नगरला 475 क्विंटल गूळ डागांची आवक
- (प्रतिनिधी)
Friday, August 10, 2012 AT 01:15 AM (IST)
नगर - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 8) भुसार मालाची 535 क्विंटल, तर 475 क्विंटल गूळ डागांची आवक झाली. भुसारमध्ये सर्वाधिक बाजरीची 246 क्विंटल आवक झाली. बाजरीला 1475 ते 1741 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
ज्वारीची 127 क्विंटलची आवक होऊन 1500 ते 2200 चा दर मिळाला. गव्हाची 93 क्विंटल आवक होऊन 1451 ते 1869 चा दर मिळाला. गूळ डागाला 2800 ते 3400 चा दर मिळाला. इतर भुसारची आवक अल्पच राहिली. मठाला 5100 चा कमाल व किमान दर मिळत असला तरी मठाची आवक मात्र अल्प आहे. मठाची अवघी दहा क्विंटलची आवक झाली. जाड्या हरभऱ्यालाही चांगला दर आहे. जाड्या हरभऱ्याची 19 क्विंटलची आवक झाली व 4000 ते 5700चा दर मिळाला. कुलथीची 37 क्विंटलची आवक होऊन 1675 ते 2000 रुपयांचा दर मिळाला.
करडई, शेंगा, मोहरी, हावरी, तूर, मूग, उडीद, धना, मिरची, सोयाबीन, चवळी यांची आवक झाली नाही. नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातही अजून चांगला पाऊस नाही. याचा खरिपावर परिणाम झाला आहेच; पण बाजारात भुसारची आवक अल्प तर भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. भुसारच्या काही मालाला चांगला दर असला तरी शेतकऱ्यांकडे माल नाही अशी नगरची स्थिती आहे.
भाजीपाला (दर प्रती दहा किलो) -
शेतीमाल आवक किमान दर कमाल दर
टोमॅटो 212 50 200
वांगी- 25 80 200
फ्लॉवर 199 80 200
कोबी 175 40 90
गवार 6 220 450
कार्ले 12 100 150
काकडी 39 50 100
भेंडी 50 100 250
बटाटे 311 160 170
हिरवी मिरची 15 200 350
भुईमूग शेंगा 400 300 400
लिंबू 25 150 250,
गावरान लसूण 150 100 500
आले 25 160 200
दुधी भोपळा 20 40 80
सिमला मिरची 15 100 250 रुपये
पालेभाज्या - (शंभर जुड्या)
मेथी 3300 200 400
कोथिंबीर 1012 200 500
पालक 800 200 300
शेपू 400 200 300