Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 135
प्रदूषणामुळे वनस्पतीच्या शरीर रचनेत होताहेत विपरीत बदल झाडेझुडपे ही प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साईड घेऊन ऑक्‍सिजन बाहेर टाकत असतात. त्याचा लाभ सर्व सजीवांना होत असतो. मात्र या झाडांनी ऑक्‍सिजन बाहेर न सोडता स्वतःसाठी वापरायचा ठरवला तर... सर्वत्र हाहाकार माजेल. ऑक्‍सिजनच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा निखळून पडेल. ही विज्ञान काल्पनिक नसून, वाढत्या प्रदूषणामुळे कणेरीच्या झाडांनी स्वतःच्या शरीररचनेमध्ये बदल घडवले आहेत. कणेरीच्या झाडांनी सुमारे 90 टक्के पर्णरंध्रे बंद केल्याचे सातारा येथील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. रुस्तुम तांबोळी यांना दिसून आले आहे. वाढत्या प्रदूषणावर सामान्यपणे वृक्षारोपणाचा उपाय सांगितला जातो. मात्र प्रदूषणाचे झाडांवर काय परिणाम होतात, याचा विचारही आपल्या मनात येत नाही. साधारणपणे सर्व सजीवांवर प्रदूषणातील विविध विषारी घटकांचे विपरीत परिणाम होत असल्याची संशोधने सातत्याने समोर येत आहे. मात्र झाडे, वनस्पती यांना सुद्धा जीव आहे आणि त्यांच्यावरही प्रदूषणाचे परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी.
Wednesday, June 19, 2013 AT 05:45 AM (IST)
लंडन येथील मोफत बस योजनेमुळे घटले अपघातांचे प्रमाण वाहतुकीची समस्या ही या जगातील कोणत्याही शहराची समस्या आहे, त्यासाठी विविध उपाय करण्यात येत असतात, काही धोरणे राबवली जातात मात्र त्यांचा झालेला परिणाम फारच कमी वेळा शास्त्रीय पद्धतीने तपासला जातो. असाच एक शास्त्रीय अभ्यास इंग्लंड येथील लंडन शहरात राबवलेल्या 12 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा करण्यात आला आहे. या योजनेमुळे अपघातांमध्ये घट होऊन पर्यावरणासाठी उपयुक्त ठरल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्याचे निष्कर्ष "जर्नल ऑफ इपिडेमिओलॉजी ऍण्ड कम्युनिटी हेल्थ'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. शाळा आणि ऑफिसेस यांचे वेळापत्रक जवळजवळ सारखेच असल्याने एकाच वेळी वाहने रस्त्यावर येतात. पर्यायाने सर्वांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर लंडन येथे लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी मोफत बस योजना राबवण्यात येते. लंडनमध्ये 2005 या वर्षी 12 ते 16 वयोगटाच्या मुलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये 2006 मध्ये 17 वर्षांच्या मुलांचाही समावेश करण्यात आला.
Tuesday, June 18, 2013 AT 05:00 AM (IST)
आपल्याकडे घरामध्ये कोळीष्टके दिसली की चांगले मानले जात नाही मात्र आशिया, युरोप आणि अमेरिका खंडातील अनेक देशांमध्ये कोळी हे पाळीव प्राण्यांसारखे पाळले जातात. हे कोळी चांगल्या प्रकारे सोबत करतात, असे मानले जाते. त्याही पुढे आश्‍चर्याची बाब म्हणजेच या पाळल्या जाणाऱ्या कोळ्यांची शेती केली जाते. चिली येथील सॅन्टिगो शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाटूको गावामध्ये टॅरंटूला या प्रजातीच्या कोळ्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढ व शेती केली जाते. - या फार्ममध्ये छोट्या छोट्या पेट्री डिशमध्ये वाढविण्यात येत असलेले कोळी छायाचित्रात दिसत आहेत. या फार्ममध्ये सुमारे पाच हजार टॅरंटूला कोळ्यांचे प्रजनन आणि वाढ केली जाते. - हा अनोखा फार्म उभे करणारे कृषी तज्ज्ञ जुआन कार्लोस ओरेल्लाना. त्यांच्या गालावर टॅरंटूला जातीचा एक कोळी दिसत आहे. - टॅरंटूला जातीचे कोळी हे तळहाताच्या आकाराचे असून त्यांचा दंश विषारी असतो. हा कोळी निसर्गामध्ये छोट्या पक्ष्यांपासून अनेक छोटे प्राणी आपल्या जाळ्यात पकडून त्यांचा फडशा पाडतो, त्याचे विषदंत किंवा नांग्या छायाचित्रात दिसून येत आहेत.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला काय होणार, असे अनेक वेळा सर्वसामान्यांना वाटत असते मात्र अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा फायदा तुमच्या घरातील ढेकणांचा बंदोबस्त करण्यासाठीही होऊ शकतो. नुकतेच तसे संशोधन अमेरिकेतील स्टोनी ब्रुक विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे. विद्यापीठातील संशोधकांनी अतिसूक्ष्म (अब्जांशी) तंत्रज्ञानाचा वापर करीत मानवी केसांच्या जाडीपेक्षा 50 पट कमी जाडीच्या धाग्यांपासून जाळ्याची निर्मिती केली आहे, त्यामुळे ढेकूण किंवा अन्य रक्तशोषक किडींना रोखणे शक्‍य होणार आहे, बिनविषारी पद्धतीने किडींचे नियंत्रण करणे शक्‍य होणार आहे. या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला असून, त्याची उत्पादने खासगी कंपनीद्वारा बाजारात आणण्यात येणार आहेत. ढेकणांच्या त्रासाने वैतागलेल्या माणसाची राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली एक विनोदी कथा मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. शेवटी त्यातील नायक घराला आग लावून काशीला निघून जातो.
Friday, June 14, 2013 AT 04:45 AM (IST)
"ऍमेझॉन स्टुडिओ'ने "स्टोरी टेलर' हे नवे उत्पादन आणले बाजारात लहानपणी आपल्याला आपली आजी रात्री झोपताना गोष्टी सांगायची, तिच्या गोष्टीतील व्यक्तिरेखा आपल्या कल्पनेने मनात उभ्या राहायच्या मात्र आता "ऍमेझॉन स्टुडिओ' या कंपनीने "स्टोरी टेलर' हे नवे उपकरण तयार केले आहे. त्याच्या साह्याने एखादी गोष्ट सहजपणे स्टोरी बोर्ड स्वरूपात पाहणे शक्‍य होणार आहे. एखादा स्टोरी बोर्ड बनविण्यासाठी अनेक सृजनशील लोकांचा गट काम करत असतो. लेखकाने एखादी गोष्ट लिहिल्यानंतर त्यातील पार्श्‍वभूमी, व्यक्तिरेखा यांची चित्रकार रेखाटने करतो. रेखाटनांच्या विविध हालचालींचीही संगणकाच्या साह्याने आणखी चित्रे बनविली जातात. त्याचे योग्य प्रकारे निर्देशन करण्यासाठी निर्देशक असतो. या साऱ्या सृजनशील कामासाठी वेळ आणि खर्चही अधिक प्रमाणात होतो मात्र ऍमेझॉन स्टुडिओ या कंपनीने आणलेले स्टोरी टेलर हे उत्पादन या बाबी एकदम सोप्या करून टाकते. त्यामध्ये एखादी गोष्ट अपलोड करायची, त्याला योग्य पार्श्वभूमी व व्यक्तिरेखा निवडायची, आणि आपल्यासमोर त्या गोष्टीचा स्टोरी बोर्ड तयार होईल. एखाद्या कार्टूनप्रमाणे एकामागोमाग एक चित्रे स्क्रिप्टप्रमाणे येत जातील.
Thursday, June 13, 2013 AT 05:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: