Last Update:
 
मुख्य पान

चाहूल उन्हाळ्याची
-
Thursday, February 16, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   tempreture
पुणे - राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही भागांतील किमान आणि कमाल तापमानात जरी चढ-उतार होत असला, तरी सर्वांना आता उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे बुधवारी (ता. १५) किमान १२.९ अंश सेल्सिअस तापमान होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या काही भागांत, तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील काही भागातील किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. भिरा येथे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात ५.० अंश सेल्सिअसने वाढ होऊऩ किमान तापमानाचा पारा २०.५ अंश सेल्सिअसवर होता. त्या पाठोपाठ सातारा, नाशिक येथील किमान तापमानात चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

राज्यातील रत्नागिरीमध्ये कमाल तापमानात ५.९ अंश सेल्सिअसची वाढ झाली अाहे. तर कमाल तापमानाची ३६.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. रत्नागिरीपाठोपाठ मुंबईतील कमाल तापमानही वाढले आहे. गेल्‍या चोवीस तासामध्ये हवामान कोरडे होते. रविवारपर्यत (ता. १९) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.८ (३), नगर १२.९ (-१), जळगाव १५.२ (१), कोल्हापूर १८.६ (२), महाबळेश्वर १६.४ (२), मालेगाव १६.० (४), नाशिक १५.८ (४), सांगली १७.० (२), सातारा १९.० (४), सोलापूर १७.८, सांताक्रूझ १९.३ (१), अलिबाग २१.०(३), रत्नागिरी २०.८ (१), डहाणू २१.४ (४), भिरा २०.५ (५), अौरंगाबाद १७.६ (४), परभणी १८.१ (१), अकोला १८.९ (२), अमरावती १८.० (१), बुलडाणा १९.६ (३), चंद्रपूर १८.२ (१), नांदेड १८.५ (३), गोंदिया १५.८, नागपूर १६.७ (१), वर्धा १८.५ (२), यवतमाळ १८.० 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: