मुंबई (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र राज्याचा 2012-13 चा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठका मंगळवारी (ता. 21) विधान भवनात झाल्या. 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम त्यात निश्चित करण्यात आला. पहिल्या दिवशी राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवात होईल.
मुंबई ः दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आठ महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवारी (ता. 22) जाहीर झाली. नाशिक, नवी मुंबईत महापौरपद खुल्या गटासाठी तर कल्याण-डोंबिवली ओबीसी महिलांसाठी, तर ठाणे ओबीसीसाठी राखीव आहे. भिवंडी व धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी महापौरपदाची सोडत निघाली आहे. मुंबई, उल्हासनगर व नागपूर या महापालिकांचे महापौरपद हे खुल्या पुरुष गटासाठी आहे. 
बारामती ः येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रास "महिंद्रा समृद्धी ऍग्री ऍवॉर्ड 2012' अंतर्गत दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील "कृषी सहयोग सन्मान' नुकताच नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केंद्राच्या प्रमुख डॉ. सौ. टी. ए. कादरभाई व विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी हा सन्मान स्वीकारला. दोन लाख 11 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक (प्रतिनिधी) : संत साहित्याने समाजनिर्मितीचे मोठे काम केले असून, ते आजही मार्गदर्शक आहे. संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मने अधिक निर्मळ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे पहिले अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नाशिकमध्ये होत आहे, त्यानिमित्त मंगळवारी (ता. 21) श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. श्री.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात बहुतेक ठिकाणी उंचावलेले किमान व कमाल तापमान आज (गुरुवार)पासून दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. किमान तापमान सरासरीहून कमी होण्याचा तर कमाल तापमान सरासरीवर येण्याचा अंदाज आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून मोठी वाढ झाली आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसला भिडला असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही उन्हाचा चटका वाढला आहे.
सांगली (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. बुधवारी (ता. 22) दुपारी बाजार समितीच्या आवारात व्यापारी आणि शेतकऱ्यांत वाद झाले, धक्काबुक्कीचेही प्रकार घडले. सध्या बेदाण्यास किलोस सरासरी शंभर ते दीडशे रुपयांचा भाव आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे सौद्यास सुरवात झाली. पण व्यापाऱ्यांनी अचानक बेदाण्यास किलोस पंचवीस रुपये असा भाव सांगितला. तो शेतकऱ्यांनी मान्य केला नाही.
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणास जबाबदार सावकारांना वेसण घालणारे "महाराष्ट्र सावकारी नियंत्रण कायदा' विधेयक त्रुटीयुक्त असून, यात ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याचे सांगत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हे विधेयक नामंजूर केले आहे. महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, या सावकारांकडून घेण्यात आलेले कर्ज परतफेड करण्यास शेतकरी असमर्थ ठरल्याने बहुसंख्य आत्महत्या झाल्या.
पाथर्डी, जि. नगर ः मढी येथे होळीचा सण पारंपरिक पद्धतीने सामूहिकरीत्या साजरा केला जातो. संपूर्ण गावातून त्यासाठी सुमारे टनभर गोवऱ्या वाजत गाजत गडाच्या पायथ्याला आणून टाकल्या जातात. तेथून मागासवर्गीय मानकरी त्या गोवऱ्या गडावर नेतात. देवस्थान समितीतर्फे मानकऱ्यांचा गौरव होतो. सायंकाळी गावाची एकच होळी गडावर पेटवून घराघरांत सण साजरा होतो. प्रचलित होळीच्या दिवशी गावकरी होळी सण करत नाहीत 15 दिवस होळीचा सण अगोदर साजरे करणारे मढी देशातील एकमेव गाव आहे.
नवी दिल्ली - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला असला, तरी मुंबई महापालिकेतील पराभव जिव्हारी लागल्यामुळे कॉंग्रेसने या निकालांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र "राष्ट्रवादी'सोबत आघाडी करून महापालिका, जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येण्यास कॉंग्रेसने अनुकूलता दर्शविली आहे. दरम्यान, मुंबईसह पुण्यातील पराभवाबद्दल पक्षश्रेष्ठींनीही झाडाझडती घेणे सुरू केले आहे.
जि. प. सदस्य बाळासाहेब दराडे ः समग्र ग्रामविकासाचे ध्येय बाळगूनच कार्यरत बुलडाणा (प्रतिनिधी) - आजच्या निवडणुका पार बदलल्या... पैशांशिवाय कुणीच काम करत नाही... कार्यकर्त्यांना रोजची "सोय' पाहिजे... मतदारही प्रलोभनांना बळी पडतात... असा अनेकजण "न'चा पाढा वाचताना दिसतात. चौकाचौकांत तशा गप्पांचे फडही रंगतात... पण 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पांग्राडोळे (ता. लोणार) गटात वेगळेच घडले. विजयी झालेले उच्चशिक्षित उमेदवार डॉ.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात सर्वत्र कमाल तापमानात सरासरीहून वाढ झाली आहे. कोकणात कमाल तापमान सरासरीहून पाच ते सात अंश सेल्सिअसने अधिक असून, सर्वाधिक उष्मा जाणवत असून, उर्वरित महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. किमान तापमान बहुतेक ठिकाणी सरासरीच्या आसपास असून, थंडी गायब झालेली आहे. मंगळवारी तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे.
यवतमाळ ः तुती रेशीम उत्पादनातील अपारंपरिक राज्यांमध्ये यंदाही महाराष्ट्राने बाजी मारली. सन 2010-2011मध्ये चार हजार 291 हेक्टरवर सर्वाधिक 212 मेट्रिक टन रेशीम उत्पादन घेऊन महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. पाठोपाठ मध्यप्रदेश (104) आणि मणिपूरने (97) अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. देशातील एकूण 27 राज्यांमध्ये तुती रेशीम उत्पादन घेतले जाते. यातील पाच राज्ये पारंपरिक, तर उर्वरित अपारंपरिक राज्ये आहेत.
नाशिक (प्रतिनिधी) : "कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' (सीआयआय) यांच्यावतीने सोमवारी (ता. 27) "कृषी प्रक्रिया उद्योगातील संधी' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. नाशिक मुंबई महामार्गाजवळील स्प्लेंडर हॉल येथे सकाळी साडेनऊ वाजता चर्चासत्राचा प्रारंभ होईल. "सीआयआय'चे समन्वयक दीपक कोल्हटकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की शेती उत्पादनांपासून होणाऱ्या प्रक्रिया उद्योगाला वाढता वाव मिळत आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः शनिवारी पहाटेपर्यंतच्या चोवीस तासांत नाशिकसह अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडीची लाट व थंडी गायब झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीहून पाच अंशांनी उंचावला आहे. सोमवारी सकाळपर्यंत किमान तापमानात आणखी एक - दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 482 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. सकाळी साडेसात वाजता पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा होणार आहे. यानंतर पालखी आणि छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
पुणे ः दुष्काळी स्थितीमुळे राज्यातील रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा 30 टक्के घट झाली असून, उत्पादन तब्बल निम्म्याने घटण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ओलीअभावी रब्बीचे तब्बल 18 लाख हेक्टर नापेर राहिल्याने व उगवण झालेल्या पिकांचे अकाळी बाटूक झाल्याने ही आपत्ती ओढवली आहे. रब्बी पिकांसाठी केलेला खर्च मातीत गेल्याने सुमारे 25 लाख शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अकोला (प्रतिनिधी) ः जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आत्मीयता, शिस्त आणि कोणत्याही कार्यात झोकून देण्याची वृत्ती, ही त्रिसूत्री युवकांनी आत्मसात करण्याची गरज राज्याचे क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे यांनी व्यक्त केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) 13 व्या आंतर कृषी विद्यापीठ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते गुरुवारी (ता. 16) बोलत होते.
पुणे (प्रतिनिधी) ः मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकल्याबरोबर राज्यात बहुतेक ठिकाणी थंडी वाढण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत किमान तापमान आणखी दोन ते चार अंशांनी कमी होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला.
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे केळीवर "चरका'चा प्रादुर्भाव वाढला आहे. जळगावच्या केळी संशोधन केंद्रात याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. 13) सायंकाळी शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाची बैठक झाली परंतु केळी या पिकासाठी असलेली हवामान आधारित पीकविमा ही योजना ही एक धूळफेकच असल्याचा आरोप या बैठकीत शेतकऱ्यांनी केला. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून थंडीने कहर केला आहे.
नाशिक (प्रतिनिधी)  -   लांडग्यांनो, लखलाभ तुम्हालाच शेत, विना पेरताच येथे जन्मा येती चोर, म्हणूनच जगण्याचा देवा पडे घोर!, असे शेतीतील वास्तव थेट मांडणाऱ्या चांदवड तालुक्यातील "पाटे' येथील ग्रामीण शेतकरी कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या "भुईशास्त्र' या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पहिला युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या सांस्कृतिक मंडळाने दिल्ली येथे पहिल्या युवा पुरस्काराची घोषणा केली.
राजकुमार चौगुले कोल्हापूर : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत खोडवा उसात पाचट ठेवण्याच्या तंत्राचा अंतर्भाव करावा, अशी मागणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे केली आहे. ...ही आहे राज्याची सद्यःस्थिती राज्यात सुमारे 16.5 टक्के क्षेत्र बागायती आहे. 83.5 टक्के क्षेत्र कोरडवाहू पिकाखाली आहे. पिकाखालील क्षेत्र, एकूण लोकसंख्या, पशुधन हंगामी पावसावर अवलंबून असल्याने दरवर्षी अस्थिरतेचे वातावरण तयार होते.
पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेत थंडीची लाट आल्याने राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (बुधवार)पासून किमान तापमानात तीन ते सहा अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पश्चिमी चक्रावात जम्मू- काश्मीरहून पुढे सरकण्यास सुरवात झाल्यानंतर उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढला आहे.
नाशिक : थंडीच्या तडाख्याने ज्या द्राक्षवेलींची पाने दहा टक्के खराब झाली आहेत, त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही मात्र जिथे 20 टक्के व त्यापेक्षा अधिक पाने सुकली आहेत, तेथे पाने करपल्याने अन्न निर्मितीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेस अडथळा निर्माण झाला आहे. त्या द्राक्षबागेतील फळांचे वजन, साखर निर्मिती, फुगवण व टिकाऊपणा यावर निश्चित विपरीत परिणाम होणार आहे. चालू तसेच पुढील वर्षीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
नाशिक (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास येथे येत्या 25 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या संमेलनासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. पाटील म्हणाले, "असे संमेलन प्रथमच होत आहे. शनिवारी (ता. 25) सकाळी सहा वाजता दिंडी सोहळा व पालखी काढण्यात येणार आहे.
नाशिक (प्रतिनिधी) : थंडीमुळे नुकसान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, कळवण, नाशिक तालुक्यातील द्राक्ष बागांच्या सर्वेक्षणास शनिवार (ता. 11)पासून कृषी विभागाकडून सुरवात झाली आहे. हंगाम सुरू होण्याच्या वेळीच द्राक्ष उत्पादकांचे या स्थितीत मोठे नुकसान झाले असून, या बाबतचा अहवाल येत्या दोन दिवसांत तातडीने शासनास पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास मोते यांनी सांगितले.
पुणे (प्रतिनिधी) ः मालेगाव वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात वाढ होऊन थंडीची लाट नाहीशी झाली आहे. अद्यापही किमान तापमान सरासरीहून घसरलेले असून, कमाल तापमानातही हळूहळू वाढ होत आहे. हवामान खात्याने मंगळवारी सकाळपर्यंत किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याचा व राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नाशिक - महिन्याभराच्या थंडीमुळे मंदावलेला यंदाचा द्राक्षहंगाम गती घेण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा अचानक वाढलेल्या थंडीमुळेच संकटात सापडला आहे. नीचांकी तापमानाच्या तडाख्याने दोन दिवसांपूर्वी हिरव्यागार असलेल्या द्राक्ष शिवाराचे चित्र पालटून गेले असून, दीड लाख एकरांवरील प्रत्येक द्राक्षक्षेत्रात करपलेली पाने, कोमेजलेले घड आणि तडा गेलेल्या घडांचेच चित्र दिसत आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः "देशाच्या गतिमान, शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी जैवविविधता संवर्धनाबरोबरच जैवतंत्रज्ञान व अणुऊर्जेचीही अत्यंत आवश्यकता आहे. नागरिकांमध्ये त्याबाबत गैरसमज असल्याने विकासाला खीळ बसत आहे. शिक्षण व संशोधन संस्थांनी देशाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी नागरिकांमधील गैरसमज दूर करण्याचे काम करावे,'' अशी अपेक्षा नियोजन आयोगाचे सदस्य व इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केली.
सोलापूर (प्रतिनिधी) ः अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी व उडगी येथील ग्रामस्थांवर हल्ला करून सुमारे दहाजणांना एका लांडग्याने जखमी केले पण तो पिसाळलेला असल्याने ग्रामस्थांनी त्याला बुधवारी (ता. 8) ठार केले. लांडगा ठार झाल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण दूर झाले. तहसीलदार रामलिंग चव्हाण व सोलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंबुरे यांनी गावाला भेट दिली.
नाशिक : राज्यात पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे हवामानावर आधारित रोग सल्ला (वेदर बेस्ड डिसीज फोरकास्टिंग) हा संगणकीय प्रणालीवर आधारित प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या प्रयोगाचे निष्कर्ष चांगले मिळाले असून, फवारण्यांची संख्या व त्याच्या खर्चात 20 टक्क्यापर्यंत बचत करणे त्यांना शक्य झाले आहे.
कऱ्हाड-  "भाषणातील आक्रमकपणा किंवा शिवीगाळ करून विकास होत नाही. त्यासाठी नियोजन हवे. ते फक्त कॉंग्रेसच देऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक टीका करून सामान्यांचा विकास होणार नाही. ती दिशाभूल थांबली पाहिजे.'' अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केली.