म्हशींच्या बाबतीत वेळेच्या नियमितपणाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे खाद्य, चारा, दूधसंकलन, स्वच्छता, व्यायाम या दैनंदिन बाबी अगदी वेळेवर होणे महत्त्वाचे ठरते. प्रक्षेत्रावर घडणाऱ्या सर्व बाबींच्या नोंदी ठेवणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग असतो. म्हशींच्या नवजात पारड्यांसाठी पहिल्या दीड महिन्यात वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे असते, तर पुढील तीन महिने त्यांना नियंत्रणात वाढविणे उपयोगी ठरते.
1) सुरू उसाची लागवड ः सुरू उसाच्या लागवडीसाठी सध्याचे हवामान उत्तम आहे. लागवडीसाठी 10 ते 11 महिने वयाचे बेणे निवडावे. बेणे पाच वर्षांतून एकदा बदलावे. बियाणे रसरशीत, निरोगी आणि जातिवंत असावे. को-86032 किंवा फुले 265 या जाती लागवडीसाठी उत्तम आहेत. कारण या जातींचा खोडवा उत्तम येतो. हेक्टरी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश द्यावे. यापैकी 25 किलो नत्र 115 किलो स्फुरद व पालाश लागवडीचे वेळी द्यावा.
आंबा सल्ला दरवर्षीच्या तुलनेपेक्षा यंदाचे हवामान आंब्यासाठी अनुकूल आहे. हिवाळा लांबल्यामुळे आता जी फळे सेट झाली आहेत, त्यांची गळ कमी प्रमाणात होईल. परंतु आता जो नवीन मोहोर येत आहे, तो उशिराने आल्यामुळे तो उन्हात सापडण्याची शक्यता असल्याने तो टिकणे अवघड आहे. या मोहोराची फळे सेट झाल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात गळ होण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो.
गोकुळ पवार, पिंपळवाडी, जि. उस्मानाबाद प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या (6 इंच x 4 इंच) घेऊन त्यास चार ते पाच मोठी छिद्रे पाडावीत. पोयटा माती (एक भाग), कुजलेले शेणखत (एक भाग) आणि वाळू (एक भाग) एकत्रित मिसळून मिश्रण तयार करावे. एक ट्रेलर मिश्रणासाठी 25 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे. मिश्रण तयार झाल्यावर पिशवीमध्ये प्रथम थोडी वाळू व त्यानंतर मिश्रणाची पिशवी एक इंच रिकामी राहील या पद्धतीने भरावी.
* बागेभोवती संजीव कुंपण नसल्यास कडबी, सरमट, उसाचे पाचट व बांबू यांचे झाप करून घेऊन बागेभोवती लावावेत. यामुळे थंड हवा बागेत शिरणार नाही. * शिफारशीप्रमाणे योग्य मात्रेत व पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. लहान अवस्थेतील बागांना थंडीचा जोर कायम असल्यास फवारणीतून अन्नद्रव्ये द्यावीत. * शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. * जमिनीची जलधारणा शक्ती टिकून राहावी म्हणून सेंद्रिय खते द्यावीत.
म्हशींचे शास्त्रोक्त संगोपन - आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठीसुद्धा रेड्यांचा वापर केला जातो. जाती - 1) मुऱ्हा - उत्तर भारतात उगमस्थान असलेली ही जात महाराष्ट्रातही आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो.
1) क्षारयुक्त, चोपण व चुनखडीयुक्त जमिनींची सुधारणा कशी करावी? सुरेश चौगुले, हेरवाड, जि. कोल्हापूर क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले क्षार खरडून, एकत्र जमवून शेताबाहेर टाकून द्यावेत. जमिनीत लहान लहान वाफे तयार करून त्यात थोडा वेळ पाणी साठवून ते एकदम चरावाटे बाहेर काढून द्यावे. धैंचा, ताग यासारखी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीतच गाडावीत. भरखतांचा वापर जास्त करावा.
1) उन्हाळी तिळाची लागवड कधी करावी? श्रावण बडगुजर, मु.पो. लोहारी, जि. जळगाव उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्टरी आठ क्विंटल मिळते. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
गेल्या दोन वर्षांत हिवाळा सर्वसाधारण राहिला. गेल्या वर्षी हवामान अनुकूल राहिले, त्यामुळे केसर आंबा वेळेवर आला. पीक चांगले आले. आंब्यासाठी जशी थंडीची आवश्यकता असते, तशाच प्रकारे पावसाळा कसा होता यावरसुद्धा मोहोराचे गणित अवलंबून असते.
गेल्या दोन वर्षांत हिवाळा सर्वसाधारण राहिला. गेल्या वर्षी हवामान अनुकूल राहिले, त्यामुळे केसर आंबा वेळेवर आला. पीक चांगले आले. आंब्यासाठी जशी थंडीची आवश्यकता असते, तशाच प्रकारे पावसाळा कसा होता यावरसुद्धा मोहोराचे गणित अवलंबून असते.
जयसिंग साळुंखे, कोर्ले, जि. रत्नागिरी - चिकू लागवड केल्यानंतर सुरवातीच्या दोन वर्षांत कलमांच्या खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. लागवडीपासून पहिली तीन वर्षे कलमावरील फुले खुडून टाकावीत. कलमांच्या पूर्ण वाढीचा काळ आठ ते दहा वर्षांचा असतो. पहिल्या सहा वर्षांत चिकू लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांची लागवड करावी.
गोविंद चव्हाण, ढोबळेवाडी, लातूर कृषी अवजारे विषयातील तज्ज्ञ सुहास पाटील यांनी दिलेली माहिती ः रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यासाठी जादा शक्तीची गरज असते. ही शक्ती रोटाव्हेटरचा रोटर फिरविण्यासाठी, ट्रॅक्टरला योग्य गती देण्यासाठी तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्यक असते. तेव्हा पुरेशा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर निवडणे गरजेचे असते. रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचा पी.टी.ओ.
फळबाग लागवडीपूर्वी माती परीक्षणासाठी जमिनीचा रंग, खडकाळपणा, उंच-सखलपणा याप्रमाणे सारख्या गुणधर्मासाठी एक ते दोन हेक्टर क्षेत्राचे भाग पाडून त्याच्या मध्यभागी जास्तीत जास्त तीन फूट अथवा कठीण मुरूम अथवा खडकापर्यंत खड्डा घ्यावा. प्रत्येक एक फूट खोलीसाठी वेगळा नमुना घ्यावा. यासाठी एक फूट खड्डा पूर्ण झाल्यावर खड्ड्याच्या चार बाजूंची माती पाडून खड्ड्यामध्ये टाकावी. गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी.
नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावी. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झाडाच्या पानाची लांबी 4.5 ते 5.5 मीटर असते.
1) मोसंबी लागवडीविषयी माहिती द्यावी. राजेंद्र नागराळे, तिकोंडी, जि. सांगली सुरेश बोरले, निलंगा, जि. लातूर फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉ. कापसे यांनी दिलेली माहिती ः चोपण, क्षारपड जमिनीवर मोसंबीची लागवड टाळावी. मोसंबीसाठी मध्यम जमीन एक मीटर खोल काळी माती व त्याखाली नरम मुरूम असलेली जमीन लागवडीसाठी चांगली असते.
1) शंखी गोगलगायीचे नियंत्रण कसे करावे? सुरेश शेळके, नांदगाव, जि. नाशिक अजित अडकिने, उमरखेड, जि. यवतमाळ शंखी गोगलगाय सर्व प्रकारची पिके तृणधान्ये, भाजीपाला, फळपिके व शोभिवंत झाडांना नुकसान पोचविते. या गोगलगायी निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांचे नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात. शेतातील वापरात असलेली अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, जनावरे, वाहने या मार्फत यांचा प्रादुर्भाव होतो.
आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात, याबाबत मार्गदर्शन करावे. विजय तांबे, मु. पो. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात.
मोठ्या नारळाच्या झाडाला फळे लागत नाहीत? काय करावे? वसंत कुलकर्णी, ऐतवडे खुर्द, जि. सांगली नारळाला पुरेशा प्रमाणात खते दिली तर नारळ लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित फळांचे चांगले उत्पादन मिळते. नारळ लागवड करताना खड्ड्यामध्ये तीन टोपली शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेटही मातीत चांगले मिसळून मग लागवड करावी. पुढे टप्प्याटप्प्याने खते द्यावीत.
पूर्वहंगामी उसाचे व्यवस्थापन ः अ) काणीग्रस्त व गवताळ वाढीची बेटे काढून टाकावीत. ब) पूर्वहंगामी उसाची लागवड होऊन सहा ते आठ आठवडे झाले असल्यास हेक्टरी 136 किलो नत्राचा (300 किलो युरियाचा) दुसरा हप्ता द्यावा. नत्र युरिया खतामधून द्यावयाचे असल्यास लिंबोळी पेंडीच्या भुकटीचा वापर करावा. त्यासाठी एक किलो लिंबोळी भुकटी सहा किलो युरिया याप्रमाणे वापर करावा. त्यामुळे नत्र पिकाला हळूहळू उपलब्ध होऊन नत्राची बचत होते.
1) क्षारपड जमिनीचे व्यवस्थापन महत्त्वाचे : क्षारपड जमिनीची खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. नांगरणीसाठी सबसॉयलर अवजाराचा उपयोग करावा. सबसॉयलर हा एक प्रकारचा खोलवर नांगरट करणारा नांगरच असतो. जमिनीतील कडक पापुद्रे या नांगराने ढिले होतात आणि पाण्याचा निचरा होण्यास जागा मोकळी होते. गहू, ज्वारी, सोयाबीन, हिरवळीची पिके घेणे फायद्याचे असते.
कांदा बीजोत्पादनाबाबत माहिती द्यावी. विलगीकरणाचे अंतर किती ठेवावे? भागवत उफाड, मु.पो. नेर, ता.जि. जालना ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरता येतात. कारण या कांद्यांना पाच ते सहा महिने विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात. कांदा पीक बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. कंद लावल्यापासून ते फुलांचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान हवे असते.
1) मसाला पिकांची लागवड करायची आहे, यासाठी कोणत्या पिकांची लागवड करावी? विशाल गावडे, कणकवली, जि. सिंधुदुर्ग कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 x 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे.
ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे पुनर्वसन कायदा - भाग - 6 आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यात या कायद्याची उद्दिष्टे तडीस जाणेकामी आवश्यक असलेली कोणतीही जमीन खरेदी करता येईल किंवा तिची अदलाबदल करता येईल. संबंधित जमीन खरेदीची किंमत ही संपादनाप्रमाणेच असेल. याशिवाय प्रकल्प उद्दिष्टे गाठण्यासाठी आयुक्तांस परिमंडलातील गावठाणातील जमिनी संपादन करता येतील.
विहीर पुनर्भरण कसे करावे? - श्यामराव महाले, अमरावती कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी येथील तज्ज्ञ मदन पेंडके यांनी दिलेली माहिती ः शेतातील वाहून जाणारे पावसाचे पाणी विशिष्ट पद्धतीचा वापर करून विहिरीत सोडून विहिरींचे पुनर्भरण करता येते. यासाठी शेतातून वाहत येणारे पाणी विहिरीच्या बाजूला काही अंतरावर 6 ु 6 ु 6 फूट आकाराचा शोष खड्डा करून साठवावे. या खड्ड्यात विहिरीच्या दिशेने एक लहान खड्डा 4 ु 4 ु 4 फूट आकाराचा खोदावा.
पंधरवड्याचा डाळिंब सल्ला डॉ. व्ही. टी. जाधव, दिनकर ता. चौधरी 1) मृग बहर ः 1) पीक व्यवस्थापनात बागेला 17 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. 2) बाग तणमुक्त ठेवावी व बागेतील पानफुटवे काढत राहावे. 3) बागेतील रोगट फळे काढून नष्ट करावीत. पीक संरक्षण ः 1) तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगट फळे काढून झाल्यावर लगेच बोर्डेक्स (0.5 टक्के)ची फवारणी करून घ्यावी.
उसात बटाटा आंतरपीक फायद्याचे पूर्वहंगामी ऊस लागवडीचा सध्या हंगाम सुरू आहे. उसाबरोबर बटाटा हे आंतरपीक घेणे सहज सुलभ जाते. बटाटा हे थंड हवामानात वाढणारे आणि स्टार्च भरपूर साठवणारे पीक आहे, हवामानाचा अभ्यास करून एकाच शेतात दोन पिके घेण्याची संधी घेण्यासाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी 15 ते 20 क्विंटल बटाटा बियाणे लागते.
- संदीप वेंगुर्लेकर, देवगड अननस लागवडीसाठी क्यू, क्वीन, मॉरिशिअस, जायंट क्यू या जातींची निवड करावी. क्यू आणि क्वीन या जाती व्यापारीदृष्ट्या फायदेशीर आहेत. क्यू जातीला कॅनिंगसाठी मागणी आहे. या जातीची फळे दीड ते अडीच किलो वजनाची असतात. क्वीन जातीची फळे एक ते दीड किलो वजनाची असून, कापून खाण्यासाठी चांगली आहेत. अननस लागवड करताना जमीन चांगली नांगरून, कुळवून 30 ते 40 सें.मी. खोल भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
मोसंबीच्या आंबिया बहराच्या व्यवस्थापनाची माहिती द्यावी. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉ. कापसे यांनी दिलेली माहिती : मोसंबीमध्ये मृग बहर (मृगाच्या वेळेस मोहोर), हस्त बहर (हस्ताच्या वेळेस मोहोर), आंबिया बहर (आंबा मोहराच्या वेळेस मोहोर) असे निसर्गतः तीन बहर येतात.
पॉवर टिलरच्या वापराबाबत माहिती द्यावी गणेश कदम, सांगली, रोहिदास कोरडे, भुईंज, जि. सातारा डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर येथील तज्ज्ञ सुहास पाटील यांनी दिलेली माहिती : पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करण्याचे काम करता येते. एकाच वेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात. फळबागांमध्ये आंतरमशागत करते वेळी दहा ते 15 सें.मी. खोलीपर्यंतचे तण समूळ काढले जाते.
हिंगोली (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात फळबाग लागवड व वृक्षारोपणासाठी वसमतच्या कृषी विभागाच्या नर्सरीतून रोपे खरेदी करण्याऐवजी खासगी नर्सरीतून रोपे खरेदी केली जाऊ लागल्याने ही नर्सरी तोट्यात आली आहे, त्यास कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. वसमत येथे सुमारे तेरा हेक्टर क्षेत्रावर कृषी खात्याची नर्सरी आहे. या ठिकाणी आवळा, चिंच, सीताफळ, लिंबोळी या फळपिकांची रोपे तर आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू यांची कलमे तयार केली जातात.