शेतीमाल दरनिश्चिती प्रक्रियेत धोरणात्मक बदल गरजेचे - पटेल
- (प्रतिनिधी)
Monday, August 20, 2012 AT 02:15 AM (IST)
राहुरी विद्यापीठ, जि. नगर - शेतीमालाचे दर निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र व धोरणात्मक बदल गरजेचे आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये नुकतीच शेतीमाल भाव समितीच्या तांत्रिक उपसमितीची बैठक झाली. त्या वेळी पाशा पटेल बोलत होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसनराव गोरे, आमदार बाबासाहेब पाटील, शंकरअण्णा धोंडगे, मुख्य सांख्यिकी श्री. बनसोडे, कृषिमूल्य आयोग मुंबईचे सहसंचालक श्रीमती आर. डी. रेडकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे, डॉ. दादाभाऊ यादव (राहुरी), डॉ. एच. के. पाटील (दापोली), डॉ. बी. एन. गणवीर (अकोला), डॉ. के. व्ही. देशमुख (परभणी), शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे म्हणाले, की शेतीमाल भाव समितीच्या "सॅंपल'ची संख्या 5000 च्या वर आहे. हवामान बदलाचा अभ्यास करून त्याआधारे भाव ठरविणे गरजेचे आहे. तसेच समितीची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे.
कुलगुरू डॉ. किसनराव गोरे म्हणाले, की शेतीमाल दर निश्चितीची प्रचलित पद्धत बदलणे गरजेचे आहे. प्रास्ताविक डॉ. दादाभाऊ यादव यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. वसंत पोखरकर यांनी केले व आभार डॉ. अरुण गवळी यांनी मानले.