मुंबईत बटाटा 1300 ते 1550 रुपये
- (प्रतिनिधी)
Wednesday, July 18, 2012 AT 01:30 AM (IST)
मुंबई - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाचे दर तेजीत आहेत. सोमवारी (ता. 16) वाशी मार्केटमध्ये कांद्याची 10,050 क्विंटल आवक झाली.
कांद्याला 600 ते 840 रुपये, तर सरासरी 720 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची 10,320 क्विंटल आवक झाली. बटाट्याला 1300 ते 1550 रुपये, तर सरासरी 1424 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. लसणाची 720 क्विंटल आवक झाली. लसणाला 900 ते 1600 रुपये, तर सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
राज्यातील अनेक भागांत अजूनही मॉन्सूनने समाधानकारक हजेरी लावलेली नाही, परिणामी येथील बाजार समितीत होणारी भाजीपाल्याची आवक मंदावल्याचे येथील व्यापारी रवी बारवे यांनी सांगितले. बाजार समितीत भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, शेवगा शेंगेचे दर वधारले आहेत. भेंडीची 1240 क्विंटल आवक झाली. भेंडीला 80 ते 180 रुपये, तर सरासरी 130 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरची 1350 क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला 80 ते 120 रुपये, तर सरासरी 100 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. टोमॅटोची 3550 क्विंटल आवक झाली. टोमॅटोला 60 ते 260 रुपये, तर सरासरी 160 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. वांग्याची 280 क्विंटल आवक झाली. वांग्याला 40 ते 100 रुपये, तर सरासरी 70 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. वाटाण्याची आवक मुख्यत्वे उत्तर भारतातून होत आहे. वाटाण्याला सरासरी 700 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. सोमवारी मुंबई मार्केटमध्ये 5040 क्विंटल डाळिंबाची आवक झाली होती. डाळिंबाला सरासरी 1250 रुपये प्रति डझन असा दर होता.
मुंबई बाजार समितीत शेतीमालाची झालेली आवक व दर -
शेतीमाल...........आवक..........किमान..........कमाल...........सरासरी दर
भुईमूग शेंगा .....---.............220............270.............245
गवार .............---..............260............300............280
शेवगा.......... 700............200............260..............230
तोंडली.......... 200 ...........120...........300..............210
वालवर..........---.............. 260...........300...............280
ढोबळी मिरची .520........... 240............280.................260 रुपये प्रति दहा किलो
फळे
अननस........ 440 ..........1000.........2000...............1500
कलिंगड...... 1190..........700...........1500...............1100
मोसंबी........ 1970 .........600...........1800...............1400 रुपये प्रति क्विंटल