Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग
द्राक्षाची पक्वता ओळखण्यासाठी त्यातील साखरेचे प्रमाणसुद्धा मदतशीर ठरू शकते. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण जातीपरत्वे बदलत असले तरी बहुतांश जातीमध्ये मण्यांतील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रॅक्‍टोमीटरवर 18 ते 22 अंश ब्रीक्‍सच्या दरम्यान आढळून आल्यास त्याची काढणी करावी. द्राक्षाची पक्वता ठरविण्यात हा सर्वांत जास्त खात्रीशीर निकष आहे. द्राक्ष हे अतिसंवेदनशील, अत्यंत नाशवंत असे फळपीक आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

सध्या उसावर पांढरा लोकरी मावा या किडीचा वेगवेगळ्या हवामानानुसार कमी-अधिक प्रमाणात, प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही कीड पिकांच्या पानांतील रस शोषून घेते. अनुकूल परिस्थितीमध्ये या किडीचा प्रसार झपाट्याने होतो. अशा वेळेस वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्‍यक आहे. पांढरा लोकरी मावा किडीच्या पंखी व बिन पंखी मावा असे दोन प्रकार आढळतात. उसाच्या पानांच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखे तंतुधारी व बिन पंखी मावा भरपूर प्रमाणात आढळतो.

Tuesday, February 21, 2012 AT 02:00 AM (IST)

सध्याचे तापमान पाहता 25 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी. जमीन ओलावून नंतर वाफशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने लागवड करावी. माळरानावरील लालसर रंगाच्या जमिनीत जिप्समचा वापर करावा. जमिनीत मुक्‍त चुनखडीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे तसेच सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या काळ्या जमिनीत जिप्सम एकरी 50 किलो पेरणीच्यावेळी आणि 50 किलो आऱ्या सुटण्याच्यावेळी द्यावे.

Monday, February 20, 2012 AT 02:30 AM (IST)

कडाक्‍याच्या थंडीच्या लाटेमुळे फळपिके व भाजीपाला आदी पिकांवर परिणाम झाला आहे. थंडीमुळे पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी, तसेच पुढील नुकसान टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना... 1) फळपिके ः केळी ः केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी तापमान 16 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस आवश्‍यक असते. गेल्या आठवड्यात किमान तापमान हे 5.6 ते 14.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सर्वांत कमी तापमानाची नोंद 5.

Sunday, February 19, 2012 AT 03:00 AM (IST)

उन्हाळी बहराचे पहिले पाणी जानेवारी ते मे या महिन्यांत दिले जाते. पाण्याची पहिली पाळी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत झाडांना नवीन पालवी फुटून झाड फुलांनी बहरून जाते. उन्हाळी बहराची फळे जून ते ऑगस्टपर्यंत मिळतात. या फळांना बाजारभाव चांगले मिळतात. बहराचे व्यवस्थापन करताना तापमान आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करावा. सीताफळाच्या दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या फळांसाठी बहराचे योग्य व्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट आहे.

Saturday, February 18, 2012 AT 02:00 AM (IST)

1) मागील काही दिवसांत थंडीची लाट अनुभवल्यानंतर आता किमान तापमान वाढत राहणार आहे. कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या पुढे राहील. सापेक्ष आर्द्रता 22 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येऊ शकेल. सोलापूर विभागात कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकेल. तसेच सापेक्ष आर्द्रता किमान 13 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येईल. या वातावरणातील बदलामुळे थंडीमुळे दुखावलेली पाने व घड प्रखर सूर्यप्रकाशात आल्यास त्यांचे पुन्हा नुकसान होण्याची शक्‍यता आहे, असे वाटते.

Thursday, February 16, 2012 AT 02:30 AM (IST)

आडसाली ऊस लागवडीचा ऊस पाच ते सहा महिन्यांचा झाला आहे. तो ऊस फुटवे फुटण्याची अवस्था संपवून जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे, तर पूर्वहंगामी ऊस तीन ते चार महिन्यांचा असून तो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सध्याच्या थंडीच्या लाटेमध्ये उसाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने ठेवावे, याबाबतची माहिती आजच्या लेखात घेत आहोत. राज्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीची लाट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून पाच ते सहा दिवस ही लाट अशीच राहणार आहे.

Thursday, February 16, 2012 AT 02:15 AM (IST)

मागील आठवड्यातील धुके असलेल्या भागांची पाहणी केली असता त्या ठिकाणच्या द्राक्ष बागांतील वरच्या बाजूची पाने सुकल्याचे दिसून येत आहे. तसेच वरच्या भागातील घडही सुकल्याचे दिसून येत आहेत. मात्र ज्या बागांमध्ये शेडनेटचा वापर झालेला आहे किंवा कॅनॉपी चांगली आहे अशा बागेतील पाने हिरवी राहिली आहेत. डॉ. एस. डी. रामटेके, आशिष राजूरकर द्राक्ष हे अति संवेदनशील फळ पीक आहे.

Wednesday, February 15, 2012 AT 05:00 AM (IST)

राज्यात रात्रीच्या सरासरी तापमानात घट होऊन थंडीची लाट आलेली असून, थंडीचा विविध पिकांवर परिणाम दिसतो आहे. या काळात फळबागेत शेकोटी पेटवून धूर करावा, पिकांना पाणी द्यावे, आच्छादनाचा वापर करावा. सद्यःस्थितीत द्राक्ष, केळी, आंबा, पेरू, कांदा, मका, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय भाजीपाला, रोपवाटिका आदी पिकांची थंडीपासून काळजी घ्यावी. डॉ. दशरथ ठवाळ 1) उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास मात्र थंडीचा काही प्रमाणात वाढीसाठी उपयोग होईल.

Wednesday, February 15, 2012 AT 04:15 AM (IST)

सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांशी संबंधित असल्याने त्यांचा वापर महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीतच पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे दुष्परिणाम ताबडतोब दृश्‍य स्वरूपात नसतात मात्र त्यांची कमतरता पुढे नुकसानकारक ठरू शकते. अल्पप्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणाचे कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे.

Tuesday, February 14, 2012 AT 03:30 AM (IST)

तेलकट डाग रोग डाळिंब उत्पादनातील प्रमुख समस्या आहे. हा रोग झान्थोमोनास ऍक्‍झानोपोडीस पुनिका या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू झाडाच्या सर्व भागांवर प्रादुर्भाव करतो. हा जिवाणू प्रामुख्याने फळांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतो. म्हणूनच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या रोगाचे वेळीच नियंत्रण आवश्‍यक आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणाचा आढावा घेतल्यास द्राक्ष बागेतील तापमान वाढत असताना आढळून येत आहे. थंडी हळूहळू कमी होत असून तापमानवाढ होताना दिसून येते. सध्या आपल्या बागेत दोन वेगवेगळ्या परिस्थिती आढळून येतील. पहिल्या परिस्थितीमध्ये खुंट रोपांची लागवड, तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये रिकट घेतलेली बाग आढळून येईल. या दोन परिस्थितीमध्ये सध्या काय हालचाली होताहेत व त्यावर संभावित काय उपाययोजना कराव्यात याची माहिती घेऊ.

Friday, February 10, 2012 AT 02:00 AM (IST)

दुभत्या जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असणे ही फायदेशीर दुग्धोत्पादनाची पायरी आहे. त्यासाठी हंगामी चारा पिकांबरोबर वार्षिक व बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये चारा व पशुखाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकूण उत्पादन खर्चाच्या 60 ते 70 टक्के खर्च फक्त चारा व खाद्यावर होतो. यशस्वी पशुपालनामध्ये हिरव्या सकस चाऱ्याचा सतत पुरवठा करणे फार महत्त्वाचे असते.

Thursday, February 09, 2012 AT 02:30 AM (IST)

जेव्हा कॅल्शिअमची कमतरता जाणवते तेव्हा ममीफिकेशन ही विकृती दिसू लागते. तापमान कमी होऊ लागल्यास याचे प्रमाण जास्त दिसते. ही विकृती साधारणपणे पाणी उतरण्यापासून मण्यांमध्ये साखर भरण्याच्या कालावधीमध्ये दिसून येते. या विकृतीमध्ये मण्यांचा देठ सुरवातीला सुकायला सुरवात होते. या विकृतीवरील उपाययोजनेबाबत आजच्या लेखात माहिती घेत आहोत. द्राक्ष मण्यांमध्ये अलीकडच्या काळात बऱ्याच विकृती दिसून येत आहेत.

Wednesday, February 08, 2012 AT 12:00 AM (IST)

पीक व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्यांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे, त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते, जमिनीचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते. यामध्ये सेंद्रिय स्वरूपातून पुरविल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग 25 ते 30 टक्के, जैविक स्वरूपातील 20 ते 25 टक्के आणि रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्यांचा सहभाग 50 टक्के असावा.

Sunday, February 05, 2012 AT 02:45 AM (IST)

द्राक्ष लागवडीनंतर मागील हंगामात कलम केलेल्या बागेत या वेळी कलम जोडाच्या वर रिकट घेऊन पुन्हा त्या वेलीचा नवीन सांगाडा तयार केला जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये खोड, ओलांडा व मालकाडी तयार करून येत्या ऑक्‍टोबर महिन्यात फळ छाटणी घ्यायची आहे. याबाबत बागायतदारांच्या प्रश्‍नांची उत्तरे आजच्या लेखात माहिती करून घेऊयात. द्राक्ष बागेत रिकट घेण्याची वेळ साधारणतः जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात असते. याच काळात थंडी कमी होऊन तापमान वाढायला लागते.

Saturday, February 04, 2012 AT 02:45 AM (IST)

भारतातील बियाणे बाजारपेठ ही सुमारे 1.5 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. सन 1990 च्या सुरवातीच्या काळात ही बाजारपेठ या आकडेवारीच्या निम्मी असण्याची शक्‍यता आहे. गेल्या दशकातच तिची वाढ वेगाने झाली आहे. खासगी कंपन्यांचा भर संकरित बियाण्यांवरच अधिक असल्याने त्यांचा आर्थिक मूल्यात्मक वाटा (व्हॅल्यू) हा संख्यात्मक वाट्यापेक्षा (व्हॅल्यूम) अधिक आहे. खासगी बियाणे उद्योग हा तुकड्यांमध्ये विभागलेला आहे.

Friday, February 03, 2012 AT 02:45 AM (IST)

सांगली, सोलापूर आणि पुणे विभागाच्या काही भागांमध्ये येत्या मंगळवारी (ता. 7) संध्याकाळी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. सांगली विभागामध्ये 50 टक्के, सोलापूर विभागात 20 ते 50 टक्के आणि पुणे विभागामध्ये 20 टक्के पावसाची शक्‍यता आहे. याचाच अर्थ असा होतो, की हा पाऊस फक्त काही ठिकाणी पडण्याची शक्‍यता आहे.

Thursday, February 02, 2012 AT 02:30 AM (IST)

आपल्याकडे आता जमीन मशागत, सुधारित पद्धतीने पेरणी, कमी कालावधीत योग्य पद्धतीने आंतरमशागत, कार्यक्षम फवारणी, पिकांची योग्य वेळी काढणी आणि मळणीसाठी अवजारे उपलब्ध झाली आहेत. या अवजारांच्या माध्यमातून शेतीमधील वाढत्या खर्चात बचत करणे शक्‍य होणार आहे. स्वयंचलित टूलबार - हे यंत्र 6.5 एच.पी. पेट्रोल इंजिनवर चालते. याला समोरील बाजूस विविध यंत्र जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. यंत्राला दोन टेन्शन क्‍लच दिले आहेत.

Wednesday, February 01, 2012 AT 12:00 AM (IST)

आपल्याकडे हरित क्रांती झाली, त्याचा फायदाही झाला पण आता जमीन, पाणी, विविध स्रोत मर्यादित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत अन्न व कृषी संघटनेचा हवाला घेऊन असे म्हणता येते, की सन 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या सहा अब्जांवरून नऊ अब्जांपर्यंत जाणे अपेक्षित आहे, त्यामुळे जागतिक अन्नधान्याचे दुपटीने उत्पादन वाढणे अत्यंत गरजेचे आहे. जगातील आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती भुकेली आहे. साहजिकच 60 टक्के जनता गरीब आहे.

Wednesday, February 01, 2012 AT 12:00 AM (IST)

कमी साखरेचे प्रमाण, कमी गर, हिरवा रंग टिकण्याची क्षमता असणाऱ्या घडांना / मण्यांना वॉटर बेरीज असे म्हणतात. वॉटर बेरीज या मुख्य देठावर, घडाच्या दांड्याच्या टोकावर, तसेच पाकळ्यांवर आढळून येतात. मण्यांचा सामान्य आकार व घडाच्या आतील बाजूस आढळून येण्यामुळे बऱ्याच वेळा वॉटर बेरीजच्या मण्यांची ओळख पटणे कठीण जाते. मागील लेखात आपण थंडीमुळे द्राक्षावर होणारे परिणाम टाळण्यासाठी शेडनेट आणि आच्छादनाच्या वापराबाबत माहिती घेतली.

Wednesday, February 01, 2012 AT 12:00 AM (IST)

देशाची "सीड कॅपिटल' म्हणजे बीजोत्पादनाची राजधानी म्हणून आंध्र प्रदेशने आपले स्थान पक्के केले आहे. संपूर्ण देशासाठी हे राज्य विविध पिकांचे बियाणे निर्मिती करते व पुरवतेही. बीजोत्पादनासाठी येथील अनुकूल हवामानाचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आहेच, शिवाय तेथील कृषी विभाग, खासगी कंपन्या यांच्यामार्फतही बियाणे व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. याविषयी माहिती देणारी ही मालिका आजपासून रोज. बीजोत्पादन म्हणजे शेतीचा मुख्य पाया.

Tuesday, January 31, 2012 AT 02:30 AM (IST)

क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले क्षार खरडून शेताबाहेर टाकून द्यावेत. धैंचा, ताग यांसारखी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीतच गाडावीत. भरखतांचा वापर जास्त प्रमाणात करावा. जमीन चोपण असेल तर ती सपाट करून योग्य अंतरावर चर काढावेत. माती परीक्षण करून क्षारांच्या प्रकारानुसार जिप्सम, गंधक किंवा आयर्न पायराईट यासारख्या भूसुधारकांचा वापर करावा. संदेश देशमुख, दीपक पोतदार, डॉ.

Monday, January 30, 2012 AT 03:45 AM (IST)

ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इतर फुलझाडांच्या तुलनेने ऍस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची असते. शिवाय फुलांची उपलब्धता लागवडीपासून थोड्याच दिवसांत होते, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न या फुलांपासून मिळू शकते. ऍस्टर पिकास फार कडक थंडी मानवत नाही, तसेच कडक ऊनही मानवत नाही.

Saturday, January 28, 2012 AT 02:45 AM (IST)

द्राक्ष घड उन्हात आल्यामुळे तपकिरी रंगाचे होतात. असे घड निर्यातीसाठी योग्य नसतात. घडांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी कृत्रिम सावलीची (शेड) गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी घड पेपरने झाकणे किंवा शेडनेटचा वापर करणे योग्य असते. अशाप्रकारे झाकलेले घड हिरवे दुधाळ एकसमान रंगाचे राहतात. सनबर्नची समस्या टाळता येऊ शकते. या दोन्ही उपायांमुळे द्राक्षाची प्रत सुधारण्यास मदत होते. डॉ. एस. डी.

Wednesday, January 25, 2012 AT 04:15 AM (IST)

मोसंबीमध्ये फळगळीच्या मुख्यत्वे दोन लाटा येतात. त्यामध्ये पहिली लाट ही फळधारणेनंतर पहिल्या तीन आठवड्यांपर्यंत म्हणजेच फळे ज्वारी ते हरभऱ्याच्या आकाराची असताना येते. दुसरी लाट फळे काढणीपूर्वी 35 ते 40 दिवस अगोदर म्हणजेच जुलै - ऑगस्टमध्ये येते. हे लक्षात घेता फळांच्या अपेक्षित उत्पादनासाठी फळगळीवर नियंत्रण मिळविणे आवश्‍यक आहे. मोसंबीचे वर्षातून तीन बहर घेतले जातात. त्यातील आंबिया बहर हा मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने घेतला जातो.

Tuesday, January 24, 2012 AT 03:15 AM (IST)

अपुऱ्या व योग्य प्रकारच्या पोषणाअभावी मोसंबीमध्ये पानगळ, फुलगळ, गुंडीगळ व फळगळ या समस्या दिसतात. हे लक्षात घेता अन्नद्रव्यांचा वापर योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे ठरते. मोसंबी बागेमध्ये माती परीक्षण अहवालानुसारच खत व्यवस्थापन करावे. मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश यांचा असंतुलित किंवा गरजेपेक्षा जास्त-कमी वापर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता मोसंबी बागेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे.

Tuesday, January 24, 2012 AT 03:00 AM (IST)

माती परीक्षणानुसार उसाला शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा द्यावी. यामुळे पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता होईल, जमिनीची सुपीकता टिकून राहील, तसेच खतांसाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होईल. योग्य पीक व्यवस्थापनातून अपेक्षित उत्पादनवाढ मिळविता येणे शक्‍य आहे. पिकांना सध्या शिफारस केलेले खतांचे प्रमाण हे जमिनीच्या प्रकाराचा विचार न करता पिकानुरूप ठरविण्यात आलेले आहे.

Monday, January 23, 2012 AT 02:30 AM (IST)

उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या चांगल्या बाजारभावामुळे तसेच मागणीमुळे कलिंगड आणि खरबुजाची लागवड वाढते आहे. चांगल्या उत्पादनासाठी गादी वाफ्यावर सुधारित पद्धतीने लागवड करावी. कलिंगड आणि खरबुजाला उष्ण व कोरडे हवामान मानवते. पीक फुलोऱ्यात असताना स्वच्छ सूर्यप्रकाश फायदेशीर ठरतो. यासाठी या पिकाची लागवड जानेवारी दुसरा पंधरवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. लागवडीसाठी मध्यम व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

Sunday, January 22, 2012 AT 03:15 AM (IST)

सूर्यफुलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सुधारित, संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड- रोग व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढविण्यासाठी योग्य ते नियोजन या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. आपल्याकडील सूर्यफुलाची उत्पादकता ही प्रति हेक्‍टरी 600 कि.ग्रॅ. आहे. ही जागतिक सरासरी उत्पादकतेच्या (1200 कि.ग्रॅ./हे.) निम्मी आहे.

Saturday, January 21, 2012 AT 03:30 AM (IST)

शेतीमधील नवीन तंत्रज्ञानामुळे मशागतीची नवीन अवजारे तयार झाली, त्यांचा वापर शेतकरी करताहेत परंतु काही वेळा ट्रॅक्‍टर विकत घेणे परवडत नाही, त्यामुळे शेतीची कामे खोळंबून राहतात. यासाठी चांगला आणि कमी किमतीत उपलब्ध होणारा पर्याय म्हणजे पॉवर टिलर. सध्या बऱ्याच कंपन्यांचे पॉवर टिलर बाजारात उपलब्ध आहेत. पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व भागांची व प्रणालींची माहिती करून घ्यावी.

Saturday, January 21, 2012 AT 03:00 AM (IST)

 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: