Last Update:
 
मुख्य पान

राज्याचा मुद्रांक शुल्क महसूल घटला
-
Friday, February 17, 2017 AT 06:15 AM (IST)
Tags: mumbai,   maharashtra,   farmers
मुंबई - राज्याच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असलेल्या मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) तून मिळणाऱ्या महसुलात तब्बल १ हजार कोटी रुपयांची घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी २०१७ पर्यंत ही घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुद्रांक महानिरीक्षक आणि जमाबंदी आयुक्तालयाने (IGR) गेल्या वर्षी जानेवारी २०१६ अखेरीस १७ हजार २४४ कोटी रुपयांचा महसूल जमवला होता. त्या तुलनेत यंदा १६ हजार २५४ कोटी इतकाच महसूल राज्यभरात जमा झाला आहे, असं IGR आणि मुद्रांक (स्टॅम्प)नियंत्रक एन रामास्वामी यांनी सांगितलं.
राज्य सरकारचा मालमत्ता नोंदणी (प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन) आणि मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) मधून मिळणारा दिवसाचा महसूल ६५ कोटींवरून ४२ कोटींपर्यंत घसरला आहे, असंही रामास्वामींनी सांगितलं. त्यामुळेच आपण राज्य सरकारला पत्र लिहून हस्तांतरित करण्यात येणाऱ्या मालमत्तांवरील १५०० कोटींची थकबाकी वसूल करावी. जर तसं झालं, तर जो महसुली तोटा जानेवारी २०१७ पर्यंत झाला, तो भरून काढता येईल, असं रामास्वामींनी म्हटलं आहे.
मायनिंग/खाण उद्योगाशी संबंधित महसूल मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्याबाबतचा उल्लेखही मी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात केला आहे. रेडीरेकनरनुसार झालेल्या व्यवहारांची स्टॅम्प ड्युटी ऑनलाइन आणि डीडीद्वारे भरली आहे. तरीही महसूल घसरला आहे, असं रामास्वामींनी सांगितलं. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागांत सर्वप्रकारच्या मालमत्तांचे खरेदी-विक्री, भाडेकरार व्यवहार होतात. उत्पादन शुल्क विभागानंतरचा राज्य सरकारचा हा दुसरा सर्वांत मोठा विभाग आहे. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: