येत्या काळात जल- मृद्संधारणासाठी आतापासूनच उपाययोजनांची आखणी आणि कामे सुरू करणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्रानुसार मातीबांध, अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध आणि शेततळ्यांच्या कामाला सुरवात करावी. ओघळीच्या रुंदी एवढ्या लांबीच्या ओघळीमध्ये मातीचा बांध घातला जातो त्यास माती बांध असे संबोधतात. जेथे दगड उपलब्ध होत नाहीत अशा ठिकाणी मातीच्या बांधाची कामे करावीत.
पॉवर टिलरच्या साह्याने उसामधील आंतरमशागतीची कामे केली जातात. या यंत्रामध्ये कामानुसार बदल करता येतो. हे यंत्र स्वयंचलित असून, सरी-वरंबा फोडणे, उसाला भर देणे, उसाची बांधणी करणे, उसातील जमीन सपाट करणे, तण नियंत्रण करणे इ. कामे केली जातात. आंतरमशागतीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करता येते. या यंत्राच्या साह्याने एक मजूर एक ते दीड एकर क्षेत्र एका दिवसात पूर्ण करतो.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे येथे उपलब्ध असणाऱ्या कृषी-व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या 2012-2014 या सत्रासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमांचा तपशील ः संस्थेतर्फे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था - पुणे, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेशन मॅनेजमेंट - चंडीगड व ................
कोणताही व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जमा बाजू वाढविणे आणि खर्च नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असते. दूध व्यवसाय फायदेशीर राहण्यास जनावरांची निवड, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य नियोजन, स्वच्छ दूधनिर्मिती, लहान वासरांच्या संगोपनावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी गोठ्यामध्ये अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई, म्हशींचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.
वनशेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्चित पाऊसमानात हलक्या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बऱ्याच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. राज्याच्यादृष्टीने वनशेतीच्या खालील पद्धती महत्त्वाच्या आहेत.
हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणतः गाई व म्हशी वितात अशा वेळी त्यांच्या वासरांची काळजी घ्यावी. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गाई व म्हशी व्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत रक्तातील काही खनिजांच्या कमतरतेमुळे महत्त्वाचे आजार निर्माण होतात, त्याचा दूध उत्पादनावर सरळ प्रभाव पडतो. इतकेच नाही तर दुभत्या जनावरांना रोगाची प्रतिबंधक लस टोचली नाही, तर त्यांचीसुद्धा संसर्गजन्य रोगाने हानी होण्याची शक्यता असते. जनावरांची प्रजननक्षमता हिवाळ्यात सर्वांत उच्च असते.
जंबो कोळंबी ही गोड्या पाण्यातील कोळंबी असून इतर जातींच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी इतर सर्व जातींच्या कोळंबीच्या तुलनेत जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर सर्वसाधारणपणे 70-100 ग्रॅमपर्यंत, तर मादी 35 ते 70 ग्रॅमपर्यंत वाढते. जंबो कोळंबीला देशात तसेच परदेशात प्रचंड मागणी आहे, दरही चांगला मिळतो. ही कोळंबी सर्वभक्षी आहे.
हवामान घटकांचा हवामानावर सातत्याने परिणाम होत असतो. हवामानबदल हे प्रामुख्याने हवामान घटकातील होणाऱ्या बदलामुळे होतात. सापेक्ष आर्द्रता, बाष्पीभवन, सूर्यप्रकाश या महत्त्वाच्या घटकांचा हवामानावर सातत्याने परिणाम होत असतो. सापेक्ष आर्द्रता ः सूर्याच्या प्रकाशाने उष्णता तयार होते. समुद्राचे, नद्यांचे, विहिरींचे, तलावांचे पाणी तापते, त्या पाण्याची उष्णतेने वाफ होते, त्याचप्रमाणे जमिनीही तापतात. जमिनीतील पाण्याचीही वाफ होते आणि ती हवेत मिसळते.
वळण बंधारा कोकणात बरेच शेतकरी नाल्यावर कच्चे दगडी बंधारे बांधून, नाल्यातील पाणी शेतीत वळवून पिकांना पाणी देतात परंतु हे बंधारे दरवर्षी नव्याने घालावे लागतात. अशा ठिकाणी पक्के बंधारे बांधून पाणी शेतात वळवून पिकांना देता येते. अशा बंधाऱ्यांना वळण बंधारे असे म्हणतात. वळण बंधाऱ्यासाठी जागा निवडताना ज्या नाल्यांना नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत पाणी प्रवाह असतो, अशा नाल्याची निवड करावी. नाल्याची खोली तीन मी.पेक्षा जास्त आणि रुंदी 30 मी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र पशु-संवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी म्हणून नेमण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत - जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या 224, यापैकी 90 जागा सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी असून 134 जागा विविध गटातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
लेप्टोस्पायरोसिस हा आजार सर्व पाळीव जनावरांमध्ये, तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्येदेखील उद्भवतो. म्हणून या आजारास "झूनॉटिक' आजार असे संबोधतात. पाणथळ, अल्कलीयुक्त, क्षारयुक्त जमिनीच्या प्रदेशात ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे, अशा प्रदेशात या रोगाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.
ऍगमार्क प्रमाणपत्रासाठी आवश्यक सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर तुपाचे डबे सीलबंद केले जातात. त्यानंतर तज्ज्ञ अशा सीलबंद केलेल्या तुपाच्या डब्यांना ऍगमार्क लेबल लावण्यासाठी देतो. ऍगमार्क दर्जाचे तूप स्पेशल आणि जनरल या दर्जामध्ये पॅकिंग केले जाते. या दोन दर्जांच्या तुपासाठी वेगवेगळ्या रंगांची ऍगमार्क लेबल लावली जातात. तुपाची प्रत, तसेच शुद्धता यांची तपासणी प्रयोगशाळेमध्ये त्याचे रासायनिक तसेच भौतिक गुणधर्माचे पृथक्करण करून केली जाते.
म्हशींच्या बाबतीत वेळेच्या नियमितपणाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे खाद्य, चारा, दूधसंकलन, स्वच्छता, व्यायाम या दैनंदिन बाबी अगदी वेळेवर होणे महत्त्वाचे ठरते. प्रक्षेत्रावर घडणाऱ्या सर्व बाबींच्या नोंदी ठेवणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग असतो. म्हशींच्या नवजात पारड्यांसाठी पहिल्या दीड महिन्यात वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे असते, तर पुढील तीन महिने त्यांना नियंत्रणात वाढविणे उपयोगी ठरते.
- अमेरिकेतील संशोधकांनी केले "गॅस हायड्रेट'चे संगणकीय प्रारूप विकसित - जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत कर्बवायूंना बांधण्यासाठी ठरेल उपयुक्त खनिज इंधनाच्या उपलब्धतेवर मर्यादा असल्याने विविध इंधनांसाठी संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत. पाण्याच्या बंधामध्ये हायड्रोजन किंवा मिथेन या इंधन वायूची मूलद्रव्ये बांधून ठेवण्यासाठी संगणकीय प्रारूप अमेरिकी ऊर्जा विभागाने विकसित केले आहे.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील जीवरसायन क्रियेचा संतुलितपणा टिकविला जातो. नत्र व स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. सेंद्रिय खतांमध्ये सूक्ष्म पोषक द्रव्ये देखील उपलब्धावस्थेत असल्यामुळे त्यांचा पुरवठा पिकांना होतो. व्यवस्थित व जास्त काळ कुजलेल्या खतांमध्ये जीवनसत्त्वांसारखे पिकांना पोषक ठरणारे पदार्थ असतात. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी समतोल अन्नद्रव्यांची गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करतात.
बांबूपासून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यावर ग्रामीण भागातील काही समाज उपजीविका करतात. त्या बांबूच्या उपयोगितेमध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. मोबाईलला आकर्षकता आणण्यासाठी विविध डिझाइन कलाकार विकसित करत असतात. इंग्लंडमधील मिडलसेक्स विद्यापीठात डिझाइन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने बांबूपासून मोबाईल बनवला आहे. तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या वस्तू आणि उपकरणांच्या बाजारात प्लास्टिक आणि अन्य घटकांचा वापर वाढतो आहे.
पाणी हा जीवसृष्टीच्या अस्तित्वास आवश्यक असलेला घटक. आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होते. हवा उंच गेल्यावर तिचे तापमान तुलनेने ती जसजशी वर जाईल तसतसे कमी होत जाते. हवेत सामावलेल्या बाष्पाचे प्रमाण वाढल्यास ढग तयार होऊन तिचे सांद्रीभवन सुरू होते. म्हणजेच वाफेचे रूपांतर छोट्या छोट्या जलकणात होते. हवेत असंख्य धुळीचे कण क्षारांचे कण असतात. त्याभोवती हे जलकण एकत्र जमात आणि त्यांचा आकार मोठा मोठा होत जातो.
आरोग्यदृष्ट्या अंजीरफळाला खूप महत्त्व आहे. अंजिरावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात, त्याची पद्धती सविस्तर माहिती करून घेऊ या. अंजिराच्या फळांपासून विविध टिकावू पदार्थ तयार करता येतात, जसे की - 1) सुके अंजीर ः अंजीर फळे सुकविणे व त्याद्वारे टिकविण्याची प्रक्रिया फार जुन्या काळापासून चालत आलेली सर्वांत सोपी पद्धत आहे.
जनावरांच्या प्रजातींमधील काही प्रजाती संकरीकरणामुळे हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे दुग्धोत्पादन व्यवसायासोबत जैवविविधता आणि दुधाव्यतिरिक्त इतर गुणक्षमतेवर दीर्घकालीन हानिकारक परिणाम होऊ शकतात. पुण्यामध्ये आज (गुरुवार)पासून राष्ट्रीय जैवविविधता परिषदेस सुरवात होत आहे. त्यानिमित्ताने राज्यातील गोवंश आणि म्हशींच्या संदर्भातील झालेल्या अभ्यासाची निरीक्षणे पशुपालकांना उपयोगी ठरतील.
वासरांचा गोठा वेगळा, हवेशीर, प्रकाशमय असावा. प्रत्येक वासरास योग्य जागा मिळेल याची खात्री करून घ्यावी. वासरे जास्त असल्यास त्यांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे वेगळे ठेवावे, त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. वासरे ही जर योग्य वजनाची सशक्त आणि निरोगी जन्मास आली तर त्यांचा वजनवृद्धी दर चांगला असतो.
रोपवाटिकेतील लहान रोपे, गुटी कलमांची योग्य काळजी घ्यावी. शेडनेटचा वापर करून रोपे सावलीत राहातील याची काळजी घ्यावी. सध्याच्या काळात योग्य काळजी घेतली तर रोपे कणखर होऊन पुढील काळात वाढ चांगली होते. 1) रोपवाटिकेमध्ये कलमांचे हार्डनिंग पूर्ण झालेले आहे, अशी कलमे, रोपे चरात किंवा सपाट वाफ्यात ठेवून गरजेनुसार पाणी द्यावे.
कुक्कुटपालन व्यवस्थापनात नुकसान टाळण्यासाठी कोंबड्यांच्या विविध खोड्यांचे (सवयी) नियंत्रण करणे अत्यावश्यक ठरते. कोंबड्यांतील वाईट सवयी या खाद्यातील पोषणमूल्यांची कमतरता, गर्दी, अंधार किंवा अतिप्रकाश इत्यादी कारणांमुळे दिसून येतात. यासाठी वेळीच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 1) पिसे उपटणे ः कुक्कुटालयात पक्ष्यांची जास्त गर्दी झाल्यामुळे, त्याचप्रमाणे निकृष्ट आहार व अति प्रकाशामुळे पक्ष्यांना ही वाईट सवय जडते.
नत्र खताबरोबर (युरियाबरोबर) स्फुरद, पालाश आणि जमिनीत कमतरता असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय खताबरोबर देणे महत्त्वाचे आहे. सेंद्रिय खतामुळे पिकास सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो, त्यासाठी माती परीक्षणाद्वारे रासायनिक खतांची मात्रा ठरवून त्याबरोबर सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी. केळीसाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन * केळी बागेस प्रत्येक खोडास दहा किलो शेणखत किंवा किमान पाच किलो गांडूळ खत वापरावे.
स्पिरुलीनाचे आहार आणि आरोग्यविषयक चांगले फायदे आहेत. स्पिरुलीनामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटक, प्रथिनांमुळे कुपोषित लोकांसाठी, वयस्कर व्यक्तींसाठी हे सर्वोत्तम अन्न आहे. विकसनशील देशांत प्रगतीबरोबरच लोकसंख्या वाढ, आजार, अन्नधान्य, रोजगार यासारख्या समस्यासुद्धा भेडसावत आहेत. भारतासारख्या देशात आजही 42 टक्के लोकांमध्ये कुपोषण आढळून येत आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
हैदराबाद विद्यापीठ आणि नॅशनल अकादमी ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दूरस्थ शिक्षण पद्धतीवर आधारित कृषी तंत्रज्ञान - व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमाचा तपशील : हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून, त्यामध्ये दोन सहामाही सत्रांचा समावेश असेल.
आपल्याकडील पशुधनाला नेहमीच कमी-जास्त प्रमाणात उष्णतेचा ताण सहन करावा लागतो. एप्रिल ते जून महिन्यात तापमान वाढीबरोबरच हवेतील आर्द्रतादेखील वाढत असल्यामुळे या तीन महिन्यांत पशुपालकांना विशेषतः संकरित गाई आणि म्हशी यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना उष्णतेचा ताण होऊ नये म्हणून पशुपालकांनी व्यवस्थापनात काही बदल करणे आवश्यक आहे.
नारळ दूध व नारळ क्रीम ः यासाठी प्रथम नारळ सोलले जातात. सोललेले नारळ फोडून किंवा त्याचे दोन तुकडे करून, करवंटी, खोबरे व पाणी वेगळे केले जाते. खोबऱ्यावरील तपकिरी रंगाचा पापुद्रा किंवा आवरण धारदार चाकूने वेगळे केले जाते. हे खोबरे स्वच्छ पाण्याने धुऊन गरम पाण्याने निर्जंतुक केले जाते. निर्जंतुक केलेले खोबरे मिक्सरच्या साह्याने बारीक केले जाते. प्रेस यंत्राच्या साहाय्याने पिळून, त्यापासून दूध बाजूला केले जाते.
कवठाच्या गराचा वापर अनेक आजारांवर उपाय म्हणून करण्यात येतो. ही फळे पोटाच्या विकारांवर गुणकारी आहेत. या फळांची चव आंबट व तुरट असली तरी या फळांचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. कवठापासून रस, आरटीएस, स्वॅश, सिरप, चटणी तयार करता येते. कवठ फळामध्ये प्रति 100 ग्रॅम गरामध्ये 64.2 ग्रॅम पाणी, 17 ग्रॅम कर्बोदके, 7.1 ग्रॅम प्रथिने, 41 मिलिग्रॅम मॅग्नेशिअम व 17.1 मिलिग्रॅम रायबोफ्लेविन असते.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर कमी व जास्त वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात, हे सर्व नैसर्गिक चक्र सुरूच असते. अशा प्रकारच्या वायुदाबाच्या फरकामुळे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची क्षितिजसमांतर नैसर्गिकरीत्या हालचाल होते, त्यास आपण वारा असे म्हणतो. वाऱ्याची दिशा आणि गती ः वायुदाबातील फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो.
व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे "बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हजबंडरी' या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला जेव्हा प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील निवड परीक्षा ऑल इंडिया प्री व्हेटर्नरी टेस्ट - 2012 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ः अभ्यासक्रमाचा कालावधी ः बीव्हीएससी अँड एएच या पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहा महिन्यांच्या प्रा ...
गाई, म्हशी किंवा त्यांची लहान - मोठी वासरे / पारडे असोत त्यांचे आरोग्य उत्तम असेल, तरच त्यांची वाढ चांगली होते. वासरांचे मृत्यूचे प्रमाण हे जवळपास 10 ते 30 टक्के आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे अयोग्य व्यवस्थापन. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊ न देणे आवश्यक आहे. म्हणून वासरू जन्मल्यापासूनच त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. वासरांच्या मृत्यूस प्रामुख्याने पुढील बाबी कारणीभूत असल्याचे दिसून येते.