Last Update:
 
मुख्य पान

पशुधन विमा योजना कुचकामी?
-
Tuesday, March 21, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: mumbai,   maharashtra
- राज्याची तरतूद अपुरी, केंद्राचे अनुदानही तुटपुंजे
-आर्थिक सर्वेक्षण अहवालातून स्पष्टोक्ती

मुंबई - राज्यातील ३२ दशलक्ष जनावरांपैकी निव्वळ २० हजार ७१२ पशूंच्या विम्याच्या दाव्यापोटी पाच कोटी रुपये खर्च झाल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्याची अपुरी तरदूत आणि केंद्राकडून त्या तुलनेत मिळणार तुटपुंजे अनुदान पाहत शासनाची पशुधन विमा योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून २००६-०७ वर्षापासून राज्यात पशुधन विमा राबवण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सहा जिल्ह्यांत राबवल्यानंतर २०१० -११ पासून या योजनेचा विस्तार १८ जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. सुरवातीपासून निधीअभावी ही योजना अपयशाच्या भोवऱ्यात सापडली आहे. २०१५-१६ वर्षामधे सर्वाधिक ५ कोटी खर्च करताना २०७१२ जनावरांचा विमा दावे निकाली काढण्यात आल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामधे केंद्र सरकारने २.७९ कोटी तर राज्यहिश्शाचे २.२१ कोटी रुपये रक्कम आहे. २०१२ च्या पशुगणनेनुसार राज्यातील पशुधनाची संख्या ३२ दशलक्ष आहे. २०१४-१५ मधे पशुधन विमा योजनेतून फक्त १३.६३ लाख रुपये खर्च झाला होता. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: