Last Update:
 
मुख्य पान

तापमानात चढ-उतार
-
Friday, February 17, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   tempreture
नगर १२.८; भिरा ३८.५ अंश सेल्सिअसवर

पुणे - राज्यातील काही भागातील किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी (ता. १६) नगर येथे किमान १२.६, तर भिरा येथे कमाल ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गुरुवारी राज्यातील अनेक भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात एक अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. भिरा येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन किमान तापमानाचा पारा २१.० अंश सेल्सिअसवर होता. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, कमाल तापमानाची ३८.५ अंश सेल्सिअसची नोंद येथे झाली आहे.

मुंबईमध्ये कमाल तापमानात ७.५ अंश सेल्सिअसची सर्वाधिक वाढ झाली आहे. तर कमाल तापमानाची ३६.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मुंबईपाठोपाठ रत्नागिरी, मालेगाव, सांगली येथील कमाल तापमानही वाढू लागले आहे. गेल्‍या चोवीस तासांमध्ये हवामान कोरडे होते. सोमवारपर्यंत (ता. २०) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.९ (२), नगर १२.६ (-१), जळगाव १६.५ (२), कोल्हापूर १८.७ (२), महाबळेश्वर १५.७ (२), मालेगाव १५.८ (३), नाशिक १४.८ (३), सांगली १९.२ (४), सातारा १८.२ (४), सोलापूर १६.८ (-१), सांताक्रूझ १९.० (१), अलिबाग २१.४(३), रत्नागिरी २१.० (२), डहाणू २१.७ (४), भिरा २१.० (५), अौरंगाबाद १६.२ (२), परभणी १५.६ (-१), अकोला १७.५ (१), अमरावती १७.४, बुलडाणा १९.० (२), चंद्रपूर १७.२, नांदेड १७.५ (२), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १५.८, वर्धा १७.५ (१), यवतमाळ १७.४ 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: