Last Update:
 
ऍग्रो व्हिजन
भाज्या टिकवण्यासाठी 'आरआरसीएटी'ने केले तंत्रज्ञान विकसित शेतीमालामध्ये भाज्या या नाशवंत असल्याने त्यांच्या साठवणीची समस्या मोठी आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही बसतो. त्यामुळे भाज्या टिकवण्यासाठी इंदूर येथील राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेने (RRCAT) इलेक्‍ट्रॉनिक बीम या तंत्रज्ञानाचा वापर स्थानिक बाजारपेठेसाठी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

सेलेनियम आणि बोरॉन या घटकाचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. त्यासाठी केलेल्या सिंचनामुळे हे क्षार वाहून, झिरपून पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळतात. त्यामुळे अन्य ठिकाणची माती आणि पाण्याचे कालवे या विषारी घटकांमुळे प्रदूषित होत आहेत. हे प्रदूषण रोखण्यासाठी निवडुंगाच्या काही जातीचा वापर करणे शक्‍य असल्याचे अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेतील मृद्‌ शास्त्रज्ञ गॅरी बॅनिलोज यांच्या संशोधनात आढळले आहे.

Tuesday, February 21, 2012 AT 03:00 AM (IST)

जगातील सर्वांत तिखट मिरची असल्याचे अनेक व्यावसायिक फायदे आहेत. मसाले तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी या मिरच्या अधिक फायदेशीर ठरतात. त्यामुळे जगभरात सातत्याने याबाबत वाद सुरू असतो. आजवर जगातील सर्वांत तिखट मिरचीचा मान त्रिनिदाद मोरूगा स्कॉर्पियन या मिरचीकडे होता मात्र नागालॅंडच्या ईशान्येकडे पिकवल्या जाणाऱ्या "भूत जोकोलिया' या मिरचीने तिखटपणामध्ये स्पर्धा सुरू केली आहे.

Tuesday, February 21, 2012 AT 03:00 AM (IST)

जागतिक कृषी क्षेत्राने तापमान बदलाच्या प्रश्‍नावर एकत्रितपणे प्रयत्न केल्यास तापमानात होणारी वाढ सुसह्य करण्यास मदत होईल, त्यासाठी पर्यायी शेतीच्या पद्धतींचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे. या पद्धतीमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये घट होऊ शकत असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.

Monday, February 20, 2012 AT 03:00 AM (IST)

"टास्मानियन डेव्हिल' हा लहान कुत्र्याच्या आकाराचा प्राणी ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतात सर्वत्र आढळतो. मात्र या प्राण्यांमध्ये होत असलेल्या तोंडाच्या कर्करोगामुळे (फेशियल ट्यूमर) त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे. या प्राण्यांना वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्राण्यांच्या जनुकीय माहितीचा नकाशा उलगडण्यात आला आहे.

Monday, February 20, 2012 AT 02:30 AM (IST)

नारळाचे झाड उंच असल्याने नारळ काढण्यामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. संपूर्ण शेती महिलांनी केली तरी त्यांना नारळ काढण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतीय मसाले संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे. केरळ राज्यातील कोझिकोड येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने (IISR) पेरूवन्नमुझी कृषी विज्ञान केंद्रामध्ये महिलांसाठी नारळ काढणीचे सहा दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले होते.

Sunday, February 19, 2012 AT 03:15 AM (IST)

माती परीक्षणावरून जमिनीच्या सुपीकतेबद्दल परीक्षण करणे सोपे जाते. जमिनीतील वाळूचे प्रमाण, सिल्टचे प्रमाण, चिकण मातीच्या प्रमाणावरून, तसेच जमिनीच्या खोलीवरून उथळ, मध्यम खोल, खोल जमिनी, रंगावरून तांबडी, काळी, भुरकट रंगाच्या जमिनी, आम्ल-विम्ल निर्देश अंकावरून आम्ल अथवा विम्ल प्रकारच्या जमिनी, खारवट जमिनी असे विविध भाग अभ्यासावे लागतात. त्यावरून उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

सेंद्रिय शेतीतून उत्पादित केलेला शेतीमाल निर्यातीसाठी चांगल्या संधी आहेत मात्र त्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण करण्याची आवश्‍यकता असते. हे प्रमाणीकरण युरोपीय संघ आणि अमेरिकेसाठी वेगळे असल्याने शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

बटाटा पिकानंतर टोमॅटो पीक हे जगातील सर्वांत मोठे भाजीपाला पीक असून, अनेक देशांमध्ये ते घेतले जाते. साधारणपणे 144 देशांमधील वार्षिक उत्पादन हे 100 दशलक्ष टन इतके आहे तसेच प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून बाहेर पडणाऱ्या बिया, गर आणि साल अशा उपघटकांचे प्रमाणही साहजिकच अधिक आहे.

Thursday, February 16, 2012 AT 03:00 AM (IST)

शेतीमधील पिकांवर येणाऱ्या अनेक किडींचे पक्षी हे मुख्य भक्षक आहेत. शेतावरील या किडी खाण्यासाठी पक्षी येत असतात, तेव्हा बसण्यासाठी काही ठराविक झाडांचीच निवड करत असल्याचे अमेरिकेतील यूसी इरविन आणि वेसलियान विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन "दि अमेरिकन नॅचरालिस्ट' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.

Thursday, February 16, 2012 AT 03:00 AM (IST)

अलीकडे स्वयंचलित साधनांमध्ये सेन्सरचा वापर वाढला आहे. एका यंत्रणेमध्ये अनेक सेन्सर लावलेले असतात, त्यातून माहिती गोळा होत असते मात्र त्यातील माहिती ही एखाद्या संगणकावर घेऊन तज्ज्ञांना त्यांची तुलना व विश्‍लेषण करावे लागते. या अडचणीवर उपाय म्हणून सेन्सर एकमेकांशी संवाद साधून तुलना करू शकतील, असे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा चांगला उपयोग होणार आहे.

Wednesday, February 15, 2012 AT 06:00 AM (IST)

पृथ्वीवरील सुरवातीच्या प्रजातीमधील वनस्पतीची रूपरेषा पोसिडोनिया ओसेनिका या सागरी वनस्पतीमध्ये आढळून येते, त्यामुळे त्या काळात या प्रजातीची वाढ आणि जनुकीय गुणधर्म पुढे नेण्याची पद्धत यावर पश्‍चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील सागरी संस्थेच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यातून पृथ्वीच्या त्या काळातील अनेक गोष्टी उलगडता येणे शक्‍य होणार आहे. सागरी पर्यावरणामध्ये सागरी गवते ही मुख्य पाया असल्याने गेल्या वीस वर्षांमध्ये यावर संशोधन सुरू आहे.

Wednesday, February 15, 2012 AT 03:30 AM (IST)

शरीराच्या कामामध्ये दिवस- रात्रीमध्ये एक तालबद्धपणा असतो. त्या तालबद्धतेला जैविक घड्याळ असे म्हटले जाते. या जैविक घड्याळासाठी कार्यप्रणाली मागील तत्त्व शोधण्यासाठी अमेरिकेतील पेनिसिल्व्हीया विद्यापीठातील मेंदू विज्ञान संस्थेतील संशोधिका अमिता सेहगल यांनी आचार्य पदवीसाठी फळमाशीवर संशोधन केले आहे. फळमाशीतील जैविक घड्याळासाठी मूलद्रव्यीय पथ मिळाला असून काही प्रथिनाद्वारे या यंत्रणेचे नियंत्रण होते.

Wednesday, February 15, 2012 AT 03:00 AM (IST)

"जिऑग्राफिक प्रोफालिंग (जीपी) हे सांख्यिकीय साधन कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्ये गुन्हा घडलेल्या ठिकाणाची नोंद घेतली जाते. त्यावरून गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी मदत मिळते. ही पद्धत जगभरातील पोलिस गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वापरतात. या पद्धतीचा वापर क्वीन मेरी जैव आणि रासायनिक शास्त्र संस्थेतील संशोधक डॉ. स्टीव्हन ली. कोम्बर यांच्या गटाने जैवविविधतेला धोका असणाऱ्या प्रजातींचे मूळ स्रोत शोधण्यासाठी केला आहे.

Tuesday, February 14, 2012 AT 03:45 AM (IST)

परदेशांमध्ये मुक्त पद्धतीची चराईची पद्धती राबवली जाते. त्यामध्ये जनावरांचा कळप हा चारा मिळेल त्या प्रमाणे कुरणामध्ये पुढे जात असतो. त्यामध्ये संतुलित आहाराचा विचार फारसा होत नाही. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी डेन्मार्क येथील आर्हास विद्यापीठातील संशोधकांनी गाईंसाठी उपयुक्त ठरू शकतील, अशा पर्यायी वनस्पती कशा प्रकारे उपलब्ध करता येतील, या विषयावर संशोधन केले आहे.

Tuesday, February 14, 2012 AT 03:30 AM (IST)

गेल्या शतकामध्ये यांत्रिक पद्धतीने मासेमारी केली जात असल्याने माशांच्या अनेक प्रजाती संकटात सापडल्या आहेत. त्याबाबत सातत्याने विचारमंथन केले जात असले, तरी त्यांच्या संख्येत अचूक किती घट झाली यावर अभ्यासाची गरज होती. ती लक्षात घेऊन स्पेन आणि अन्य देशांतील संशोधकांच्या गटाने मागील 50 वर्षांतील मासेमारीतून मिळालेल्या माशांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

बांबूपासून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यावर ग्रामीण भागातील काही समाज उपजीविका करतात. त्या बांबूच्या उपयोगितेमध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. मोबाईलला आकर्षकता आणण्यासाठी विविध डिझाइन कलाकार विकसित करत असतात. इंग्लंडमधील मिडलसेक्‍स विद्यापीठात डिझाइन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने बांबूपासून मोबाईल बनवला आहे. तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या वस्तू आणि उपकरणांच्या बाजारात प्लास्टिक आणि अन्य घटकांचा वापर वाढतो आहे.

Monday, February 13, 2012 AT 02:45 AM (IST)

जमिनीची सुपीकता मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेशी संबंधित असते. जमिनीत अन्नद्रव्ये असूनही ती उपलब्ध होत नाहीत तेव्हा जमिनीचा सामू अधिक असतो. जमिनीत सोडिअमचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असते. क्षारांचे प्रमाण अधिक असते. जमिनीत अन्नद्रव्येच उपलब्ध अथवा नसतीलच तर त्या जमिनी नापिक आणि त्यांची उत्पादनक्षमता घटत जाते. जमिनीच्या उत्पादनक्षमतेसाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म महत्त्वाचे असतात. अतिक्षाराने हे गुणधर्म बदलतात.

Saturday, February 11, 2012 AT 12:15 AM (IST)

आरोग्यासाठी "बॅलन्स्ड डाएट'चा बोलबाला अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी विविध माध्यमातून आहार तज्ज्ञ सुयोग्य आहाराविषयी विविध सल्ले देत असतात. आरोग्यासाठी योग्य व परिपूर्ण पोषक आहाराचे महत्त्व प्राण्यांना मात्र सांगावे लागत नाही. त्यांच्याकडे ते उपजत असल्याचे इंग्लंडमधील एक्‍स्टर विद्यापीठ आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनात पुढे आले आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

जंगले आणि चराऊ कुरणामध्ये उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. या आगीमुळे चारा, वन्य वनस्पती आणि वन्य जिवांची मोठ्या प्रमाणात हानी होते. या आगीमुळे गवत आणि झुडपे नष्ट होत असल्याने जलसंधारणामध्ये घट होते आणि मातीची झीज वाढते. त्यामुळे होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी अमेरिकेतील कृषी विभागाच्या ओरेगॉन येथील संशोधन विभागाने संशोधन केले आहे.

Friday, February 10, 2012 AT 03:15 AM (IST)

सूर्यफुलासारख्या काही वनस्पती या अधिक सूर्यप्रकाशासाठी फुलाची दिशा बदलत असतात. तसेच त्यांच्या फुलांतील दाण्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण असते. एका विशिष्ट कोनामध्ये कललेली किंचित नागमोडी अशी दाण्यांची रचना असते. त्यामुळे अधिक तीव्रतेची ऊर्जा मिळवणे शक्‍य होते. या ऊर्जेला "एकत्रित सौर ऊर्जा' (सीएसपी) असे म्हणतात.

Friday, February 10, 2012 AT 02:30 AM (IST)

सर्वसाधारणपणे दोन प्रजाती किंवा वनस्पतींमधील नाते तपासण्यासाठी संशोधक प्रामुख्याने "डीएनए'मधील जनुकातील साम्य आणि फरक यांचा अभ्यास करतात. मात्र एकाच प्रदेशात वाढत असलेल्या वनस्पतीच्या हरितद्रव्यातील घटकापासून मिळवलेल्या जनुकामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आढळते. वेगळ्या प्रजाती असूनही हे साम्य त्यांच्यात कसे आढळते, याबाबत जर्मनीमधील मॅक्‍स प्लॅंक मूलद्रव्यीय वनस्पती जैवशास्त्र संस्थेतील संशोधक राल्फ बॉक व सहकाऱ्यांनी संशोधन केले आहे.

Thursday, February 09, 2012 AT 02:45 AM (IST)

काळा टोमॅटो, पिवळे गाजर कधी पाहिले आहे काय? असे एखाद्याने विचारले, तर समोरची व्यक्ती चेष्टा करतेय म्हणून तुम्ही दुर्लक्ष कराल. मात्र आता अशा विविध रंग असलेल्या भाज्या उपलब्ध होऊ शकणार आहेत. इस्राईलमधील एका कंपनीने याबाबत संशोधन केले असून गाजरामध्ये गुलाबी, पिवळा आणि जांभळा रंग, तसेच टोमॅटोमध्ये गडद जांभळा आणि काळा रंग आणण्यात यश आले आहे.

Thursday, February 09, 2012 AT 02:45 AM (IST)

अँडेज- ऍमेझॉन प्रदेशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात मिळाले पुरावे बदलते वातावरण आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. पेरू आणि बोलिव्हियामधील अँडेज- ऍमेझॉन प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून, जगातील वेगाने बदलत असलेल्या भागांपैकी एक भाग आहे. या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला असून, प्रजाती आणि पर्यावरणाचा उपग्रहाद्वारे नकाशे तयार करण्यात आले आहेत.

Wednesday, February 08, 2012 AT 12:00 AM (IST)

भारतातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोलाचे संशोधन झाले आहे. आंबा उत्पादनात तीन ते चार पटीने वाढ मिळू शकेल, अशा नव्या चार संकरित आंबा जाती भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) विकसित केल्या आहेत. या जातीची नावे पुसा प्रतिभा, पुसा पीतांबर, पुसा श्रेष्ठ आणि पुसा लालिमा आहेत. या जाती लोकप्रिय दशहरी आणि निलम या जातीच्या गुणधर्माच्या आहेत. झाडाचे आकारमान लहान असून सघन लागवडीसाठी उत्तम आहेत. हेक्‍टरी रोपांची संख्या सहा पटीने वाढवणे शक्‍य आहे.

Wednesday, February 08, 2012 AT 12:00 AM (IST)

स्पेनमधील बास्क विद्यापीठातील संशोधन तापमानात होणाऱ्या बदलामुळे अवर्षणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा विविध पिकांवर विपरीत परिणाम होणार आहे. मात्र स्पेनमधील बास्क विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ ऍनाबेल रोब्रेडो यांनी बार्ली (जव) पिकांवर या अवर्षणाचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे सांगितले आहे. जवस पिकामध्ये असलेल्या स्वयं प्रतिकारक यंत्रणेमुळे पाण्याच्या कमतरतेला सामोरे जाण्याची क्षमता बार्ली पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

आफ्रिकेतील त्रासदायक तणाच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञान होईल विकसित नेदरलॅंडमधील वेजनिंजन विद्यापीठाचे संशोधन आफ्रिकेसह अन्य विकसनशील देशांमध्ये स्ट्रिगासारख्या तणामळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परजीवी वनस्पतीचे नियंत्रण करण्यासाठी सातत्याने संशोधन केले जाते. नेदरलॅंडमधील वेजनिंजन विद्यापीठातील संशोधक मुहम्मद जमिल हे संशोधन करीत आहेत.

Tuesday, February 07, 2012 AT 12:00 AM (IST)

लेप्टोस्पायरोसिस हा जंगली, पाळीव आणि सर्व प्रकारच्या जनावरांना होणारा रोग आहे. त्यामध्ये हा जनावरांकडून माणसांना याची लागण होत असल्याने याचा धोका अधिक प्रमाणात जाणवतो. लेप्टोस्पायरोसिसचा प्रसार हा अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे जनावरांच्या संपूर्ण कळप प्रादुर्भावग्रस्त होतो. या रोगावर सातत्याने संशोधन सुरू असून अमेरिकेतील कृषी विभागाच्या संशोधकांनी जनावरांमध्ये होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या रोगासाठी लस विकसित केली आहे.

Monday, February 06, 2012 AT 02:45 AM (IST)

धावपळीच्या जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजनवाढीची समस्या वाढत आहे. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न संशोधक सातत्याने करत आहेत. तैवान आणि अमेरिकेतील विद्यापीठांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनात डाळिंबाच्या बियांचे तेल आणि तपकिरी सागरी तणाचा रसाचे मेद कमी करण्यातील गुणधर्म समोर आले आहेत. या संशोधनात या दोहोंच्या मिश्रणामध्ये चरबीच्या नियंत्रणासाठी कारणीभूत असलेल्या जनुकांची कार्यक्षमता वाढत आढळले आहे.

Sunday, February 05, 2012 AT 02:30 AM (IST)

गाजरगवत किंवा कॉंग्रेस या नावाने ओळखले जाणारे तण महाराष्ट्रासह देशभर सर्वत्र आढळते. या तणांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या तणांवर इथोपियामध्ये थंडीमध्ये तांबेरा हा रोग येतो. या रोगासाठी कारणीभूत सूक्ष्म जिवांची (पॅथोजन) ओळख पटविण्यात आली असून, त्याचे नाव "पक्‍सिनिया ऍबर्प्टा' (डीट. पार्थेनिकोला पर्मिली) असे आहे. या तांबेरा रोगामुळे गाजरगवताच्या कायिक वाढीवर आणि बिया उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे गाजरगवताच्या नियंत्रणासाठी "पी.

Sunday, February 05, 2012 AT 02:15 AM (IST)

सर्वसाधारणपणे सर्दी आणि फ्लू झाला नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. वर्षातून दोन ते सहा वेळा सर्दी ही प्रत्येकाला त्रास देत असते. लहान मुलांच्या बाबतीत वर्षातून 8 ते 12 वेळा सर्दीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर, शाळेतील हजेरीवरही याचा परिणाम होतो. आहारात लसणाचा वापर असणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्दीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे संशोधन पुढे आले आहे.

Saturday, February 04, 2012 AT 03:00 AM (IST)

 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: