Last Update:
 
ऍग्रो स्पेशल
आता उन्हाळा जवळ येऊ लागला आहे. येत्या काळात तापमानातील बदलानुसार रेशीम कीटक संगोपन व तुती व्यवस्थापनात थोडेफार बदल घडवून आणल्यास कीटक संगोपन यशस्वी होऊन कोष उत्पादन व गुणवत्तेवर फारसा अनिष्ट परिणाम होत नाही. कीटक संगोपन काळात तापमान व आर्द्रतेचे सुनियंत्रण करून कीटकांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्यास संगोपन चांगले होते. रेशीम कीटकांच्या वाढीसाठी, तसेच योग्य शारीरिक क्रियांसाठी तापमान व आर्द्रतेचे महत्त्व आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

आपल्या हातात काही नाही असे म्हणत उगीचच रडत बसायचे नाही. त्यापेक्षा प्रयत्न करायचे, कष्ट करायचे, मग फळ मिळतेच. सोलापूर जिल्ह्यातील मालरिक्षा वाहतूक करणाऱ्या सिद्धेश्‍वर यांचे हे बोल आहेत. पाण्याची टंचाई लक्षात घेता आपल्या रिक्षाचा वापर करून अन्य शेतकऱ्यांकडून, तसेच टॅंकरचे पाणी त्यांनी आपल्या बागेला पुरवले. त्यांच्या मेहनतीची फळे उत्पन्नाच्या रूपातून त्यांच्या पदरी पडली आहेत. शेतीतील त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

जी शेती पाण्याअभावी पिकत नव्हती, ती आता विहीर पुनर्भरणामुळे बागायत करणे शेतकऱ्यांना शक्‍य झाले आहे. नाशिक तसेच औरंगाबाद जिल्ह्यात काही वर्षांपासून हे प्रयोग शेतकरी चळवळ किंवा लोकसहभागातून यशस्वीपणे राबवत होते. यंदाच्या वर्षापासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरणाला संमती देण्यात आली आहे. या माध्यमातून भूजलाची पातळी वाढवणे व शेतीला पाण्याची सोय करणे अधिकाधिक शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे.

Tuesday, February 21, 2012 AT 03:00 AM (IST)

सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील सौ. मनीषा चंद्रकांत शिंदे व सौ. वंदना मोहन देसाई या महिलांनी गिरिराज कोंबडीपालन व्यवसायातून स्वावलंबी बनण्याची किमया साध्य केली आहे. या दोन्ही महिलांच्या कुटुंबाला शेती मर्यादित आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मजुरी करावी लागत असे. मात्र कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांचे कष्ट कमी झाले.

Tuesday, February 21, 2012 AT 02:30 AM (IST)

फळबागेसाठी लागणाऱ्या शेण आणि गोमूत्रासाठी खिलार जातीच्या गाईंचे संगोपन गार्डी (ता. खानापूर, जि. सांगली) येथील तरुण शेतकरी अतुल बाबर यांनी केले आहे. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब फळांचा दर्जा चांगला मिळण्यास मदत झाली आहे. दुधाच्या उत्पादनावर लक्ष न देता राबवलेली कमी खर्चाची चराई व खाद्य पद्धत सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे, तसेच वासरांच्या विक्रीतून अधिक फायदा मिळणार आहे.

Monday, February 20, 2012 AT 03:00 AM (IST)

संक्षिप्त परिचय जन्म - 24 एप्रिल 1910 मृत्यू - 9 फेब्रुवारी 1979 महत्त्वाचे चित्रपट - सावकारी पाश, बलिदान, हा माझा मार्ग एकला, पाठलाग, ऊन पाऊस, लाखाची गोष्ट, पुढचं पाऊल, पेडगावचे शहाणे पुरस्कार - राष्ट्रपती पदक दोन वेळा, राज्य सरकारचे तीन वेळा पुरस्कार.   शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ.

Sunday, February 19, 2012 AT 03:00 AM (IST)

मागील लेखात आपण न्यूझीलंडमधील दुग्ध व्यवसाय व सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडील सरासरी दुग्धोत्पादन खूप कमी आहे. येत्या काळात देशांतर्गत तसेच परदेशांतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी लक्षात घेता स्वच्छ दूध निर्मितीसाठी जातिवंत जनावरे गोठ्यात असली पाहिजेत, त्याचबरोबरीने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब पशुपालकांनी केला पाहिजे.

Sunday, February 19, 2012 AT 02:45 AM (IST)

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्‍यातील कोरेगावने लोकसहभागातून विकासाचे अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. विकासाच्या मार्गावरील कोरेगाव हे आदर्श गाव म्हणून पुढे आले आहे. राजकीय गटतट बाजूला ठेवून ग्रामस्थांनी विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. पुणे - बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीपासून पूर्वेला पाच किलो मीटर अंतरावर वारणा नदीकाठी कोरेगाव वसले आहे. गावची लोकसंख्या सहा हजार असून कुटुंब संख्या 840 इतकी आहे.

Sunday, February 19, 2012 AT 02:30 AM (IST)

विदर्भात सहकार चळवळ लयास लागली, अशी चर्चा होत असताना याच विदर्भातील काही सहकारी संस्थांनी या चळवळीला लोकाभिमुखतेच्या बळावर नवी उभारी देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती ही त्यापैकीच एक होय. बाजार समितीने उत्पन्नातील मोठा हिस्सा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण विकासाच्या कल्याणकारी योजना राबविण्यावर खर्ची घालत सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

Saturday, February 18, 2012 AT 03:15 AM (IST)

राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हैदराबादच्या इक्रिसॅट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात रब्बी ज्वारी उत्पादनाचा होप प्रकल्प सध्या राबवला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पंचसूत्री तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. नगर जिल्ह्यात ज्यांनी सुधारित वाण वा होप प्रकल्पांतर्गत पंचसूत्रीतील किमान काही सूत्रांचा वापर केला, त्यांना धान्य उत्पादनात 40 टक्के वाढ, तर कडबा उत्पादनात 25 टक्के वाढ गेल्या दोन वर्षांत मिळाली.

Saturday, February 18, 2012 AT 02:45 AM (IST)

पुरंदरच्या (जि. पुणे) कोरडवाहू भागात खरबुजाच्या शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत. खरबुजाचे तंत्र जाणून त्याचे हंगामी आणि बिगरहंगामी उत्पादन घेतले जात असून, त्यातून चांगला फायदा हे शेतकरी मिळवत आहेत. खरबुजाची शेती करणाऱ्या राहुल भोसले व मुरलीधर काळाणे यांची ही यशकथा. पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा तालुका अंजीर, सीताफळासारख्या फळपिकांचे आगार मानला जातो मात्र या भागातील काही शेतकरी नवीन पिकांकडे वळल्याचे दिसून येत आहे. कोथळे (ता.

Thursday, February 16, 2012 AT 02:30 AM (IST)

सातारा जिल्ह्यातील मालखेड (ता. कऱ्हाड) गावातील शेतजमिनी पाण्याच्या निचऱ्याअभावी नापिक बनत चालल्या होत्या. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या "एनएआयपी'व मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था आणि कालवडे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या गावातील 22 एकरात भूमिगत निचराप्रणालीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्पामुळे पूर्वी नापिक झालेल्या शेतजमिनींना जीवनदान मिळून आता शेतकऱ्यांना त्यात हंगामनिहाय पिकांचे व्यवस्थापन करणे शक्‍य झाले आहे.

Thursday, February 16, 2012 AT 02:15 AM (IST)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रिसॅट) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात रब्बी ज्वारी उत्पादकतावाढीचा प्रकल्प (होप) राबविला जात आहे.

Wednesday, February 15, 2012 AT 05:15 AM (IST)

औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर व नरसापूर ही गावे खास हुरडा उत्पादनासाठी ओळखली जात आहेत. हुरडा पार्टीबरोबर तयार पॅकमधूनही राज्यात हुरडा विक्री करून या शेतकऱ्यांनी मार्केटिंगचे तंत्रही चांगल्या प्रकारे अवगत केले आहे. हिवाळ्यात अनेक ठिकाणी हुरडा पार्टी सुरू असते. यासाठी आज सुरती वाणाचा हुरडा वापरला जातो. या वाणाचे वैशिष्ट्य असे, की ज्वारीचे कणीस हाताने चोळताच त्याचे दाणे मोकळे होतात.

Tuesday, February 14, 2012 AT 03:15 AM (IST)

पॉलिहाऊस उभारण्यासाठी कोरडवाहू जमीन विकायला निघालेल्या शेतकऱ्याने आता स्वतःची सात एकर जागा विकत घेतली आहे. स्वतःचे अडीच एकर आणि कराराने दोन एकर असे साडेचार एकरचे पॉलिहाऊस उभारले आहे. नातेवाइकांच्या भागीदारीतूनच गुलाबाच्या फुलांची यशस्वी निर्यात साधली आहे. स्वतःचे पॉलिहाऊस असावे असे एक स्वप्न घेऊन ते पूर्ण करणाऱ्यांनी शून्यातून विश्‍व निर्माण करून गरुडझेप घेतली आहे. पंडित दादा शिकारे (मूळ गाव बाळगव्हाण, ता. जामखेड, जि.

Tuesday, February 14, 2012 AT 03:15 AM (IST)

कोल्हापूर शहरापासून नजीक असलेल्या शिंगणापूर येथील मकरंद कुलकर्णी या युवकाने विविध शेतीमालापासून मागणीनुसार विविध प्रक्रिया पदार्थ करण्याचा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून सुरू केला आहे. अनेक अडचणींना तोंड देत या युवकाने सुरू ठेवलेली प्रक्रिया उद्योगाची ही वाट या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दिशादर्शक राहणार आहे. गुऱ्हाळांचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर जिल्हा.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

ब्रिटिशांनी जमीन महसूल मिळावा म्हणून हक्क नोंदी चालू केल्या तरी कालांतराने महसुलापेक्षा अधिकार अभिलेखास जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या वेळी प्रथमतः 1915 ते 1930च्या काळात जमीन महसूल ठरविला गेला, तोच महसूल आजही कायम आहे. त्यामुळे गंमत अशी, की संपूर्ण गावचा महसूल एका मामुली तलाठ्यासही सहज भरणे शक्‍य होते. पूर्वीचा नवे पैशातील आकार आजही तसाच चालू आहे.

Monday, February 13, 2012 AT 02:45 AM (IST)

व्यावसायिक पीक पद्धतीच्या बळावर विदर्भातील शेतीतही नजीकच्या काळात स्थित्यंतरे घडू लागली आहेत. आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा असलेला अकोलाही त्याला अपवाद ठरला नाही. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्‍यातील दानापूरचे रहिवासी असलेल्या गोपाल व संजय या येऊल बंधूंनी वीस एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवडीतून व्यावसायिक शेतीचे नवे संदर्भ मांडले आहेत. ही शेती त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेणारी ठरली आहे.

Monday, February 13, 2012 AT 02:30 AM (IST)

नाशिक - नाशिक भागात दोन दिवसांपूर्वी शून्यानजीक गेलेले तापमान हळूहळू वाढत किमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले आहे. मात्र अद्यापही द्राक्षवेली "कोल्ड शॉक'मधून बाहेर आलेल्या नाहीत. निफाड, दिंडोरी पूर्व, नाशिक व कळवण तालुक्‍यांतील द्राक्ष बागांची 30 ते 50 टक्के पाने करपली असून कोवळे द्राक्ष घड सुकले आहेत. प्रत्येक अवस्थेतील द्राक्षांना बसलेला थंडीचा फटका शिवारातून दिसून येत आहे.

Sunday, February 12, 2012 AT 02:15 AM (IST)

पुणे - गेल्या चार दिवसांतील थंडीच्या तीव्र लाटेने राज्यातील सुमारे अडीच लाख हेक्‍टरवरील फळपिकांना मोठा जबरी फटका बसला आहे. नाशिक, जळगाव, नगर, पुणे जिल्ह्यांत हजारो हेक्‍टर पिकांना झळ बसूनही महसूल विभागामार्फत अद्याप नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांना सुरवात करण्यात आलेली नाही. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगावमध्ये 48 हजार हेक्‍टर केळी पिकाचे 10 ते 15 टक्के नुकसान झाले आहे.

Sunday, February 12, 2012 AT 02:15 AM (IST)

वैराग, जि. सोलापूर -गो-मातेने कुटुंबाचा विकास झाला. कुटुंबाचे व जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय मिटू मनोहर काळदाते यांना आला. येळंब (ता. बार्शी) येथील पाच एकर त्यांची शेती. त्यांनी सांभाळलेल्या निमजर्सी जातीच्या गाईने आजवर दुधाच्या कालावधीत 71 हजार 200 लिटर दूध देत, सात ते सव्वासात लाख रुपयांचे आणि तीन ते चार लाख रुपये किमतीच्या खोंडांचे उत्पन्न दिले. या उत्पन्नातूनच मुलांचे शिक्षण, नोकरी व संसार सुखी झाला.

Sunday, February 12, 2012 AT 01:15 AM (IST)

मुंबई - मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या "सह्याद्री कृषी सन्मान 2012' या पुरस्कारांचे शुक्रवारी (ता. 10) येथे दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख आणि डॉ. ए. टी. शेरीकर, राष्ट्रीय केमिकल फर्टिलाझरचे अध्यक्ष आर.जे.

Sunday, February 12, 2012 AT 01:00 AM (IST)

25 जानेवारी 2011 रोजी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे 15 वे कुलगुरू म्हणून डॉ. के. पी. गोरे यांनी पदभार स्वीकारला, त्यास नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात राबविलेले विविध प्रकल्प, उपक्रम, घटना यांचा थोडक्‍यात आढावा. डॉ. किशन पुंजाजीराव गोरे यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून पूर्ण करून एम. टेक. व पीएच.डी.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद जवळच्या निंबी गावातील गणपत हरीमकर या प्रयोगशील शेतकऱ्याने हिवाळ्यात काकडीची लागवड करून चांगले उत्पादन व उत्पन्न घेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. थंडीत काकडीचे पीक घेणे तसे कठीण. मात्र प्लॅस्टिक मल्चिंग, बेड, ठिबक सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करीत त्यांनी हे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद-वाशीम मार्गावरील चार किलोमीटर अंतरावरील निंबी हे छोटेसे गाव.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

चार सूत्री भातशेती, एसेंरा तंत्रज्ञानाचे जनक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषिशास्त्रज्ञ वा कृषिरत्न डॉ. नारायण कृष्णराव सावंत (वय 76) यांचे दीर्घ आजाराने 21 डिसेंबर, 2011 रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्यापश्‍चात सुचित्रा आणि रूपाली या दोन मुली, पत्नी सुजाता व बंधू डॉ. गजानन सावंत असा परिवार आहे. डॉ. सावंत यांनी विकसित केलेल्या भात लागवडीच्या चार सूत्री तंत्रज्ञानाने भात उत्पादनात वाढ होऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला.

Friday, February 10, 2012 AT 02:00 AM (IST)

जुन्नर तालुक्‍यातील (जि. पुणे) बोरी येथील विठ्ठल शिंदे यांनी अवघ्या चार एकर क्षेत्रात प्रक्रियाधारित शेतीचे अनोखे व आदर्श मॉडेल उभारले आहे. विविध शेती पद्धतींचा संगम, टप्प्याटप्प्याने बारमाही उत्पादन व उत्पादनावर प्रक्रिया करून त्याची ग्राहकांना विक्री हे त्यांच्या शेती पद्धतीचे मुख्य सूत्र आहे. बोरी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील विठ्ठल शिंदे यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Thursday, February 09, 2012 AT 02:30 AM (IST)

अभ्यासवृत्ती, प्रयोगशीलतेच्या बळावर विदर्भातील शेतकरी आता आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करू लागला आहे. मोप (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील रामेश्‍वर तनपुरे हे अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांचा वारसा जपणाऱ्यापैकी एक शेतकरी. सुधारित शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत त्यांनी आर्थिक विकासाची दिशा पकडली आहे. वाशीम जिल्ह्यातील बोरखेडी सिंचन प्रकल्पात जमीन अधिग्रहण झाल्यानंतर तनपुरे कुटुंबीय मोप येथे स्थलांतरित झाले.

Thursday, February 09, 2012 AT 02:30 AM (IST)

वाशीम जिल्ह्यातील सावरगाव येथील प्रगतिशील शेतकरी कुलदीप राऊत यांनी तब्बल 23 एकरांवर डाळिंबाची शेती करून ती चांगली फुलवली आहे. काढणीला येत्या काही दिवसांतच सुरवात होणार आहे. मात्र उत्पादनापेक्षाही व्यापक स्तरावर डाळिंबासारखे नगदी फळपीक घेणे, त्या माध्यमातून पीकबदल करणे आणि विदर्भासाठी अशा पिकांचा आश्‍वासक पर्याय देणे या गोष्टी या प्रयोगासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

Wednesday, February 08, 2012 AT 12:00 AM (IST)

अल्पभूधारक शेतकरी दांपत्याचे प्रयत्न एका अल्पभूधारक शेतकरी दांपत्याने कापूस पीक सांभाळताना खडकाळ जमिनीवर कृषी विभागाच्या सल्ल्याने टोमॅटो पीक घेतले व कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. कोणतेही तंत्र वेळेवर, तसेच गरजू व होतकरू शेतकऱ्यांपर्यंत पोचले, तर त्याचा निश्‍चित फायदा होतो आणि आम्हाला तो झाला, असे हे दांपत्य अभिमानाने सांगते. जमीन मुरमाड पण भर पावसात जरी चालत गेलात, तरी पायांना चिखल चिकटणार नाही अशी मातीची अवस्था.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

लातूर जिल्ह्यातील औसा येथील अरुण भुजबळ या कृषी पदवीधर तरुणाने जिद्द, तांत्रिक ज्ञानाचा वापर, दूरदृष्टी, बाजारपेठेचा अभ्यास आदी गुणांच्या जोरावर रोपवाटिका व्यवसाय फायदेशीर केला आहे. आजच्या तरुणांसाठी त्याचा प्रयोग पथदर्शी ठरेल यात शंकाच नाही. नोकरीसाठीच निव्वळ शिक्षण हा समज केव्हाच मागे पडतो आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने सिन्नर तालुक्‍यातील हरसुले गावाच्या शिवारात प्रत्यक्षात आणली आहे. युवामित्र संस्थेच्या आवारातील या ऍग्रिमॉल मधून विविध निविष्ठा शेतकऱ्यांना वाजवी दरात मिळत आहेत. शेतीसाठी हवे ते शेताजवळच तेही वाजवी दरात, खात्रीचे मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या शहराकडे जाऊन येण्यासाठीचा वेळ आणि खर्चातही बचत होत आहे. त्याचबरोबरच शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांना अशा उपक्रमातून बळ मिळणार आहे.

Monday, February 06, 2012 AT 02:15 AM (IST)

 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: