राहुरी विद्यापीठ, जि. नगर (प्रतिनिधी) : कृषी विद्यापीठांनी आंतरपिकांबाबत विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी अवलंबणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकरी आपली आर्थिक प्रगती निश्चितच साधू शकतात, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी केले.
नाशिक (प्रतिनिधी) : तमाशा ही शेतकरी, मजूर व खेड्यापाड्यांतून रुजलेली अस्सल लोककला आहे. या कलेच्या संवर्धनासाठी शासनाकडून प्रभावी प्रयत्न हवेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले. नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित "तमाशा : कला, स्वरूप व समीक्षा' या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पुणे (प्रतिनिधी) ः देशी वाणांची लागवड करताना योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास संकरित वाणांप्रमाणेच उत्पादन मिळते. याबाबत अनेक प्रयोग विविध राज्यांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे देशी वाण आणि पारंपरिक शेती नष्ट होत आहे. देशी वाणांच्या संवर्धन व प्रसारासाठी शासनाने धोरण निश्चिती करणे आवश्यक असल्याचे मत देशी वाणांच्या संवर्धनात कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांनी केले.
सोलापूर (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्यातील विविध भागांतील सुमारे पन्नास एकरावरील खरबुजाचे क्षेत्र सदोष बियाण्यामुळे जळून खाक झाले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने पाहणी करून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हे नुकसान नेमके कशामुळे झाले आहे. ते प्रयोगशाळेतील तपासणीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.
सांगली (प्रतिनिधी) : हळदीचे केवळ उत्पादन न घेता त्याच्या गुणवत्तावाढीकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन कोल्हापूरच्या विभागीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष मोरे यांनी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ व "नाबार्ड'च्या वतीने हळद गुणवत्तावाढीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. सांगली जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बसवराज मास्तोळी हे या वेळी उपस्थित होते.
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या पुढाकाराने कोकणातील पिकांचे मार्केटिंग करणे व या पिकांना विमा संरक्षणाखाली आणणे याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. 22) शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित या परिषदेत कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणी नारळ, आंबा, काजू, सुपारी या प्रमुख पिकांचे मार्केटिंग, विमा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
नाशिक (प्रतिनिधी) : "तमाशा : कला, स्वरूप व समीक्षा' या विषयावर मंगळवार (ता. 21) व बुधवार (ता. 22) दरम्यान येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात राज्यस्तरीय मराठी चर्चासत्र होत आहे. चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी (ता. 21) सकाळी दहा वाजता लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी वसंत डहाके विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुणे (प्रतिनिधी) ः रविवार (ता. 19)पासून सुरू झालेल्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत येत्या बुधवारी (ता. 22) बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात कृषी जैवविविधता प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध राज्यांतील पिकांचे सुमारे 1000 वाण आणि त्या संबंधित शेती पद्धतीचा प्रदर्शनात समावेश आहे. पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे, रीछारीया कॅम्पेन छत्तीसगड आणि इतर सहकारी संस्थांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
पुणे ः चांगले पर्यावरण राहिले तरच पृथ्वीवरील जीवन तग धरू शकेल. त्यामुळे कचरामुक्त करण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, जैव-इंधननिर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. भारताला कचरामुक्त करण्यासाठी कचऱ्यापासून इंधननिर्मिती क्षेत्राला, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत भाभा अणु संशोधन केंद्रातील संशोधक आणि निसर्ग ऋण बायोगॅस प्रकल्पाचे प्रणेते डॉ. शरद काळे यांनी येथे व्यक्त केले.
पुणे (प्रतिनिधी) ः विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या क्षेत्रातील अभ्यासाशी निगडित न राहता इतर क्षेत्रांतील उद्योगांबाबतही डोळस वृत्तीने जाणून घेतले पाहिजे. रेशीम उद्योग हा त्यापैकी एक असून, त्यात अनेकांना स्वयंरोजगार मिळवून देण्याची क्षमता आहे. या उद्योगातील संधींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन माजी रेशीम संचालक कॅ. डॉ. एल. बी. कलंत्री यांनी येथे केले.
सोलापूर ः डाळिंबावरील "तेल्या'मुळे आधीच शिणून गेलेले सांगोला तालुक्यातील शेतकरी खरबुजाकडे वळले पण आता खरबुजाच्या सदोष बियाण्याचा फटका त्यांना बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील विविध भागांतील सुमारे पन्नास एकरांवरील खरबुजाचे क्षेत्र सदोष बियाण्यामुळे जळून खाक झाले आहे.
पुणे ः नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात बुधवारी (ता.15) राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थित झालेल्या कृषिविषयक धोरणांबाबतच्या एक दिवसीय चर्चासत्रात भारत कृषक समाज महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रकाश मानकर हे सहभागी झाले होते. या चर्चासत्राला संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांचा सहभाग होता. 
नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील शहा येथील प्रयोगशील शेवगा उत्पादक बाळासाहेब शंकर मराळे यांची राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत जाणाऱ्या युरोपच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली असून या दौऱ्याअंतर्गत ते युरोपातील हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या देशांना भेटी देणार आहेत. यात परदेशातील कृषी संशोधन केंद्र, डेअरी प्रकल्प व देशातील फळे व भाज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांनाही भेटी देण्यात येणार आहे.
सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 480 हेक्टर भुईमूग व एक हजार 174 हेक्टर मका अशी एकूण तीन हजार 654 हेक्टर क्षेत्रावर (83 टक्के) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. दोन्ही पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात असून पेरणी झालेल्या पिकांची उगवण चांगली आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामात जिल्ह्यात सरासरी चार हजार 400 हेक्टरवर पेरणी केली जाते. यामध्ये उन्हाळी भुईमुगाची सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टर, तर मक्याच्या 900 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
राहुरी विद्यापीठ, जि. नगर (प्रतिनिधी) : पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यामुळे शेतकरी व शास्त्रज्ञ यांनी केलेल्या संशोधनास कायदेशीर संरक्षण व हक्क मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्व स्तरावर नवीन वाण निर्मितीस उत्तेजन मिळणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले.
जळगाव (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान, खालावलेली भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर गहू व दादर (रब्बी ज्वारी) या दोन्ही मुख्य पिकांच्या पेऱ्यात लक्षणीय घट झाली. मात्र मक्याचे क्षेत्र वाढल्याने जिल्ह्यात रब्बीची सरासरीच्या 85 टक्के म्हणजेच एक लाख आठ हजार 222 हजार हेक्टरवर पेरणी झाली. उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणीही प्रगतिपथावर असून 4385 हेक्टरवर पेरा झाला आहे.
हिंगोली (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात सहा कोटी अठरा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे तीन लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होते. त्यापैकी सर्वांत जास्त म्हणजे सुमारे एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
धुळे (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2012 अंतर्गत धुळे पंचायत समितीतर्फे तालुक्यातील 156 गावांत शंभर टक्के अनुदानावर 2771 विहिरींना शुक्रवारी (ता. 10) प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, त्यासाठी 52 कोटी 64 लाख 90 हजार रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, अशी माहिती आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली.
पुणे (प्रतिनिधी)  - जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीच्या कडाक्यामुळे पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागातील जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांत तुलनेने जास्त थंडी असल्याने या भागातील द्राक्ष, केळी, आंबा, अंजीर आणि ऊस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडील प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 1600 हेक्टरवरील पिके थंडीने बाधित झाली आहेत.
राहुरी, जि. नगर (प्रतिनिधी)  - महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ व राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन उपक्रम सुरू होत असल्याची माहिती मंडळाचे अधिकारी विष्णू बोरीकर यांनी दिली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे तसेच विभाग प्रमुखांचे यासाठी विशेष मार्गदर्शन मिळत आहे. या योजनेअंतर्गत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर 50 मधपेट्या बसविल्या जाणार आहेत.
- मुंबई (प्रतिनिधी)  - बॉयलर पेटणे ही संकल्पना केवळ साखर कारखान्यांपुरती मर्यादित आहे, ही संकल्पना खोटी ठरवत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जव्हार तालुक्यातील डोंगरावर हळदीची क्रांतिकारी लागवड करून शेतकऱ्यांनी आता हळद प्रक्रियेचा बॉयलर पेटवून भविष्याची आशा पल्लवीत केली आहे. कृषी विभाग आणि ठाणे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या पुढाकारामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात 60 एकर क्षेत्रावर हळद लागवडीचे यशस्वी प्रयोग झाले.
मुरगूड, जि. कोल्हापूर (प्रतिनिधी) : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा आधुनिकीकरणासह 12 मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज विक्रीचा नुकताच प्रारंभ झाला. दरवर्षी सहवीज प्रकल्पातून कारखान्यास सुमारे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, कारखान्याच्या ऊस उत्पादकांना त्याचा फायदा होईल.
मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात 31 लाख वीज कनेक्शन आहेत. यातील खऱ्या कृषिपंपांची पडताळणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या शुंगलू समितीने सरकारी अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. सर्व कृषिपंपांना मीटर बसवणे सक्तीचे असताना महावितरणने केवळ 14 लाख पंपांचेच मीटरिंग केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून उरलेल्या वीजपंपांचे मीटरिंग करण्यात टाळाटाळ केली जात आहे.
पुणे ः येथील कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि राष्ट्रीय बियाणे व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या वतीने आज (सोमवार)पासून शुक्रवार (ता. 17) पर्यंत "बीजोत्पादन व दर्जा नियंत्रण' या विषयावर राष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
कऱ्हाड, जि. सातारा (प्रतिनिधी) ः कृषी विभागामार्फत शिंगणवाडी (जि. सातारा) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माती नाला बांध कामाचे भूमिपूजन उपविभागीय कृषी अधिकारी शरद दोरगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, मंडल कृषी अधिकारी ए. एस. पटेल, कृषी पर्यवेक्षक सुनील ताकटे, कृषी सहायक अशोक कोळेकर, वैभव नाळे उपस्थित होते.
नाशिक - गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या आशेवर पाणी ओतले. यंदा हंगाम चांगला असताना, उत्पादनही चांगले आले असताना आणि ऐन थंडीचा काळ लोटून गेल्यामुळे चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट आली. यामुळे शेतीवर विशेषतः द्राक्ष शेतीवर संकट ओढवले आहे. वांगी, मका, भाजीपाला पिकांनाही थंडीच्या तीव्र लाटेचा फटका बसला आहे.
लखनौ  - संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानावेळीही पहिल्या टप्प्याप्रमाणेच अनुभव आला. पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी सकाळी पावसाने राज्य केले, तर शनिवारी (ता. 11) थंडीचे साम्राज्य राहिले. त्यामुळे सकाळी अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाटच होता पण जसजसा सूर्य वर चढू लागला, तशी मतदानाची टक्केवारीही चढत गेली. दुपारी एकपर्यंत 34 टक्के मतदान झाले होते.
वालसावंगी, जि. जालना - वालसावंगी परिसरात काही प्रमाणात असलेल्या द्राक्ष बागा वाढत्या थंडीमुळे अडचणीत आल्या आहेत. तसेच गहू, हरभरा या पिकांनाही थंडीचा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. वालसावंगी परिसर गेल्या काही वर्षांपूर्वी द्राक्ष उत्पादनात जालना जिल्हा अग्रेसर होता, तर द्राक्ष उत्पादनात वालसावंगीची एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. त्यापाठोपाठ नागवेली पानांचे माहेरघर म्हणूनही वालसावंगी गावाची ओळख जिल्ह्यात सर्वत्र होती.
अकोला - कोरडवाहू शेतकऱ्यांना वारंवार मदत वाटप करण्याऐवजी या शेतीला शाश्वत करण्याच्या प्रयत्नांतर्गत केंद्र शासनाच्या सहकार्याने दहा हजार कोटी रुपयांचे "कोरडवाहू शेती अभियान' प्रस्तावित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता. 11) केले. अकोला महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस व पीपल्स रिपब्लिकन पक्ष उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने टु-जी स्पेक्ट्रमप्रकरणी देण्यात आलेले 122 परवाने रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर या आदेशाचे नेमके काय परिणाम होतील, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी (ता. 11) केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल, कायदा मंत्री सलमान खुर्शिद आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी चर्चा केली. याबाबत श्री. खुर्शिद म्हणाले, ""या आदेशाच्या परिणामांबाबत आम्ही चर्चा केली.
नगर - जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सहा तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील 431 गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या गावांना जवळपास साडेतीन महिने पाणीपुरवठा करावा लागणार असला तरी पाणीपातळी झपाट्याने घटत असून, धरणातील पाणीसाठाही खालावत असल्याने चिंता वाढत चालली आहे. राज्यात सहा हजारांहून अधिक गावांत दुष्काळी स्थिती आहे.