Last Update:
 
मुख्य पान

विदर्भातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण
-
Tuesday, March 21, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,  
पुणे - मुंबईतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंत भिरा येथे ४१.५ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर विदर्भातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते, तर राज्यातील पुणे येथे १५.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशच्या पूर्व भागाचा परिसर ते तमिळनाडूचा दक्षिण भाग, विदर्भ, तेलंगण आणि रायलसीमाच्या भागात कमी दाबाची स्थिती आहे. या स्थितीची चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. अशीची स्थिती पश्चिम बंगाल भागात आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या गुरुवारपर्यंत (ता. २३) गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे परिसरात शनिवारी (ता. २५) ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तपामान सरासरीच्या जवळपास होते.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
: पुणे ३४.६ (१५.०), जळगाव ३६.६ (१७.६), कोल्हापूर ३६.५ (२०.७), महाबळेश्वर ३०.७ (१७.४), मालेगाव ३७.२ (१८.८), नाशिक ३३.७ (१६.२), सांगली ३८.० (१९.४), सातारा ३६.७ (१८.०), सोलापूर ३८.० (१९.४), सांताक्रूझ ३३.७ (२०.२), अलिबाग २९.१ (२१.०), रत्नागिरी ३२.४ (२१.०), डहाणू ३१.६ (२२.७), अौरंगाबाद ३५.२ (२०.२), परभणी ३७.५ (१९.६), अकोला ३७.३ (१९.०), अमरावती ३५.२ (२०.६), बुलडाणा ३४.२ (१९.८), चंद्रपूर ३७.० (२२.२), नांदेड (१९.०), गोंदिया ३५.२ (१७.२), नागपूर ३७.५ (१९.०), वर्धा ३८.५ (२०.०), यवतमाळ ३६.० (२०.४)



 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: