Last Update:
 
प्रादेशिक

गडचिरोलीसाठी 200 सोलर पंप मंजूर
-
Friday, November 23, 2012 AT 02:45 AM (IST)
गडचिरोली : शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 200 सोलर पंप मंजूर करण्यात आले असून, 191 सोलर पंप सध्या कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच (ता. 21) मिळाली आहे. जिल्ह्यातील खेडेगावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेकदा पाणीपुरवठा ठप्प होतो. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जेवर आधारित 146 ग्रामपंचायतींना सोलर पंप मंजूर केले. या 146 ग्रामपंचायतींमध्ये 188 गावांचा समावेश आहे. एक सोलर पंप 30 ते 35 घरांसाठी उपयोगी पडत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत 191 सोलर पंप कार्यान्वित करण्यात आले असून, पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: