Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 1263
आदर्श गाव योजनेमध्ये प्राथमिक निवड झाल्यानंतर अंतिम निवडीसाठी गाव आणि स्वयंसेवी संस्थेला एकत्रितपणे कामकाज करावे लागते. पहिल्या सहा महिन्यात होणारे नियोजन व श्रमदानाचा टप्पा गावाला आदर्श कामकाजाच्या दिशेने घेऊन जातो.  १) पहिल्या सहा महिन्यांत गावाला एक कृती कार्यक्रम निश्चित करावा लागतो. किमान दोन लाख रुपये मूल्य होईल इतके श्रमदान गावाने करणे अपेक्षित असते. त्यासाठी गावक्षेत्रातील पाणलोटाच्या गाभा किंवा बिगरगाभा अशा कोणत्याही भागात श्रमदान करता येते. प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबातून श्रमदान करणे अत्यावश्यक राहील, असा नियम आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थेने श्रमदानाचे हजेरीपत्रक तयार करून पुढे ग्रामसभेत या श्रमदानाची माहिती देणे अपेक्षित आहे. २) स्वयंसेवी संस्थेला सप्तसुत्रीसाठी गावाला पुन्हा पुन्हा सूचना द्यावा लागतात. नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी, बोअरवेलबंदी अशा स्वरूपाची ही सप्तसूत्री असून, त्यासाठी गावकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याची जबाबदारी संस्था व ग्रामपंचायतीची असते. ग्रामसभेला ग्राम कार्यकर्ता निवडावा लागतो.
Thursday, March 23, 2017 AT 06:15 AM (IST)
हवा कशी वाहते आहे हे कुणीच तपासणारच नाही या गृहितकावर वर्षानुवर्षे ‘अंदाज’ वर्तविण्याचे दिवस आता भारतातदेखील संपत आले आहेत. 'स्कायमेट', ‘ऍक्यू वेदर’सारख्या खासगी हवामान संस्था उदयास येत आहेत आणि त्यांच्याशी स्पर्धा करणे भारतीय हवामान खात्याला जिकिरीचे झाले आहे. आज २३ मार्च जगभर ‘हवामान दिन’ म्हणून साजरा केला जात असताना आपली वाटचाल अचूक हवामान मागितीकडे कशी होईल यावर दृष्टिक्षेप टाकूया...  किरणकुमार जोहरे  भारतात आपले हवामान खाते म्हणजे १८७५ पासून कार्यरत भारत हवामान विभाग म्हणजे ‘आयएमडी’ आणि १९६२ पासून कार्यरत ‘इंडियन इन्स्टिटट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी’ (आयआयटीएम) ही हवामान संशोधन करणारी संस्था होय. आपल्याकडे एवढी सगळी अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहेत, तरी पण आपले हवामानाचे अंदाज का चुकतात? हा प्रत्येकालाच पडणारा गहन प्रश्न होय.
Thursday, March 23, 2017 AT 06:15 AM (IST)
राहुरी कृषी विद्यापीठ, जि. नगर (प्रतिनिधी) : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सेवा केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या कृषी हवामान अंदाज सेवेचा विस्तार होत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा सल्ला कसा जाईल, असे प्रयत्न होत आहेत. या सल्ल्याबाबत शेतकऱ्यांमधील जागरूकतादेखील वाढते आहे. या सल्ल्याचा शेती नियोजनात विशेष उपयोग होताना दिसत आहे. कृषी हवामान अंदाजाचे पाच मॉडेल आहेत. जपान, इंग्लंड, युरोपियन, भारतीय आणि अमेरिका मॉडेल आहेत. टी ३२ मॉडेलद्वारा हवामान अंदाज या आधी दिला जात होता. त्याऐवजी आता मल्टी मॉ़डेल इनसेंबल (एमएमई) द्वारे दिले जातात. पाच मॉडेलमध्ये भारतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील माहिती त्यात भरली जाते. सुपर संगणकाद्वारे गुंतागुंतीची गणिते केली जातात. भारतीय हवामान विभागाद्वारे हे अंदाज १३० जिल्हा केद्रांना दिले जातात. नंतर ६१५ जिल्हा हवामान केंद्रांना ते अंदाज दिले जातात. महिन्यातून किमान चार तरी संदेश दिले जातात, अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. रवी आंधळे व कपील शेवाळे यांनी दिली. त्यानंतर विभागानुसार संदेश प्रसारित होतात.
Thursday, March 23, 2017 AT 06:15 AM (IST)
प्रतिकूल हवामानाला तोंड देत शेतकऱ्यांची आधुनिक शेती शासकीय यंत्रणांनी ठरविले तर एखादे गाव कसे बदलू शकते याचे अादर्श उदाहरण म्हणून वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात मोडणाऱ्या घाटा या गावाचे देता येईल. पाणीटंचाई, प्रतिकूल हवामान आदी बाबींवर मात करीत येथील शेतकरी उत्कृष्ट नियोजन व स्मार्ट पीकपद्धती याद्वारे आधुनिक शेती करू लागले आहेत. अाज घाटा हे वाशीम जिल्ह्यातील वेगाने प्रगतिपथावर निघालेले गाव म्हणून अोळखले जाते. गेल्या चार पाच वर्षांत गावाचे चित्र पालटले अाहे. गोपाल हागे पाणीटंचाईवर शेततळ्याद्वारे मात वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात असलेल्या घाटा गावाची लोकसंख्या हजाराच्या अात आहे. गावची जमीन म्हणाल तर ४८३ हेक्टर अाहे. घाटा गावाच्या शिवारात पाण्याची तितकी मुबलकता नाही. परिसरात छोटा प्रकल्प व्हावा, यासाठी गावकरी वर्षानुवर्षे मागणी रेटत अाहेत परंतु अद्याप ती पूर्ण झालेली नाही. कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना टंचाईच्या झळा साेसाव्या लागतात. यामुळे सिंचनाला मर्यादा अाल्या अाहेत. परंतु अाता शेततळी उभारली जात असल्याने पाण्याची शाश्वतता येत अाहे. शेतकरी या तळ्यातील पाण्याचा शेतीसाठी वापर करीत अाहेत.
Thursday, March 23, 2017 AT 06:00 AM (IST)
शेतकऱ्यांचा वायदे बाजारावरचा अविश्वास दूर करून त्यावर सक्षम नियंत्रणासाठी यातील संस्था, शासनाने प्रयत्न वाढवायला हवेत. सध्या शेतमालाचे अधिक उत्पादन घेणे, याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना अडचण नसून उत्पादित मालाची विक्री, कोठे, कशी आणि काय दरात करावी ही समस्या मात्र सर्वांपुढे आहे. प्रचलित बाजार व्यवस्थेत बदल करण्यासाठी पणन कायद्यात सुधारणा, राष्ट्रीय कृषी बाजार, थेट शेतमाल विक्रीस प्रोत्साहन असे प्रयत्न केंद्र - राज्य शासन पातळीवर होत अाहेत परंतु ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून, त्यास अनेक मर्यादाही आहेत. त्यामुळे सध्यातरी या बाजार व्यवस्थेत शेतकरी चांगलाच भरडला जात आहे. अशावेळी वायदे बाजारातील शेतमाल व्यवहाराचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना पीक लागवडीसह दरांबाबतही फायदा होईल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी नुकतेच व्यक्त केले. सुमारे तीन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायदे बाजार केवळ अंदाजापुरते मर्यादित न राहता त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना झाला पाहिजे. याकरिता संबंधित संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा अन्यथा या संस्था आभूषणे ठरतील, अशी परखड टीका त्यांच्यावर केली होती.
Thursday, March 23, 2017 AT 06:00 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: