Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 38
बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत दिली जाणार शेती विकासाला चालना हैदराबाद (वृत्तसंस्था) ः 2012-17 या बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती विकासाला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. शेती विकासाचा नियमितपणे आढावा घेणे, योजनांची योग्यपणे अंमलबजावणी होते की नाही याचे परीक्षण करणे आणि यानुसार ध्येयधोरण ठरवण्याचे काम हा मंत्रिगट करणार आहे. राज्याचे कृषिमंत्री या मंत्रिगटाचे अध्यक्ष राहणार आहेत तसेच अर्थ, सिंचन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, सहकार, वने व पर्यावरण, पणन, उद्योग, लघु पाटबंधारे, नागरी पुरवठा या खात्यांचे मंत्री या गटाचे सदस्य असतील. तसेच, उद्योग आणि संशोधन संस्थांचे प्रतिनिधी हे विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी होतील, तर राज्याचे मुख्य कृषी सचिव हे निमंत्रक असतील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव पी. के. मोहंती यांनी दिली. नियमितपणे व किमान तीन महिन्यांतून एकदा या मंत्रिगटाची बैठक होऊन कृषीविषयक योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. "हा मंत्रिगट राज्याचे कृषी धोरण व विविध योजना राबवण्याबाबतचा आराखडा तयार करेल.
Sunday, June 09, 2013 AT 12:15 AM (IST)
गडचिरोलीत खरिपाची लगबग सुरू गडचिरोली : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वरुणराजाचे अल्पप्रमाणात का होईना आगमन झाल्याने बळिराजा खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झालेला दिसत आहे. गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, चार्मोशी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मूलचेरा, सिरोंचा आदी तालुक्‍यांत पाऊस झाला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने उपस्थिती दर्शविली. बऱ्याच भागांत रिमझिम पाऊस कोसळला. त्यामुळे तापमानात घट झाली असून, शेतीकामांना वेग आला आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस ठाणे : ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांत गुरुवारी (ता. 6) सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या या जोरदार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. दरम्यान, पहिल्याच पावसात बी केबिन येथील रेल्वे वसाहतीतील अनेक घरांत पाणी शिरले. गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, गुरुवारी दुपारपासून आभाळात मळभ दाटून आले आणि सायंकाळी दोन ते अडीच तास चांगलाच पाऊस पडला, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.
Sunday, June 09, 2013 AT 12:00 AM (IST)
गुलाबराव देवकर : माफसूमध्ये विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन मुंबई - सततच्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन जपण्यासाठी मूरघास हा हिरव्या चाऱ्याला चांगला पर्याय ठरू शकतो. त्याअनुषंगाने पशुवैद्यकीय महाविद्यालयांनी वेगवेगळी संशोधने करून दुग्ध उत्पादकांना सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास (पदुम) राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी शनिवारी (ता. 25) केले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळावा आणि तांत्रिक महोत्सव 2013चे उद्‌घाटन करताना श्री. देवकर बोलत होते. या वेळी माफसूचे कुलगुरू डॉ. अरुणकुमार मिश्रा, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप माने आदी उपस्थित होते. श्री. देवकर म्हणाले, ""गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी कटिबद्ध असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्नही करण्यात येत आहेत. सध्याच्या भीषण दुष्काळात दुग्ध व्यवसायामुळेच शेतकरी तग धरून आहेत.
Sunday, May 26, 2013 AT 01:00 AM (IST)
रिझर्व्ह बॅंकेचा धोरणात्मक निर्णय कृषी कर्जात वर्गीकरण होणार मुंबई ः गोदामामध्ये शेतीमाल ठेवून बॅंकांकडून तारण कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बॅंकेने खुशखबर दिली आहे. यापूर्वी शेतीमालावरील तारण कर्जासाठी असलेली 25 लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती 50 लाख रुपये करण्याचा धोरणात्मक निर्णय रिझर्व्ह बॅंकेने 2013-14च्या वार्षिक पतधोरणात घेतला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या तारण कर्जाची प्रत्यक्ष कृषी कर्जात वर्गवारी करण्यात येणार आहे. खते, कीटकनाशके, बियाणे, पशू- पोल्ट्री खाद्य आणि अवजारे विक्रेत्यांसाठी अप्रत्यक्ष कृषी कर्जाची मर्यादादेखील एक कोटीवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे. देशातील राष्ट्रीयीकृत आणि सहकारी तसेच खासगी बॅंकांमार्फत प्राधान्याच्या क्षेत्रात (कृषी आणि संलग्न क्षेत्र) जास्तीत जास्त वित्तपुरवठा व्हावा अशी मध्यवर्ती बॅंकेची अपेक्षा आहे. सर्वसमावेशक पतपुरवठा (फायनान्शिअल इन्क्‍लुजन) अंतर्गत यंदाच्या (2013-14) वार्षिक पतधोरणात यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे.
Sunday, May 05, 2013 AT 12:30 AM (IST)
पुणे (प्रतिनिधी) ः "सकाळ-ऍग्रोवन'मार्फत आयोजित पहिल्या ग्रीन होम एक्‍स्पोच्या घवघवीत यशानंतर विक्रेते आणि ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा "ग्रीन होम एक्‍स्पो 2013 सीझन 2' या फार्म हाऊस व विकेंड होम प्रदर्शनाचे आयोजन येत्या 25 व 26 तारखेला येथील गणेश कला- क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन होणार आहे. ग्रीन होम प्रदर्शनात प्रमुख शहरांभोवतीचे फार्म हाऊस, इको होम, कृषक प्लॉट्‌स, विकसित शेतजमिनी व संबंधित सेवांची माहिती घेण्याची संधी ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनामध्ये पुणे व इतर शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेले सेकंड होम प्रोजेक्‍ट्‌स, फार्म हाऊस व बंगलो प्लॉट्‌स यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. आपली मालमत्ता विकू इच्छिणाऱ्या संस्थांनाही एकाच वेळी हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी यातून मिळणार आहे. शहरांमधील वाढते प्रदूषण व दाटीवाटीमुळे बहुसंख्य शहरी नागरिक शहरांपासून दूर, शांत, निसर्गरम्य वातावरणात जाऊन राहू इच्छितात. याच वेळी शहरापासून हाकेच्या अंतरावर अनेक विकसित जमिनी व शेती प्रकल्प विकण्यासाठी संबंधित व्यक्ती, संस्था, प्रयत्नशील आहेत.
Saturday, May 04, 2013 AT 02:15 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: