वांगी 198 80 200
फ्लॉवर 155 100 250
कोबी 87 70 100
गवार 62 300 350
काकडी 212 80 200
भेंडी 167 150 250
बटाटे 1204 110 140
हिरवी मिरची 215 300 400
गावरान लसूण 73 100 350
भुईमूग शेंगा 1586 250 300 रुपये

पालेभाज्या - (शंभर जुड्या)
मेथी 7130 500 800
कोथिंबीर 8336 1000 1500
शेपू 3288 300 500
पालक 3780 500 800









 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: