Last Update:
 
प्रादेशिक

शेतकऱ्यांना 14 ऑगस्टपूर्वी पीक कर्जवाटप करा
-
Thursday, August 09, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: buldhana,  banking
बुलडाणा- बॅंकांना दिलेल्या लक्ष्यांकाप पैकी राष्ट्रीयीकृत बॅंकेने 79 टक्के, विदर्भ क्षेत्रीय ग्राम ीण बॅंकेने 107 टक्के असे एकूण 85 टक्के कर्ज वाटप शेतकऱ्यांना केले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बॅंकांनी 14 ऑगस्टपर्यंत 100 टक्के कर्जवाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी बी. जी. वाघ या ंनी दिले.
जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.7) पीक कर्जवाटप आढावा बैठक झाली. या वेळी श्री. वाघ यांनी अधिकाऱ्यांना ही सूचना केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस रिझ र्व्ह बॅंकेने नवीन ठेवी स्वीकारण्यास निर्बंध लागू के ल्याने, तसेच राज्य बॅंकेने पुनर्वित्त कर्जपुरवठा न के ल्यामुळे बॅंकेस पीक कर्जवाटप होऊ शकले नाही. त्यामुळे बॅंकेने 16 जूनपर्यंत दिलेल्या लक्ष्यांकापैकी 28 हजार 593 सभासदांना 103 कोटी 19 लाख रुपये वाटप केले. उर्वरित 134.42 कोटी रुपयांचा लक्ष्यांक जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बॅंकेस विभागून देण्यात आला होता. सन 2011-12 या वर्षात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 34 हजार 105 शेतकऱ्यांनी कर्ज निरंक करून चालू वर्षी ते कर्ज घे ण्यास पात्र ठरले. तसेच 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आलेल्या सात तालुक्‍यांतील 21 हजार 45 शेतकरी असे 55 हजार 150 शेतकरी कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. गेल्या वर्षी जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या व या वर्षी कर्ज घेण्यास पात्र असलेल्या, परंतु कर्ज मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्या ंनी त्यांना कर्ज हवे असल्यास तहसीलदार, सहायक निबंधकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही वाघ यांनी केले आहे.



 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: