Last Update:
 
ऍग्रो मार्केट

कृषिप्रक्रिया अभियांत्रिकी विभाग:ऍग्रेस्को शिफारशी
-
Monday, July 22, 2013 AT 03:15 AM (IST)
Tags: agro market,  agrowan
हळदीच्या जास्त उताऱ्यासाठी आणि कुरकुमीन टिकविण्याकरिता 200 किलो क्षमतेच्या कुक्कर यंत्रामध्ये 15 मिनिटे (1.02 कि/ सें.मी. दाबास) हळद वाफेवर शिजवावी. 
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

बिब्बा फोडण्याकरिता पंकृवि बिब्बा फोडणी यंत्राचा वापर करावा.
जनावरांना लागणाऱ्या खाद्य कांड्या तयार करण्यासाठी पंकृवि खाद्य कांड्या यंत्राचा वापर करावा.
अंबाडीच्या बोंडापासून पाकळ्या वेगळ्या करण्यासाठी पंकृवि अंबाडी पाकळ्या निष्कासन यंत्राचा वापर करावा.
पंकृवि सतत उष्ण वायू झोत पफिंग यंत्राचा तेलविरहित फराळ पदार्थ तयार करण्यासाठी वापर करावा.
कांदा बीज निष्कासन करण्यासाठी पंकृवि कांदा बीज निष्कासन यंत्राचा वापर करावा.
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

उत्तम प्रतीच्या वड्या बनविण्यासाठी उडीद व मूग डाळींमध्ये 20 टक्के सोया दूध तयार करताना मिळालेला चोथा वापरावा. वड्या 60 अंश से. तापमानावर शुष्ककामध्ये वाळविण्याची शिफारस करण्यात येते. 

बाटली बंद सोया दुधाचे आयुर्मान 170 दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी त्यावर निर्जंतुकीकरण प्रक्रिया करून रेफ्रिजरेटेड तापमानास ठेवावे. 

केळीचे वाहतुकीदरम्यान कंपनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केळीच्या फण्या फोम शीटमध्ये वेष्टणिकृत करून प्लॅस्टिक क्रेटमध्ये वाहतूक करावी.
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: