Last Update:
 
राजकीय
शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी अकोला - तूर खरेदीच्या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी (ता.२७) उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्या जिल्ह्यात तूर खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत अाहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय भावाने तूर खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात अाली. शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना त्रास होत अाहे. सध्या केंद्रावर हजारो क्विंटल तूर पडून अाहे.

Friday, April 28, 2017 AT 06:00 AM (IST)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संघर्ष यात्रेत सवाल कऱ्हाड - राज्यातील उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, आर्थिक सल्लागार हे शेतकरी कर्मजाफी केली तर आर्थिक शिस्त बिघडेल असे सांगत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये निवडून दिल्यास कर्जमाफी करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली.

Friday, April 28, 2017 AT 06:00 AM (IST)

पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव येथे २४ मेला मतदान मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २४ मे रोजी मतदान तर २६ मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने या वेळी उपस्थित होते.

Friday, April 21, 2017 AT 05:45 AM (IST)

बच्चू कडू, रघुनाथदादांसह शेतकऱ्यांना अटक आंदोलकांची घोषणाबाजी सीमेवर तणाव मुंबई : शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग शिफारशी, कर्जमाफी विषयांवरील आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. आमदार कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Friday, April 21, 2017 AT 05:45 AM (IST)

नाशिकला पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्यांचा इशारा नाशिक - राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांबाबत तीव्र असंतोष आहे. संघर्ष यात्रेला सामान्य शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवीय. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही हा लढा उभारलाय. कर्जमाफी मिळेपर्यंत तो थांबणार नाही.

Wednesday, April 19, 2017 AT 06:00 AM (IST)

आमदार बच्चू कडू आसूड यात्रेनिमित्त नगरमध्ये सभा नगर- सर्वसामान्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा कट्टरतावाद पाहावा. शेतकऱ्यांच्या आयुष्यात कधी कोणता वेतन आयोग आला नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व त्यावर सवलती देताना भ्रष्टाचार कमी होईल याची हमी कोण देणार, असा प्रश्‍न प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित होते.

Wednesday, April 19, 2017 AT 05:45 AM (IST)

शेतकरी कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी वर्धा - शेतकऱ्यांचे विविध प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने राज्यभर आसूड मोर्चा जागृती अभियान वर्धा येथून सुर करण्यात आले. महात्मा फुले जयंतीदिनी या अभियानाची सुरवात करण्यात आली.  राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरावर ११ मे रोजी किसान सभेच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Thursday, April 13, 2017 AT 06:15 AM (IST)

शेतकरी आसूड यात्रेत रघुनाथदादा पाटील यांचे आवाहन यवतमाळ - देशातील उद्योगपतींना सुमारे १२.५० लाख कोटी रुपयांच्या कर्जाची सवलत देणारे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला जाणूनबुजून विरोध करीत आहेत. ही ऐतखाऊंची भूमिका असल्याने त्याला शेतकऱ्यांनी आक्रमकपणे विरोध करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बचत भवन येथे बुधवारी (ता.१२) शेतकरी आसूड यात्रेनिमित्त झालेल्या शेतकरी दरबारामध्ये केले.

Thursday, April 13, 2017 AT 06:00 AM (IST)

नाशिक - सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (ता. १२) खडकमाळेगाव येथे झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.  ही विशेष ग्रामसभा सरपंच साहेबराव कान्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

Thursday, April 13, 2017 AT 05:45 AM (IST)

मुख्यमंत्र्यांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या मुंबई - काँग्रेसने लोकांची कामे केली नाहीत म्हणून लाल दिव्याच्या गाड्या गमावून सायकलवर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आपणही लोकांची कामे केली नाहीत, तर लाल दिव्याच्या गाड्या गमवाव्या लागतील, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.

Saturday, April 08, 2017 AT 06:00 AM (IST)

जलसंधारण मंत्री शिंदे भ्रष्टाचार, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई मुंबई - जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय समिती नेमण्यात अाली अाहे, अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ७) विधान परिषदेत दिली.  या वेळी त्यांनी जलयुक्त शिवारमधील कामांबद्दलचे आरोप फेटाळून लावले.

Saturday, April 08, 2017 AT 06:00 AM (IST)

मुंबई - राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश धस यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात अाले अाहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

Saturday, April 08, 2017 AT 06:00 AM (IST)

कर्जमाफीवर विरोधक आग्रही उत्तर प्रदेशकडून कर्जमाफी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला फटकारले मुंबई - पंधरा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करावी हे समजून घेण्याची वेळ महाराष्ट्रावर यावी ही लाजीरवाणी बाब असल्याच्या शेलक्या शब्दात विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी बुधवारी (ता. ५) राज्य सरकारला फटकारले. यापुढे कर्जमाफीवर चर्चा नको घोषणा करा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

Thursday, April 06, 2017 AT 06:00 AM (IST)

पनवेलमध्ये जाहीर सभेत संघर्ष यात्रेचा समारोप मुंबई - शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका. आम्ही राज्यकर्त्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा धीर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांप्रश्नी केंद्र, राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले.  शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांच्या चंद्रपूर येथून निघालेल्या संघर्ष यात्रेचा मंगळवारी (ता. ५) पनवेलमध्ये समारोप झाला. या वेळी पवार यांनी मार्गदर्शन केले.

Thursday, April 06, 2017 AT 05:45 AM (IST)

खासदार राजू शेट्टी यांची माहिती कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी २८ एप्रिलपासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती स्वभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिली. दिवभर रॅली व सायंकाळी सभा असे स्वरुप या आंदोलनाचे आहे. आंदोलनाचे सविस्तर स्वरूप लवकरच जाहीर करणार असल्याचे श्री शेट्टी यांनी सांगितले.  सध्या विरोधी पक्षाची सुरू असलेली विरोधी पक्षाची संघर्ष यात्रा ही राजकीय स्वार्थासाठीच असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

Tuesday, April 04, 2017 AT 06:00 AM (IST)

मुख्यमंत्री फडणवीस यशदा येथे 'ग्रामीण विकास फेलोशीप'चे उद्‌घाटन पुणे - सरकार व उद्योग विश्वाच्या संयुक्त प्रयत्नातून राज्यात नव्याने ग्राम सामाजिक विकास परिवर्तन अभियान सुरू होत आहे. या अभियानातून एक हजार गावांमध्ये सर्व सरकारी योजना राबविल्या जातील. त्यासाठी काही योजनांमध्ये लवचिकतादेखील आणली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Tuesday, April 04, 2017 AT 06:00 AM (IST)

- बंडगार्डन पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली - ५ एप्रिलनंतर आझाद मैदानावर आमरण उपोषण - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली दखल पुणे - कृषिसेवक भरती गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करून फेरपरीक्षा घेण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थींना आंदोलन करण्यास बंडगार्डन पोलिसांनी मनाई केली. त्यामुळे आता थेट मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची जोरदार तयारी परीक्षार्थींनी सुरू केली आहे.

Saturday, April 01, 2017 AT 06:00 AM (IST)

मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई - शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या विधानसभेच्या १९ आमदारांचे निलंबन करण्यात अाले हाेते. ते अाता मागे घेण्यासंदर्भात शनिवारी (ता. १) सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.  तसेच आमदार अनिल गोटे यांनी विधान परिषद सभागृहाबाबत केलेल्या त्या विधानाशी सरकार सहमत नाही.

Saturday, April 01, 2017 AT 05:45 AM (IST)

अामदार जितेंद्र अाव्हाड यांचा निर्धार वाशीम - मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला झालेली मारहाण हा अत्यंत लज्जास्पद प्रकार अाहे. कर्जमाफी मागणाऱ्या १९ अामदारांना सरकारने निलंबित करीत सूडबुद्धीचे राजकारण खेळले. असे वागणाऱ्या सरकारचा निषेध करीत असून, राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत अामचा लढा सुरू राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी केले.

Saturday, April 01, 2017 AT 05:45 AM (IST)

संघर्ष यात्रेतील नेत्यांनी केली बापूकुटीत प्रार्थना वर्धा - शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, कर्जमुक्‍ती, वीजमाफी अशा शेतकरीभिमुख घोषणांच्या बळावर भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु या सरकारच्या काळात कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकावा लागला, तर तूर खरेदीची नौटंकी सुरू असल्याचा आरोप अाणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि सात-बारा कोरा होणार नाही तोवर आमचा संघर्ष थांबणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Friday, March 31, 2017 AT 06:00 AM (IST)

मुंबई - शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध आहे, साखर उद्योगाचे प्रलंबित प्रश्न बैठक घेऊन सोडवण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात मंत्री देशमुख बोलत होते. ते म्हणाले, ""साखर उद्योगासाठी हवे ते धोरण स्वीकारण्यात येईल. साखर उद्योग अडचणीत येऊ देणार नाही. यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील.

Friday, March 31, 2017 AT 06:00 AM (IST)

- पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे परिषदेत आश्वासन मुंबई - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे नेला जाईल, असे आश्वासन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २९) विधान परिषदेत दिले. नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता. येवला) येथील शेतकऱ्याने दराअभावी कांद्याचे पीक पेटवून दिल्याच्या घटनेवर अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली होती.

Friday, March 31, 2017 AT 05:45 AM (IST)

विधान परिषदेत हल्लाबोल गुंतवणूक वाढल्याने कृषी विकासदरात वाढ : मुख्यमंत्री मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. बुधवारी (ता. २९) शेतकरी कर्जमाफीची मागणी विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

Thursday, March 30, 2017 AT 06:00 AM (IST)

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा मुंबई - आदिवासींच्या जमिनी विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी नसताना, चुकीच्या पद्धतीने फूस लावून गिळंकृत केलेल्या जमिनी आदिवासींना परत देण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Thursday, March 30, 2017 AT 06:00 AM (IST)

मुंबई - विधानसभेने बहुमताने मंजूर केलेली विधेयक गोंधळ घालून विधान परिषदेत अडवली जातात, त्यामुळे राज्यघटनेतील 171 (1) तरतुदीचा वापर साध्या बहुमताने विधान परिषद रद्द करावी, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू झाली असून, विधानसभेतील सर्व विरोधी सदस्य रस्त्यावर उतरले आहे. विधानसभेने बहुमताने मंजूर केलेली विधेयक विधान परिदेत विरोधकांच्या बहुमताने अडवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आ.

Thursday, March 30, 2017 AT 06:00 AM (IST)

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन मुंबई - राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षे सेवाकाळ आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १२ वर्षांचा लाभ देण्यासाठी मुख्य सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार असून, इतर मागण्यासंदर्भात निश्चित कालमर्यादेत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले.

Tuesday, March 28, 2017 AT 05:00 AM (IST)

केंद्रीयमंत्री गडकरी यांची माहिती स्टॉल लावण्याची सुविधाही देणार औरंगाबाद - शेतकऱ्यांना फळे आता थेट विमानतळावर विकता येणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. शनिवारी (ता. २५) औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील तत्कालिक कक्षाच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  शेतकऱ्यांना विमानतळावर कमीत कमी किमतीत फळे विकण्यासाठी स्टॉल लावण्याची सुविधाही देण्यात येणार अाहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Sunday, March 26, 2017 AT 06:00 AM (IST)

औरंगाबाद - कर्जबाजारी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्‍त देणे अपरिहार्य आहे. त्यामुळे १० एप्रिलपूर्वी कर्जमुक्‍ती द्या, अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून शुक्रवारी (ता.२४) केली.  चार वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादन वाढले. मात्र शेतीमालास दर नसल्यामुळे उत्पन्न वाढले नाही.

Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)

मुंबई - शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार अाहे. २९ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह विधिमंडळातील सर्वच विरोधी पक्ष चांदा ते बांदा राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढणार अाहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग बाराव्या दिवशी विधान परिषद ठप्प झाल्याने कामकाज पत्रिकेनुसार राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत चर्चेशिवाय मंजूर झाल्याचे मानण्यात येते. विधानसभेतील विरोधी पक्षांच्या आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने विधानसभेतही अर्थसंकल्प विरोधकांशिवाय मंजूर होण्याचे सावट पडले आहेत.

Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)

परभणी - राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पांगरा ढोणे (ता.पूर्णा) येथील शेतकरी तुकाराम सदाशिव ढोणे हे गुरुवारी (ता.२३) सकाळी सात वाजल्यापासून तरंगळ (ता.पूर्णा) शिवारातील स्वतःच्या शेतातील कोरड्या विहिरीमध्ये बसून बेमुदत उपोषण केले.

Friday, March 24, 2017 AT 06:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: