Last Update:
 
फुलोरा
इंद्रजित भालेराव ओवीने जशी संतांना प्रेरणा दिली, मॉडेल पुरवलं तशीच प्रेरणा ओवीने आधुनिक कवितेलाही दिलेली आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर इंग्रजी कवितेच्या प्रभावातून केशवसुतांसारख्या कवीने आधुनिक कविता लिहायला सुरवात केली, त्याच प्रभावात पुढच्या तीन-चार पिढ्यांनी कविता लिहिल्या. त्यामुळे त्याकाळात इंग्रजीतल्या सॉनेटची सुनीतं मराठीत पार लिहिली गेली, आणखीही काही कविता प्रकार इंग्रजीतून मराठीत आले पण त्यांनी फार काळ टिकाव धरला नाही.

Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)

किशोर बळी  शारदा ही सखाभाऊंची अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची चुणचुणीत मुलगी. विशेषतः वक्तृत्वात तिचे नैपुण्य वाखाणण्याजोगे होते. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत चौथ्या इयत्तेत शिकणारी शारदा म्हणूनच शिक्षकांची अतिशय आवडती विद्यार्थिनी होती. पहाटे लवकर उठून आईला तिच्या कामात मदत करणारी शारदा अभ्यासातही अग्रेसर असायची. शाळेतही प्रत्येक उपक्रमात तिचा पुढाकार असायचा.

Wednesday, January 04, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. सदानंद देशमुख सीतारामचं घर माझ्या शेताच्या रस्त्यावर पूर्वी त्याच्या घरापुढे गोठा होता. त्यात दोन बैलं बांधलेली असायची. दोन वर्षांपूर्वी त्याने सोडबांध होत नाही म्हणून गोठा रिकामा केला. आता आपली पाच एकर शेती ट्रॅक्टरने करून घेतो. मात्र, मला येताना-जाताना तो रामराम करतो. काय सुरू हाये? म्हणून विचारतो. वडिलकीच्या नात्याने सल्ला देतो. बोलता-बोलता मधेच पटकन मनगट धरतो.    ‘‘आहो, बसा भाऊ खाली... चहा घेऊ’’, असं म्हणतो.

Friday, December 30, 2016 AT 05:45 AM (IST)

कुमार सप्तर्षी ग्रामीण भागात कायदे-कानून, नियम याला फारशी किंमत नसते. रिवाज व परंपरा यांनी जीवन बद्ध असते. एखादी गोष्ट चूक की बरोबर याचा निर्णय तर्कशुद्ध चर्चेने होत नाही. स्वार्थानुसार आणि शक्तीनुसार चर्चेला वेगवेगळे वळण लागते. गावगाडा, मालक, वतनदार, जातवार वस्त्या या गोष्टी प्रभावी असतात. गावात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला वगैरे काही नसते. फक्त जत्रा अन् यात्रा भरते. ज्ञानाचे माध्यम एकच! गेवळातील कथा, कीर्तन, प्रवचन.

Thursday, December 29, 2016 AT 04:30 AM (IST)

माझी दोन्ही मुलं शहरात असतात. मोठा नोकरी करतो. त्याची बायकोही सरकारी नोकरी करते. त्यांची दोन्ही मुलेही नोकरीला लागली आहेत. त्यांनाही नोकरी असणाऱ्या बायका मिळाल्या आहेत. लहान धंदा करतो. त्याची आज तशी काही मिळकत नाही, पण मेहनती आहे. त्याची प्रगती होऊ शकेल. याचे कारण कमी काळात त्याने बाजारात चांगली पत तयार केली आहे. कोणत्याही व्यवसायात आपण पत तयार करावी लागते. त्याने मला विचारले होते. नोकरी करू की काही स्वतंत्र धंदा करू.

Wednesday, November 30, 2016 AT 05:45 AM (IST)

आम्ही सात भाऊ आहोत. आम्ही सगळे भाऊ शेतीच कसतो. वडलोपार्जित दीड एकर शेती होती. आई आणि वडील दोघांनी विहीर खोदली. त्या वेळी माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला होता. लग्न झाल्यावर वडलांनी विहीर खोदाई सुरू केली. पहिल्यांदा लोक त्यांना विचारायचे, काय करतोस. ते काहीही बोलायचे नाहीत. उन्हाळभर त्यांनी एकट्याने आठ फूट खोल विहीर खोदली. वळवाचा मोठा पाऊस झाला. त्यांनी जी खोदाई केली होती, ती सगळीकडून माती येऊन भरून गेली.

Tuesday, November 29, 2016 AT 06:00 AM (IST)

गावदरीला आमची शेती आहे. गावाला लागूनच शेती असल्याने गावची वर्दळही राहते. शेतातच आमचं घर आहे. सात एकर शेतीसाठी एक विहीर आहे. विहीर जुनी आहे. ही शेती इनाम म्हणून मिळाली आहे. फार पूर्वीपासून विहिरीचे पाणी पिण्यासाठी गावातील लोक नेतात. स्वातंत्र्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या. गावालाही सरकारी पाणीपुरवठा योजना झाली. नदीवरून पाणी गावात आणलं आहे. आमच्या भागातील तर ही पहिली योजना असावी.

Saturday, November 26, 2016 AT 05:00 AM (IST)

आमच्याकडे एक पद्धत आहे. गरीब मुलांना गरिबीमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून गावातील लोक आपल्या शक्तीनुसार मदत गोळा करतात. यामुळे गावातील बरीच गरीब मुले शिकून पुढे गेली आहेत. त्यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे गावाकडे येणे जाणे हे त्यांचे आई-वडील असेपर्यंत राहते. नंतर ते कमी कमी होत जाते. अलीकडे सरकारी कामासाठी, शिक्षणासाठी बऱ्याच जणांना रहिवाशी दाखला लागत आहे.

Friday, November 25, 2016 AT 07:00 AM (IST)

मोठा भाऊ आला. शहरात त्याचे दुकान आहे. दुकान चांगलं चालतं. तो पूर्वी एका शेठजीकडे नोकरीला होता. तेथे पगार काही वाढेना. नोकरी सोडून दिली. सायकलवरून फिरून लहान मुलांचे कपडे विकू लागला. त्याची बायको घरात कपडे शिवून द्यायची. त्याला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. त्याने एक दुकान भाड्यानं घेतलं. तेथे पूर्वी एक दुकान होतं. ते काही चाललं नाही. असं अनेकदा घडलं. त्यामुळं ही जागा अशुभ आहे, असा एक प्रचार झाला. त्यामुळे हे दुकान कोणीच भाड्यानं घेत नव्हतं.

Thursday, November 24, 2016 AT 06:45 AM (IST)

गावची लोकवस्ती दोन हजारांपर्यंत आहे. तीन बाजूंनी डोंगर आहे. पूर्वी डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडे होती. आमच्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक काही झाडे लावली होती. ती जगविली होती. जुनी काही माणसे अजून सांगतात, की गावातील लोकांना या डोंगरातील झाडांपासून भरपूर उत्पन्न मिळत होते. यात गावातील काही लोक भरपूर श्रीमंतही झाले. ही खरी तर पंचायतीची मालकी होती. पंचायतीची मालकी याचा अर्थ सामुदायिक मालकी असा होऊ शकतो. याचे उत्पन्न पंचायतीला तसे फारच कमी मिळाले आहे.

Saturday, November 19, 2016 AT 06:00 AM (IST)

शंभर एकर एकाच ठिकाणी बागायती शेती आहे. गावात इतकी मोठी शेती कोणाचीही नाही. गेल्या पाच पिढ्यांत एकच मूल प्रत्येक पिढीत झालं आहे. त्याकाळी आजच्यासारखा कुटुंब नियोजनाचा प्रसारही नव्हता. उलट ज्यांच्याकडे मोठं मनुष्यबळ आहे, त्यांचाच गावात दरारा असायचा. त्याकाळी शेतीला मोठं मनुष्यबळ लागतही होतं. आजच्यासारखी यंत्रं आली नव्हती. त्यामुळे शेतीची सगळी कामं बैलांच्या मदतीनेच केली जात होती. दोन - चार एकर पूर्वी विहिरीच्या पाण्यावर भिजत होती.

Friday, November 18, 2016 AT 06:30 AM (IST)

कुटुंबसंस्था आपल्या समाजाचा कणा आहे. कण्यावर अधिक भर दिला, की कणा मोडूही शकतो. गावातील अनेक मुली लग्न झाल्यावर नवऱ्याला सोडून परत येत आहेत. हे अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहे. याला एकच बाजू नाही. दोन्ही बाजू जोवर तपासत नाही, तोवर खरे कारण कळत नाही. ज्याप्रमाणे मुली नवऱ्याला सोडून गावात येत आहेत. त्याचप्रमाणे गावात लग्न होऊन आलेल्या सुनाही मोठ्या प्रमाणात परत जात आहेत. एखादी साथ यावी, असे हे घडत आहे.

Wednesday, November 16, 2016 AT 06:15 AM (IST)

वनस्पतीची वाढ ही प्रामुख्याने त्याच्या जमिनीवरील अवयवांकडे पाहून ठरवली जाते. मुळे ही जमिनीखाली असल्याने त्यांची वाढ ही सर्वांत महत्त्वाची असूनही दुर्लक्ष होते. वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या मुळांच्या वाढीचा अंदाज मिळण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी इलेक्ट्रिकल कॅपॅसिटन्स या तंत्राची मदत घेतली आहे. वस्तूतः कोणत्याही वनस्पतीच्या मुळांची वाढ तपासण्यासाठी त्याचे रोप अलगद उपटून स्वच्छ धुतले जाते.

Tuesday, November 15, 2016 AT 06:30 AM (IST)

मला चांगली नोकरी मिळाली आहे. पगारही चांगला आहे. पुढे वाढणार आहे. सगळं काही मनासारखं घडून गेलं आहे. मनासारखं घडल्यावर बरं वाटतं. याचं कारण माझ्या आयुष्यात एक वाईट घटनाही घडली आहे. माझं लग्न झाल्यावर माझ्या बायकोनं दुसऱ्याबरोबर पळून जाऊन लग्नही केलं. याचा मला पत्ताही नव्हता. यामुळे मी फारच नाराज होतो पण त्यातून मी एका मित्रामुळे सावरलो. त्यानं मला एका मानसोपचार डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी माझ्या मनातील बऱ्याच गोष्टी बऱ्या केल्या.

Tuesday, November 15, 2016 AT 06:15 AM (IST)

मुलाने लग्नासाठी एक मुलगी पाहिली आहे. ती आमच्या जातीची नाही. आमच्या जातीतही काहींना आम्ही खालचे समजतो. त्यांच्याही मुली आम्ही आजवर केल्या नाहीत. काळ बदलतो आहे. आम्हालाही बदलावं लागेल, याची चाहूल लागली आहे. अलीकडे मुलं केवळ जातीला महत्त्व देत नाहीत तर आपल्या जोडीदाराची योग्यता बघत आहेत. आपल्या पसंतीनेच आपला जोडीदार निवडत आहेत. अजूनही आमच्यावर जुना पगडा आहे. यांना आम्ही अजून समाजमान्यता दिली नाही.

Monday, November 14, 2016 AT 06:45 AM (IST)

माझ्याकडे सहा म्हशी आहेत. एक बैलजोडी आहे. आम्ही नवरा- बायकोने वेगळं झाल्यापासून एकजुटीनं काम करून संसाराचा गाडा हाकला आहे. आम्हाला तीन मुली आहेत. मुली शिकत आहेत. तिघीही शहरात असतात. मुलींना वाटतं, आपण आपल्या पायावर उभं राहावं. बारावीनंतर मोठ्या मुलीने फॅशन डिझाइनचा कोर्स केला. दोन नंबरची मुलगी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत आहे. तीन नंबरची मुलगी ब्युटी पार्लरचा कोर्स करीत आहे.

Wednesday, November 02, 2016 AT 07:00 AM (IST)

आम्ही चौघे भाऊ आहोत. सगळ्या भावांची लग्ने झाली आहेत. तीन नंबरचा भाऊ काही कामधंदा करीत नाही. आमची बारा एकर शेती आहे. वडील गेल्या वर्षी वारले. त्यानंतर खातेफोड झाली. सगळ्या भावांनी शेती त्यांच्या नावावर केली. सातबारावर बदल केले आहेत. शेतीची खातेफोड केली असली, तरी अजून सगळे एकत्र आहोत. तीन नंबरचा भाऊ आपली शेती आपल्याला मिळावी, यासाठी सारखा भांडतो आहे. त्याचे एक कारण आहे, त्याला आमच्यातील एका चुलतभावाची फूस आहे.

Thursday, October 27, 2016 AT 06:30 AM (IST)

परभणी - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता. २६) दोडक्याची सात क्विंटल आवक होती. दोडक्याला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.  बाजार समितीत हिरव्या मिरचीची २० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला ८०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले. भेंडीची आठ क्विंटल आवक होती. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकची १८ क्विंटल आवक होती.

Thursday, October 27, 2016 AT 05:45 AM (IST)

मला तीन मुलं आहेत. वयात एक एक वर्षाचे अंतर आहे. तिघे एकत्र आले तर कोण मोठा कोण लहान ओळखणे कठीण आहे. गंमत म्हणजे तीन नंबरचा मुलगा सर्वांत मोठा वाटतो. एक नंबर आणि दोन नंबरात कोण मोठा आणि कोण लहान ओळखणे कठीण जाते. तिघेही एकाच वर्गात शिकले. तिघांनी पदवी मिळवली. तिघांनीही वेगवेगळे व्यवसाय निवडले. दोन नंबरच्या मुलाने जेव्हा कोल्हापूर चप्पल तयार करण्याचा उद्योग सुरू केला तेव्हा काहींनी नाराजी व्यक्त केली. माझा चुलत भाऊ हा माझा हितचिंतक आहे.

Wednesday, October 26, 2016 AT 07:00 AM (IST)

नामदेवला एकच मुलगी होती. दहावी पास होऊन पुढच्या शिक्षणासाठी शहरात जाणार होती. आई वडिलांची इच्छा होती तिने पुढचे शिक्षण घ्यावे. गावातील पंधरा वीस तरी मुली शहरात शिक्षणासाठी आहेत. गावात शिक्षणाविषयी चांगले वातावरण आहे. मुलींची लग्ने लवकर करण्याची प्रथा कमी होत आहे. शिक्षणामुळे मुलींचे लग्नाचे वय वाढत आहे.    नामदेवला पाच एकर शेती एका ठिकाणी होती. पाच एकरात त्याने नुकतीच विहीर खोदली. विहिरीला पाणीही चांगले आहे.

Tuesday, October 25, 2016 AT 05:15 AM (IST)

मला एकच मुलगी आहे. पदवीधर आहे. एक प्रगतिशील शेकतरी म्हणून मला परिसरात मान आहे. माझी शेतीत झालेली प्रगती बघून अनेकांनी प्रगती केली. याचा मला नेहमी अभिमान वाटत आला आहे. शेती ही व्यापारी पद्धतीने केली पाहिजे असा विचार मी पहिल्यांदा केला. आमच्याकडे असा विचार करण्याची पद्धतच नव्हती. मला एक ठाऊक होते. पारंपरिक पद्धतीतही अनेक गोष्टी चांगल्या आहेत. त्याचा योग्य पद्धतीने आपण वापर केला पाहिजे. आम्ही शेतकरी कधीच हिशेब ठेवत नाही.

Monday, October 24, 2016 AT 06:00 AM (IST)

आम्ही दोघे भाऊ वेगळे होणार आहोत. वडील अलीकडेच वारले. आमची बारा एकर शेती आहे. सगळी शेती वडिलांच्या नावावर होती. त्याची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. ते पाच भाऊ होते. पाच भावांत दहा एकर शेती होती. वाटणी होऊन प्रत्येकी दोन एकर आली. वडील मेहनती होते. हळूहळू त्यांनी स्वतःचा धंदा सुरू केला. आम्ही त्या वेळी लहान होतो. सगळे भाऊ वेगळे झाल्यावरही माझ्या वडिलांनी भावांना मदत केली. पण त्यांनी कधीच हे बोलून दाखविले नाही.

Saturday, October 22, 2016 AT 05:45 AM (IST)

शंकर मला बोलला - मुलगा दहावी नापास झाला. शाळेत त्याचे लक्षच नाही. काहीतरी कामधंदा करेन असं म्हणतो. शंकरला एकच मुलगा आहे. नवरा - बायको दोघेही पदवीधर आहेत. शंकरला सरकारी नोकरी आहे. बायको काही किरकोळ कामं करते. त्यातूनही तिला थोडीफार मिळकत आहे. शंकरच्या भावाला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघांनी चांगलं शिक्षण घेऊन आता नोकरीही मिळविली आहे. दोघा भावांचं पटत नाही. दोघे वेगवेगळे राहतात. एकाच गावात राहूनही एकमेकांशी संभाषण नाही.

Thursday, October 20, 2016 AT 06:00 AM (IST)

माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शेतात विहीर काढ, शेतीला पाणी पाहिजे, पाण्याखेरीज शेतीचं काही खरं नाही, असं सांगितलं होतं. त्यांना वाटायचं, आपल्या विहिरीला भरपूर पाणी लागेल. आमच्यात पूर्वीपासून एकच मूल झालं आहे. आताच केवळ दोन मुलं आहेत. आमची चाळीस एकर शेती आहे. पाटाचं पाणीही आलं आहे. दहा एकर बागायती झाली आहे. दोन्ही मुलं शेतीच कसतात. दोघंही पदवीधर आहेत. गावात एकाच कुटुंबाकडे चाळीस एकर शेती केवळ आमच्याकडेच आहे. मुलांना एकदा बोललो.

Wednesday, October 19, 2016 AT 06:00 AM (IST)

माझ्या नात्यातील एक तरुण मुलगा वारला. त्याला दोन लहान मुलं आहेत. गावात घर आहे. थोडी शेती होती, ती विकली आहे. तरुण मुलगा दारूच्या आहारी गेला होता. गावात ठराव करून दारूबंदी केली आहे. गावात पूर्वीपासूनच दारू पिण्याचं प्रमाण कमी आहे. तरुण मुलं बाहेरगावी जात असतात. रस्त्यावर धाबे झाले आहेत. तेथे संगतीनं दारूचं व्यसन लागतं. गावाने जरी दारूबंदी केली असली, तरी गावाबाहेरचं वातावरण वेगळं आहे. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत आहे.

Tuesday, October 18, 2016 AT 05:30 AM (IST)

काही जमातींवर गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारून त्यांना सेटलमेंटमध्ये सोलापूरला ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले. आपल्याकडे पुनर्वसन पुढे होत नाही. त्यांच्या उपाजीविकेचा मार्ग त्यांना द्यावा लागतो. त्याचबरोबर त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयोग झाला पाहिजे. लहान मुलांचंही योग्य शिक्षण संगोपन झालं पाहिजे. जे काही प्रयत्न होतात ते फारच अपुरे असतात. त्यामुळे तो समाज आपल्या मानसिकतेतून बाहेर पडणं कठीण जातं.

Monday, October 17, 2016 AT 07:00 AM (IST)

काही दिवसांपूर्वी गावाने ग्रामसभेत आयत्या वेळचा एक विषय म्हणून थाटामाटात होणाऱ्या लग्नसमारंभाविषयी चर्चा झाली. ज्यांची ऐपत आहे, हे लोक आपल्या मुला-मुलींची लग्ने थाटामाटात करतात. त्याचा काही परिणाम होत असतो. याला एक दुसराही संदर्भ होता. त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या. गावातील एकाला पक्षाचे तिकीट मिळवायचे होते. तिकीट मिळविण्यासाठी मोठ्या पक्षापुढे शक्तिप्रदर्शन करावे लागते. जो शक्तिप्रदर्शन करतो, त्याला पक्षही उमेदवारी देतो.

Friday, October 14, 2016 AT 06:15 AM (IST)

सालाबादप्रमाणे यंदाही यात्रा आली. दरवर्षी यात्रेत बैलगाडीच्या शर्यती असतात. फार पूर्वीपासून बैलगाडीच्या शर्यतीचा गावाला शौक आहे. गावातील पाच-सहा तरी बैलगाड्या शर्यतीत असतात. आमच्या भागात गावोगावच्या यात्रेतूनही नेहमी भाग घेतात. गेली अनेक वर्षे आमच्या पाच-सहा बैलगाडीचीच एकमेकांत शर्यंत होते. बैलगाडीच्या शर्यतीसाठी बैल लहानपणापासून तयार करावे लागतात. त्यासाठी प्रत्येकाकडे चांगल्या जातीच्या गायी आहेत.

Thursday, October 13, 2016 AT 07:45 AM (IST)

रात्री अपरात्री अचानक जाग येते. पुन्हा झोपतो. झोप काही लागत नाही. सगळं गाव गाढ झोपलेले आहे. घरातील सगळी माणसं गाढ झोपली आहेत. एका विचारानं मनाची घालमेल होत आहे. गेली दहा वर्षे नोकरी करतो आहे. पगार बरा आहे. आपोआप वाढणार आहे. फार ओढाताण नाही. शहरात स्वतःच घर आहे. एक मुलगा आहे. यंदा चौथीत गेला आहे. बायको काहीना काही काम करते. दोन पैसे मिळवते. घराभोवती तिने भाजीपाला लावला आहे. संसार कसा करावा, हे तिच्याकडून शिकलं पाहिजे. हा गुण तिचा उपजतच आहे.

Wednesday, October 12, 2016 AT 06:00 AM (IST)

सहा भावात एकच बहीण आहे. सर्वात लहान आहे. आमच्या पसंतीने तिचे लग्न रीतीरिवाजाप्रमाणं झालं आहे. मुलगा एकुलता आहे. बारा एकर बागायती शेती आहे. पदवीधर आहे. दोन वर्षे त्याने नोकरी केली. वडिलांचे निधन झाले. त्याने नोकरी सोडून दिली. त्याच्या वडिलांनी गावात हायस्कूल सुरू केले आहे. गावात तेलाची गिरणी आहे. हा सगळा कारभार घरातीलच माणूस पाहू शकतो. वडील असते तर तशी चिंता नव्हती. वडील गेल्यानंतर एका वर्षात लग्न करावं अशी प्रथा आहे.

Monday, October 10, 2016 AT 06:30 AM (IST)

माझी सत्तरी उलटली आहे. कुटुंबाची कोणतीही जबाबदरारी नाही. चार मुलं आणि तीन मुली आहेत. मुली मोठ्या आहेत. त्याची लग्ने होऊन त्यांना नातवंडेही झाले आहेत. मुलांचीही लग्न होऊन कामधंदा करीत आहेत. माझी बायको दोन वर्षापूर्वी वारली. मी मुलांना शेती वाटून दिली आहे. प्रत्येकाचा जोडधंदा आहे. चारही मुलं पदवीधर आहेत. मोठा मुलगा काही वर्षे खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने अनुभवातून स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. त्यात त्याने चांगला जम बसविला आहे.

Saturday, October 08, 2016 AT 06:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: