|
बाजारभाव
-मुंबई  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. 17) कांद्याची 4900 क्विंटल आवक झाली. कांद्यास किमान 1250 ते कमाल 1700 व सरासरी 1475 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत लसणाची 800 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3500 व सरासरी 2750 रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची 12400 क्विंटल आवक होऊन 1050 ते कमाल 1250 व सरासरी 1150 रुपये प्रतिक्विंटल दर होते.
Wednesday, June 19, 2013 AT 05:30 AM (IST)
जनावरांच्या अंगावरील तसेच गोठ्यातील घागऱ्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी नीमतेल, करंज तेलाच्या द्रावणाचा वापर करता येतो. यामुळे जनावरांना उपाय होत नाही. जैविक गोचीडनाशकांची फवारणी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. डॉ. बाबासाहेब नरळदकर जनावरांच्या शरीरावर आढळणाऱ्या घागऱ्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो, हे पशुवैद्यक महाविद्यालयामधील परजीवीशास्त्र विभागामध्ये केलेल्या संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
फळभाज्यांची आवक घटली वांगी, गवार, भेंडी तेजीत औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे दर तेजीत राहिले. टोमॅटोला 1200 ते 2500 रुपये, तर सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल दर राहिले. या वेळी नारायणगाव, नगर भागातून टोमॅटोची 850 क्विंटल आवक झाली. मे महिन्यानंतर टोमॅटोचे दर स्थिर होते परंतु मराठवाड्यातील बाजारपेठेतून टोमॅटोला मागणी वाढल्याने दरात तेजी राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
नगर  - येथील बाजार समितीत गत सप्ताहात भुसारची 1425 क्विंटल आवक झाली. यात ज्वारीची सर्वाधिक 604 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1500 ते 2100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गावरान हरभऱ्याची 220 क्विंटल आवक झाली. गावरान हरभऱ्याला कमाल व किमान 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तुरीची 74 क्विंटल आवक झाली. तुरीला 3800 ते 3851 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
ज्वाला, लवंगी मिरचीची आवक तर ढोबळी मिरचीला मागणी वाढली नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कारले, दोडका या भाज्यांचे दर तेजीत राहिले. या वेलवर्गीय भाजीपाल्याची आवक अत्यल्प राहिली. दोडक्याच्या प्रति 14 किलोच्या क्रेटला 400 ते 750 रुपये, तर सरासरी 500 रुपये दर मिळाले. कारल्याच्या प्रति 14 किलोच्या क्रेटला 500 ते 1000 रुपये दर मिळाले.
Tuesday, June 18, 2013 AT 05:15 AM (IST)
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात बहुतांशी भाजीपाल्यांचे दर तेजीत राहिले. कांद्याचे दर तेजीत राहिले. कांद्याची दररोज चार ते पाच हजार पोत्यांची आवक झाली. कांद्यास 80 ते 180 रुपये, तर सरासरी 150 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. दोडका, भेंडी, कारली आदी भाजीपाल्याचे दर तेजीत होते. दोडक्याची 30 ते 50 पेट्या आवक होती. दोडक्यास 150 ते 400 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. भेंडीची पंधरा ते वीस करंड्या आवक होती.
Tuesday, June 18, 2013 AT 05:00 AM (IST)
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. 15) टोमॅटो तेजीत होते. टोमॅटोची 125 क्विंटल आवक झाली. टोमॅटोच्या प्रति 20 किलो वजनाच्या क्रेटला 500 ते 750 व सरासरी 600 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गत सप्ताहापासून टोमॅटोची आवक घटली आहे.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
कोल्हापूर  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. 13) कांदा, गवार तेजीत होते. कांद्याची सहा हजार पोती आवक झाली. कांद्यास दहा किलोस सरासरी 140 रुपये दर होता. गवारीची 73 पोती आवक होऊन दहा किलोस 350 ते 375 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत दोडक्याची 159 करंड्या आवक होऊन दहा किलोस 150 ते 425 रुपये दर होता. कारल्यास दहा किलोस 250 ते 360 रुपये दर होता.
Saturday, June 15, 2013 AT 05:30 AM (IST)
औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. 13) गवार तेजीत होती. गवारीची आठ क्विंटल आवक होऊन किमान 2500 व कमाल 3000 रुपये प्रति क्विंटल दर होते. गवारीस सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत 44 क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीस 1500 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दर होते. कांद्याची 312 क्विंटल आवक होऊन 500 ते 1300 रुपये प्रति क्विंटल दर होते.
Friday, June 14, 2013 AT 05:15 AM (IST)
मुंबई  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाच्या दरांमध्ये सोमवारी (ता. 10) तेजी होती. वाशी मार्केटमध्ये 10,350 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला 1150 ते 1650 व सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत 11,120 क्विंटल बटाट्याची आवक होऊन 1000 ते 1250 रुपये प्रति क्विंटल दर होते. लसणाची 1480 क्विंटल आवक होऊन लसणास 1600 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दर होते.
Wednesday, June 12, 2013 AT 04:45 AM (IST)
लासलगाव, जि. नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कांद्याची आवक वाढली, तर सरासरी भावातही प्रति क्विंटल 140 रुपयांची वाढ मिळाली. भुसारमध्ये गहू, मका, हरभऱ्याच्या आवकेत घट झाली. बाजरी व सोयाबीनची आवक वाढून दरातही वाढ झाली. मक्यासही दरवाढ मिळाली, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीतील आवक व दर शेतीमाल ---आवक ---किमान ---कमाल ---सरासरी दर गहू ---514---1445---2351---1693 बाजरी - 284 - .... - ... - ....
Tuesday, June 11, 2013 AT 05:15 AM (IST)
येवला, जि. नाशिक  - गत सप्ताहात येवला मुख्य बाजार आवारात, तसेच आंदरसूल उपबाजार आवारात कांदा आवकेत घट झाली तर बाजारभाव 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान होते. उन्हाळ कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यांत, तसेच परदेशांत मागणी चांगली होती. सप्ताहात कांदा आवक 17 हजार 492 क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान 700 ते कमाल 1412, तर सरासरी 1200 रुपये होते.
Tuesday, June 11, 2013 AT 04:30 AM (IST)
दुष्काळाचा परिणाम आल्याला मिळाला सरासरी 12 हजार रुपये दर नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात आल्याला तेजीचे दर राहिले. या वेळी आल्याची सरासरी 12 क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी वाढती राहिल्याने आल्याला प्रति क्विंटलला आठ हजार रुपये ते 18,500 रुपये व सरासरी 12 हजार रुपये असा दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गंगथडीच्या कोठुरे, सायखेडा, शिंगवे या काही भागातील मोजक्या शेतकऱ्यांकडून नाशिकच्या बाजारात आल्याची आवक होते.
Tuesday, June 11, 2013 AT 04:00 AM (IST)
ब्रॉयलर कोंबड्यांच्या दरात पंधरा टक्क्यांनी सुधारणा झाली असून, नियंत्रित पुरवठा आणि हवामानातील बदल या दोन घटकांमुळे तेजीला आधार मिळाला आहे. दुसरीकडे, अंड्यांमधील तेजी कायम असून, गेल्या दोन आठवड्यांत सुमारे तीस टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. दीपक चव्हाण गेल्या दोन महिन्यांपासून ब्रॉयलर कोंबड्यांना उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत होता. उन्हाळ्यात मरतूक वाढल्याने मोठा तोटाही झाला होता.
Monday, June 10, 2013 AT 04:45 AM (IST)
पुणे  - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 9) भाजीपाल्याची सुमारे 150 ते 160 गाड्या आवक झाली. बहुतांश शेतीमालाचे वाढलेले दर कायम होते. या आठवड्यामध्ये भेंडी, गवार, दोडका, टोमॅटोच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम होते.
Monday, June 10, 2013 AT 04:15 AM (IST)
सातारा (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 8) वांगी, टोमॅटो तेजीत होते. वांग्याची आठ क्विंटल आवक होऊन प्रति दहा किलोस 200 ते 250 रुपये दर होता. वांग्यास दहा किलोमागे 50 ते 60 रुपयांची दरवाढ झाली. काही दिवसांपूर्वी वांग्यास 170 ते 200 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत टोमॅटोची 19 क्विंटल आवक होऊन प्रति दहा किलोस 250 ते 300 रुपये दर होता.
Sunday, June 09, 2013 AT 12:00 AM (IST)
कोल्हापूर  - येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. 7) कांदा तेजीत होता. कांद्याची आठ हजार पोती आवक झाली. कांद्यास दहा किलोस सरासरी 145 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत बटाट्याची दोन हजार पोती आवक होऊन दहा किलोस सरासरी 140 रुपये दर होते. लसणाची 440 पोती आवक होऊन दहा किलोस सरासरी 250 रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये पालक, पोकळा, शेपू तेजीत होते.
Saturday, June 08, 2013 AT 04:30 AM (IST)
नाशिक  -   येथील बाजार समितीत बुधवारी (ता. 5) आले तेजीत होते. आल्याची 16 क्विंटल आवक झाली. आल्यास 9000 ते 18, 500 व सरासरी 14000 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात दुष्काळामुळे आल्याच्या लागवडीत लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे आवकेत मोठी घट झाली आहे. निफाड तालुक्यातील गंगथडीच्या कोठुरे, सायखेडा, शिंगवे या भागातील शेतकऱ्यांकडून नाशिकच्या बाजार समितीत आल्याची आवक होते.
Friday, June 07, 2013 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद  - येथील बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. 5) शेतीमालाची आवक घटल्याने दरांमध्ये तेजी होती. बाजार समितीत ढोबळी मिरचीची 17 क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला 3000 ते 3500 रुपये व सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत कांद्याची 167 क्विंटल आवक झाली. कांद्याला 500 ते 1200 रुपये व सरासरी 850 रुपये प्रति क्विंटल दर होता.
Thursday, June 06, 2013 AT 04:30 AM (IST)
मुंबई  - येथील वाशी मार्केटमध्ये सोमवारी (ता. 3) 10,350 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्यास 1100 ते 1600 व सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत बटाट्याची 13,280 क्विंटल आवक झाली. बटाट्यास 1100 ते 1350 व सरासरी 1225 रुपये प्रति क्विंटल दर होता. लसणाची 1360 क्विंटल आवक होऊन 1600 ते 3500 व सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल दर होते.
Wednesday, June 05, 2013 AT 04:45 AM (IST)
नाना सुरवाडे लासलगाव : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कांद्याची आवक स्थिर होती. कांद्याची एकूण 46 हजार 960 क्विंटल आवक झाली. कांद्याला 691 ते 1340 व सरासरी 1135 रुपये प्रति क्विंटल दर होते. कांद्याच्या सरासरी दरांमध्ये गत सप्ताहाच्या तुलनेत क्विंटलमागे 265 रुपये वाढ झाली होती. भुसारमध्ये गहू, ज्वारी व मका यांची आवक घटली होती. आवक घटल्याने धान्यांच्या दरांमध्येही तेजी होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
Tuesday, June 04, 2013 AT 05:00 AM (IST)
सूर्यकांत नेटके नगर  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात लाल मिरचीची 246 क्विंटल आवक झाली. लाल मिरचीस 3700 ते 7500 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारी वगळता अन्य भुसार मालाची कमी प्रमाणात आवक झाली होती. ज्वारीची सर्वाधिक 976 क्विंटल आवक होऊन 1600 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर होता. तुरीची 28 क्विंटल आवक होऊन 3700 ते 4000 रुपये प्रति क्विंटल दर होता.
Tuesday, June 04, 2013 AT 05:00 AM (IST)
ज्ञानेश उगले नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबीर व आले तेजीत होते. कोथिंबिरीची सरासरी 25 हजार जुड्यांची आवक होऊन प्रति शंभर जुडीस 1200 ते 4500 व सरासरी 2900 रुपये दर होते. आल्याची सरासरी आवक अवघी 10 क्विंटल होती. आल्यास प्रति क्विंटल 7000 ते 20,000 व सरासरी 12,000 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
Tuesday, June 04, 2013 AT 04:45 AM (IST)
राजकुमार चौगुले कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात लग्नसराईमुळे भाजीपाल्याचे दर तेजीत होते. मागणी वाढल्याने बाजार समितीत नगर, नाशिकसह सातारा, पुणे जिल्ह्यातून कांद्याची सातत्याने आवक होत होती. कांद्यास 500 ते 1500 व सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गत सप्ताहात लग्नाचे मुहूर्त जास्त असल्याने साहजिकच त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला.
Tuesday, June 04, 2013 AT 04:30 AM (IST)
गणेश फुंदे औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या मिरचीला मागणी वाढली होती. हिरव्या मिरचीची 615 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला 4000 ते 6000 रुपये, तर सरासरी 5250 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गत सप्ताहात आल्याची 120 क्विंटल आवक होऊन आल्यास 5000 ते 13,500 व सरासरी 9250 रुपये प्रति क्विंटल दर होता.
Tuesday, June 04, 2013 AT 04:15 AM (IST)
पुणे  - उन्हाळ्यामुळे भाजीपाला उत्पादनातील घट कायम आहे. परिणामी, बाजारातील भाजीपाल्याची आवकदेखील घटलेली आहे. येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 2) भाजीपाल्याची सुमारे 140 ते 150 गाड्या आवक झाली. बहुतांश शेतीमालाच्या दरातील वाढ कायम होती. या आठवड्यामध्ये आले, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी वांगी, मटार, पावटा यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांच्या दरातील वाढ कायम होती.
Monday, June 03, 2013 AT 05:15 AM (IST)
अंड्यांच्या दरात एकाच आठवड्यात सुमारे 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात हवामानातील बदलांमुळे बाजारभावात सुधारणा झाली. मागील आठ- दहा दिवसांत उन्हाची तीव्रता कमी झाल्याने अंड्यांचा खप वाढला आहे. दीपक चव्हाण यंदा मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अंड्यांचे फार्मगेट भाव 230 रुपये प्रति शेकडा इतक्या नीचांकी पातळीपर्यंत कमी झाले होते. दरवर्षी एप्रिल- मे महिन्यांत अंड्यांच्या खपात वीस टक्क्यांपर्यंत घट होते.
Monday, June 03, 2013 AT 05:00 AM (IST)
सातारा (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 1) काळा घेवडा, कांदा तेजीत होता. सर्व भाजीपाल्याची आवक कमी होत असून दर टिकून आहेत. बाजार समितीत काळ्या घेवड्याची एक क्विंटल आवक झाली. काळ्या घेवड्यास 450 ते 550 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला आहे. काळ्या घेवड्याच्या दरात 70 रुपयांनी वाढ झाली. कांद्याची 15 क्विंटल आवक झाली. कांद्यास 130 ते 160 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
Sunday, June 02, 2013 AT 12:00 AM (IST)
नगर  - येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. 30) टोमॅटो, बटाट्याची आवक वाढली. टोमॅटोची 200 तर बटाट्याची 350 क्विंटल आवक झाली. टोमॅटोला 100 ते 300 रुपये प्रति दहा किलो तर बटाट्याला 100 ते 140 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. भुसारची आवक कमालीची घटली आहे. ज्वारीची 330 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1500 ते 2000 रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
Saturday, June 01, 2013 AT 04:45 AM (IST)
मुंबई  - येथे सोमवारी (ता. 27) वाशी मार्केटमध्ये 7950 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्यास 1000 ते 1450 व सरासरी 1225 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधी व्यापाऱ्यांच्या आंदोलन मागे घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्ये आणि मसाला मार्केट आता पूर्ववत झाले आहे. कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळमार्केटदेखील सुरळीत झाले आहे. बाजार समितीत लसणाची 1160 क्विंटल आवक झाली.
Wednesday, May 29, 2013 AT 04:30 AM (IST)
राहता, जि. नगर : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कांद्याच्या आवकेत घट होऊन दरांमध्ये तेजी होती. कांद्याची 19,162 क्विंटल आवक झाली. त्यास 850 ते 1400 व सरासरी 1125 रुपये प्रति क्विंटल दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गव्हाची 122 क्विंटल आवक होऊन 1500 ते 1907 व सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल दर होते. ज्वारीची 97 क्विंटल आवक होऊन 1500 ते 1661 व सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल दर होते.
Tuesday, May 28, 2013 AT 05:00 AM (IST)
|