Last Update:
 
ऍग्रो मार्केट
गुळाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे बटाटा उत्पादन कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे वाढ झाली आहे. मात्र कापूस, हळद, मका, सोयाबीन याच्या किमती स्थिर आहेत. तांबडी मिरची या सप्ताहात मिरचीच्या किमती दोन टक्‍क्‍यांनी चढल्या. ही वाढ तात्पुरती ठरण्याची शक्‍यता आहे. आवक जशी वाढेल तशा किमती उतरतील. गूळ या सप्ताहात गुळाच्या किमती तीन टक्‍क्‍यांनी उतरल्या.

Friday, February 10, 2012 AT 02:15 AM (IST)

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजार समितीत बाजरी, मक्‍याला चांगली मागणी राहिली, त्यांच्या भावातही तेजी होती. कांद्याचे भाव काहीसे वधारलेले राहिले. गतसप्ताहात समितीच्या आवारात बाजरीची 70 क्विंटल, मक्‍याची 80 क्विंटलपर्यंत आवक झाली. प्रामुख्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, माळशिरस या भागातूनच त्यांची आवक होती.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

लासलगाव, जि. नाशिक ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्याच्या आवकेत वाढ झाली. कांद्याची 97 हजार 10 क्विंटल आवक झाली. कांद्याला 101 ते 425 रुपये, तर सरासरी 350 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बाजार समितीने लासलगाव, उगाव, नैताळे, खानगाव येथे द्राक्षमणी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. उगाव येथे तात्पुरत्या खरेदी - विक्री केंद्रात द्राक्षाची 3173 क्रेट्‌स आवक झाली. सरासरी 12.75 रुपये प्रति किलो असा दर मिळाला.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

येवला, जि. नाशिक ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डावर, तसेच आंदरसूल उपबाजार आवारावर गत सप्ताहात नवीन लाल रांगडा कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सप्ताहात कांद्याची एकूण एक लाख 15 हजार 963 क्विंटल आवक होती. कांद्याला 200 ते 340 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. आंदरसूल उपबाजार आवारावर कांद्याची 45 हजार 27 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला 200 ते 340 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओली मिरची, ढोबळी मिरची, घेवडा, गवार, आदी भाज्यांची तेजी कायम राहिली. या भाज्यांस दहा किलोस 100 ते 300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून या भाज्यांमध्ये तेजीचे वातावरण कायम आहे. थंडीमुळे बऱ्याच भाजीपाल्यांची आवक जानेवारी महिन्यात वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंत घटली. या वेळी तेजीत आलेले भाव अद्यापही कायम आहेत.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

नाशिक : गत सप्ताहात नाशिकमधील द्राक्षांची आवक वाढली. थंडी कमी झाल्यानंतर जिल्हाभरातील शिवारसौद्यांत वाढ झाली आहे. गत सप्ताहात नाशिक भागामधून प्रत्येकी आठ टन वजनाच्या सरासरी 100 गाड्या उत्तर भारतातील बाजारपेठेत पाठविण्यात आल्या. या वेळी देशांतर्गत बाजारपेठेत सफेद वाणाच्या द्राक्षांना प्रति क्विंटलला किमान 2000, कमाल 5500 व सरासरी 4500 असे दर निघाले तर रंगीत, काळ्या द्राक्षांना किमान 3000, कमाल 7500 व सरासरी 5000 रुपये दर निघाले.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

या सप्ताहात गुळाच्या किमती सहा ते नऊ टक्‍क्‍यांनी वाढल्या. पुढील काही दिवस त्या वाढतच राहण्याचा संभव आहे. साखरेचे उत्पादन या हंगामात चांगले आहे, तसेच निर्यातीची शक्‍यता वाढली आहे. पुढील काही दिवस त्या वाढत राहतील असा अंदाज आहे. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. या महिन्यात नवीन पिकाची आवक सुरू होत आहे, त्यामुळे किमती अजून घसरण्याची शक्‍यता आहे. तांबडी मिरची ः या सप्ताहात मिरचीच्या किमती पाच टक्‍क्‍यांनी उतरल्या.

Friday, February 03, 2012 AT 02:00 AM (IST)

बटाट्याच्या उत्पादन क्षेत्रात हवामान कसे राहील त्यावर पुढील किमती अवलंबून राहतील. या वर्षी मुख्य आवक एप्रिल महिन्यापर्यंत राहील. मे 2012 नंतर किमती या दोन महिन्यांच्या तुलनेने अधिक राहतील. हळदीच्या किमती या पुढील काही दिवस किंवा आठवडे कमी राहण्याचा संभव आहे. या वर्षी उत्पादनसुद्धा चांगले होण्याची शक्‍यता आहे त्याचाही परिणाम किमतींवर होईल. बटाटा ः या वर्षीच्या फ्युचर्स किमती आलेख क्रमांक 1 मध्ये दाखवल्या आहेत.

Saturday, January 28, 2012 AT 03:15 AM (IST)

या सप्ताहात कपाशीच्या किमती एक ते चार टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी उत्पादनपूर्व अंदाज केल्यापेक्षा कमी होईल. अशी अपेक्षा असल्याने ही भाववाढ होत आहे. दक्षिण अमेरिकेतल्या सप्ताहात चांगला पाऊस झाल्याने मक्‍याचे उत्पादन काहीसे सुधारण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने मक्‍याचे दर घसरले आहेत. ब्राझीलमध्ये दुष्काळी परिस्थिती आणि चीनमधील वाढती मागणी यामुळे सोयाबीनच्या किमतीमध्ये वाढ दिसते आहे. डॉ. अरुण प्र.

Friday, January 13, 2012 AT 04:45 AM (IST)

मक्‍याच्या किमती परत वाढू लागल्या आहेत. गेल्या सप्ताहातील वाढ याही सप्ताहात दिसून आली. रब्बी उत्पादन या वर्षी कमी होण्याचा अंदाज आहे. निर्यात मागणीपण चांगली आहे. या वर्षी गव्हाचे उत्पादनसुद्धा चांगले होण्याची शक्‍यता आहे. गेल्या सप्ताहात किमती दोन ते पाच टक्‍क्‍यांनी वाढल्या. हरभऱ्यासारखीच ही वाढसुद्धा तात्पुरती असेल. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी तांबडी मिरची : साधारणपणे 8 डिसेंबरपासून मिरचीच्या किमती वाढू लागल्या आहेत.

Friday, January 06, 2012 AT 12:00 AM (IST)

शेतीमालाचा वायदे बाजार सध्याच्या व मार्चपर्यंतच्या गुळाच्या किमतीत फार फरक नाही, त्यामुळे गुळाची विक्री फार उशिरा करण्यापूर्वी विचार करावा. रब्बी हंगामातील मक्‍याचे उत्पादन या वर्षी कमी होण्याचा अंदाज आहे. निर्यात मागणीपण चांगली आहे, त्यामुळे पुढील सप्ताहात किमती वाढण्याची शक्‍यता आहे. हळदीच्या किमतीमधील वाढ ही तात्कालिक ठरण्याचा संभव आहे, त्यामुळे याचा हेजिंग करण्यासाठी फायदा करून घ्यावा.

Friday, December 30, 2011 AT 12:00 AM (IST)

डिसेंबर महिन्याच्या आठ तारखेपासून मिरचीच्या किमती वाढू लागल्या आहेत. गुळाच्या सध्याच्या व मार्चपर्यंतच्या किमतीत फार फरक नाही, त्यामुळे गुळाची विक्री फार उशिरा करण्यापूर्वी विचार करावा. दक्षिण अमेरिकेतील दुष्काळामुळे मक्‍याच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वर्षी विक्रमी हळद उत्पादन अपेक्षित असल्याने भविष्यात किमती कमी होण्याचा कल आहे. तांबडी मिरची ः डिसेंबर महिन्याच्या आठ तारखेपासून मिरचीच्या किमती वाढू लागल्या आहेत.

Friday, December 23, 2011 AT 12:00 AM (IST)

मिरचीच्या दरात पुढील काही दिवस घसरण चालू राहील. ज्यांच्याकडे साठा आहे त्यांनी मिरच्या विकाव्यात. गूळ उत्पादनाचा सध्या हंगाम असल्याने किमती काहीशा घसरत आहेत. हा घसरण्याचा कल या पुढील सप्ताहात राहील असा अंदाज आहे. सोयाबीनचे जागतिक पातळीवरील उत्पादन वाढते आहे. यामुळे किमती जरी वाढल्या तरी त्या 2500 रुपयांच्या वर जाण्याची शक्‍यता कमी आहे.

Friday, December 09, 2011 AT 12:00 AM (IST)

पुणे - टाटा रॅलीज कंपनीने पीक पोषण आणि रोगांपासून संरक्षण करणारे रॅलिगोल्ड हे उत्पादन बाजारात आणले आहे. हे उत्पादन गहू, भात, ऊस, बटाटा, मटार, कांदा, लसूण, तेलबिया पिके, कडधान्यांना उपयोगी आहे. याच्या वापरामुळे मुळांची चांगली वाढ होते, त्याचबरोबरीने वापरलेल्या खतांचा आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. हे उत्पादन दाणेदार आणि पावडर या दोन प्रकारांत उपलब्ध आहे.

Friday, December 09, 2011 AT 12:00 AM (IST)

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र आणि राजस्थानात हरभऱ्याच्या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षाच्या एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल 3100 ते 3200 रुपयांच्या आसपास दर मिळेल. अशा अपेक्षेने व्यवहार करावेत. यापेक्षा अधिक किंमत पुढील दोन महिन्यात फ्युचर्समध्ये जर मिळाल्या तर हेजिंगचा जरूर विचार करावा.

Friday, November 25, 2011 AT 03:00 AM (IST)

पुणे  - एसव्हीके कृषी नेचर केअर या कंपनीने इलेक्‍ट्रो-मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर बाजारात आणले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य सांगताना कंपनीचे संचालक विलास बगाटे यांनी सांगितले, की गार्ड-नीर वॉटर कंडिशनर या यंत्रातील कॅटेलिक तंत्रज्ञानाने पाण्यातील क्षारांचा संयोग होऊ न देण्याचा कालावधी 200 ते 225 तासांपर्यंतचा आहे. आमची कंपनी हे तंत्रज्ञान विकसित करणारी जगातील एकमेव कंपनी आहे.

Thursday, November 17, 2011 AT 12:00 AM (IST)

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या जनावरांच्या बाजारात पाच कोटी रुपये उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. हा बाजार खिलार बैल, पंढरपुरी म्हशी आणि घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात खिलार बैलजोडीची किंमत एक लाखापर्यंत गेली आहे. पावसाचा परिणाम जनावरांच्या बाजारात दिसून येत आहे. किमतीत घट होत असल्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. यंदा पंढरपुरी म्हशींना चांगली मागणी आहे.

Friday, November 11, 2011 AT 03:00 AM (IST)

या वर्षी व्यापाऱ्यांच्या मते मिरचीचे उत्पादन वाढणार आहे. ही वाढ विशेषतः आंध्र प्रदेशात 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल. सध्या मिरचीचा पुरवठा गेल्या वर्षीच्या साठ्यातून होत आहे. त्यामुळे स्पॉट किमती फ्युचर्स किमतीपेक्षा अधिक आहेत. जेव्हा नवीन उत्पादन बाजारात येईल तेव्हा किमती कमी होतील. त्यांचे प्रतिबिंब फ्युचर्स किमतीमध्ये दिसत आहे.

Friday, November 11, 2011 AT 03:00 AM (IST)

सध्या ज्वारी लागवडीचा पेरणीचा हंगाम चालू आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ज्वारीचे पीक निसवल्यानंतर 21 दिवसांनी हुरडा तयार होतो. कणसाचे दाणे भरून हुरडा तयार झाल्यावर त्याची विक्री पुढील 10 ते 12 दिवसांतच करावी लागते, अन्यथा हुरड्याची चव लागत नाही. हे लक्षात घेऊन रब्बी ज्वारी 15 दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने पेरणी करावी व हुरडा विक्रीचे नियोजन करावे.

Tuesday, November 08, 2011 AT 03:00 AM (IST)

जागतिक स्तरावर, ब्राझील व थायलंड या प्रमुख देशांत या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घसरेल असे दिसते. त्याचा परिणाम त्यांच्याकडून होणाऱ्या निर्यातीवर होईल. साखरेची आयात करणाऱ्या देशात चीन हा प्रमुख देश आहे. त्यामुळे चीनची साखरेची मागणी या वर्षी कळीची ठरणार आहे.

Friday, November 04, 2011 AT 02:45 AM (IST)

अकोला - जगातील महत्त्वाचे तृणधान्य असलेल्या मका पिकाच्या किमती मार्च 2012 पर्यंत स्थिर राहण्याची शक्‍यता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. मक्‍याच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापणीनंतर लगेच मका विकणे फायदेशीर ठरू शकते, असा निष्कर्षही विद्यापीठाच्या एन.ए.आय.पी. केंद्राकडून नोंदविण्यात आला आहे.

Tuesday, November 01, 2011 AT 03:15 AM (IST)

अकोला (प्रतिनिधी) ः खरिपातील मुख्य पीक असलेल्या मूग, उडदाच्या किमती स्थिर राहण्याची शक्‍यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. भारत उडीद उत्पादनात आघाडीचा देश असून, त्या पाठोपाठ म्यानमार, थायलंड या देशांत उडदाचे उत्पादन घेतले जाते. भारत, चीन, थायलंड, फिलिपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ब्रह्मदेश आणि बांगलादेश हे मूग उत्पादक देश आहेत.

Thursday, October 27, 2011 AT 02:45 AM (IST)

जळगाव  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 18) दादर (रब्बी ज्वारी), उडीद (काळा), हरभरा, मूग, बाजरी या भुसार मालासह गुळाचीही चांगली आवक झाली. "दादर'ची 119 क्‍विंटल आवक झाली. दादरला मागणीही चांगली होती. दादरला 1500 ते 2200 रुपये क्विंटल असा दर होता. उडदाची (काळा) 243 क्‍विंटल आवक झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच नवीन उडदाची एवढ्या प्रमाणात आवक झाली. उडदाला 3600 ते 3800 रुपये क्विंटल असा दर मिळाला.

Wednesday, October 19, 2011 AT 12:00 AM (IST)

अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक वाढत असून, सोयाबीनची मंगळवारी (ता.11) विक्रमी अकरा हजार क्विंटल आवक झाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. कापसानंतर नगदी पीक म्हणून सोयाबीनने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. एक ऑक्‍टोबरपासून सोयाबीन सोंगणी (कापणी) हंगामास सुरवात झाल्यानंतर बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनची मंगळवारी अकरा हजार क्विंटल आवक झाली. नव्या सोयाबीनला 1900 ते 1960 रुपये क्विंटल असा दर मिळाला.

Wednesday, October 12, 2011 AT 03:30 AM (IST)

मानवाप्रमाणेच क्षयरोग हा जनावरांमध्ये आढळणारा व दीर्घकाळ टिकणारा संसर्गजन्य आजार आहे. हा रोग "मायकोबॅक्‍टेरिअम ट्युबरक्‍युलॉसीस' या जिवाणूंमुळे होतो. हा रोग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, कुत्रा, मांजर इ. प्राण्यांना होऊ शकतो. रोगग्रस्त जनावर झिजत जाते व अशक्त बनते. पूर्णपणे खंगलेले जनावर मृत्युमुखी पडते. हा रोग जनावरांपासून माणसाला, माणसापासून जनावराला, तसेच एका जनावरापासून इतर जनावरांना होऊ शकतो.

Wednesday, October 12, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - अन्नधान्य व खाद्यपदार्थ क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या मॅककॉर्मिक या अमेरिकन कंपनीने भारतीय अन्नधान्य व खाद्यपदार्थ बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. या कंपनीने देशात बासमती तांदूळ विक्रीत आघाडीवर असलेल्या कोहिनूर फूड्‌स कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार आता मॅककॉर्मिक "कोहिनूर' या नावाने भारतीय बाजारपेठेत अन्नपदार्थांची विक्री करणार आहे.

Wednesday, October 12, 2011 AT 02:45 AM (IST)

द्राक्षवेलीच्या मुळांची वाढ व विस्तार प्रमुख्याने द्राक्षाची जात, खुंट, जमिनीचा प्रकार व द्राक्ष पीक व्यवस्थापन यावर अवलंबून असते. वेलीला होणारा अन्नद्रव्य व पाणी यांचा पुरवठा मुळांद्वारे केला जातो. वेलीची होणारी वाढ ही मुळांच्या वाढीवर अवलंबून असते. त्यासाठी मुळांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असते. योग्य उपाययोजना केल्यास मुळांची वाढ व पर्यायाने द्राक्ष वेलीची वाढ योग्य प्रकारे होईल. यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे ठरते.

Tuesday, October 11, 2011 AT 06:58 PM (IST)

मल्टी-कमोडिटी एक्‍स्चेंज (MCX - INDIA) मध्ये 3 ऑक्‍टोबर 2011 रोजी कापसाचा नवा वायदेबाजार सुरू झाला आहे. हा सध्या तीन करार तारखांसाठी (31 ऑक्‍टोबर 2011, 30 डिसेंबर 2011 व 31 जानेवारी 2012) आहे. करारासाठी कापूस 20 मि.मी.चा लागतो आणि किंमत ही प्रत्येकी 170 किलोच्या गाठीसाठी आहे. याची डिलीवरी राजकोटमध्ये द्यावयाची आहे. याशिवाय महाराष्ट्रातील औरंगाबाद व जळगाव हीपण डिलीवरी केंद्रे मान्य झालेली आहेत.

Saturday, October 08, 2011 AT 02:45 AM (IST)

पुणे -  एसएफपीएल क्रॉप लाइफ सायन्स प्रा.लि. या कृषिधन ग्रुप कंपनीने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून ग्लुकोनेटयुक्त पीकपोषण उत्पादने विकसित केली आहेत. हे चिलेटेड स्वरूपातील पीकपोषण घटक असलेले उत्पादन आहे. चिलेटेड स्वरूपात असल्याने प्रतिकूल सामूच्या शेतजमिनीतून व पाण्याचा वापर करताना त्यातील पीक पोषक घटकांच्या मूळ स्वरूपात कोणतेही बदल होत नाहीत. त्यामुळे कमी प्रमाणात वापरूनही पीक वाढीला फायदा होतो.

Friday, October 07, 2011 AT 03:00 AM (IST)

जळगाव ः राज्यातील विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्‍वत विकासाचा मार्ग दाखवणारा महत्त्वपूर्ण करार राज्याचा कृषी विभाग व कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशन यांच्यात नुकताच झाला. यामुळे ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांना प्रति एकरी सरासरी 18 ते 20 क्विंटल कापसाचे उत्पादन घेणे आता शक्‍य होणार आहे. या करारावर जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव एस. के.

Wednesday, October 05, 2011 AT 12:00 AM (IST)

मागील तीन लेखांत आपण पुढील वर्षात हळदीच्या, सोयाबीनच्या व मक्‍याच्या किमती किती असतील, याचा अंदाज करण्याचा प्रयत्न केला. या लेखात आपण पुढील वर्षातील मिरचीच्या (लाल, सुकी) अपेक्षित किमतींचा आढावा घेऊ. अर्थात, हे अंदाज असतील व त्यात मागणीनुसार व आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार बदल होतील, हे लक्षात घ्यावे. मिरचीच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जागतिक उत्पादनात भारताचा जवळ जवळ 25 टक्के सहभाग आहे. निर्यातीतही भारताचे अग्रस्थान आहे.

Friday, September 30, 2011 AT 02:30 AM (IST)

 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: